34 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयउपमुख्यमंत्र्यांना खंडणी बहाद्दरांनीच लावला चुना

उपमुख्यमंत्र्यांना खंडणी बहाद्दरांनीच लावला चुना

टीम लय भारी

 पुणे:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाला २० लाख रुपयांची खंडणीची धमकी दिल्याचे समजते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन त्याद्वारे त्यांचा पी ए बोलत असल्याचे भासवून एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून 20  लाख रुपयांची खंडणी मागण्याचा व त्यातील 2 लाख रुपये स्वीकारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(deputy cm Minister mobile number ransom demand  Pune using)

वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली.  गुन्हे शाखेच्या युनिट 1 पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिल्यानंतर बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडेबोलाइ येथील जागेचा वाद सोडविण्यासाठी धमकी देखील देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अटकेत असलेल्या आरोपींनी संगणमत करून गूगल प्ले स्टोर वरून फेक कॉल ॲप नावाचे ॲप डाऊनलोड केले.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेने यूपीची निवडणूक लढवण्याची योजना आखली, टिकैत यांचा मागितला पाठिंबा

मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांना गड किल्ल्यांची नावे

मंत्री ‘कोरोना’तून बरे झाले, अन् लेकीला झाला आनंद!\

“Had I Sent Ajit Pawar To Join Hands With BJP…”: NCP’s Sharad Pawar

याच्या मदतीने त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल क्रमांकचा वापर करून बांधकाम व्यवसायिक आला फोन केला. अजित पवार यांचा पीए चौगुले बोलतोय असं सांगून वीस लाख रुपये देण्याची मागणी केली. तसेच वाडेबोलाइ येथील बाबा चोरमले आणि इतर नऊ जणांच्या मालकीच्या जमिनीचा वाद मिटवून टाका असे सांगितले होते. दरम्यान या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक केली आहे.

करण्यात आलेल्या आरोपींची नावे नवनाथ भाऊसाहेब चोरमले, सौरभ नारायण काकडे, सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे, किरण रामभाऊ काकडे, आकाश शरद निकाळजे, चैतन्य राजेंद्र वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एका बांधकाम व्यावसायिकाने या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी