30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeराजकीयकिरीट सोमय्यांच्या सूड बुद्धीने माझ्यावर कारवाई, प्रताप सरनाईकांचा आरोप

किरीट सोमय्यांच्या सूड बुद्धीने माझ्यावर कारवाई, प्रताप सरनाईकांचा आरोप

टीम लय भारी

मुंबई : बुधवारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डन या इमारतीचा दंड आणि त्या दंडावरील संपूर्ण व्याज पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्यासंदर्भात ठाणे महानगरपालिका आयुक्तांना आदेश देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. त्यावर आज प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली(Pratap Saranaik alleges, Kirit Somaiya has revenge).

तत्कालीन महापालिका आयुक्तांनी वैयक्तिक द्वेषापोटी दंडात्मक कारवाई केली. याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

तसेच पत्रकार परिषदेत सरनाईक यांनी सोमय्या यांच्यावर सूडबुद्धी असल्याची टीका केली आहे. विहंग गार्डनमध्ये कुठलेही अनाधिकृत बांधकाम झाले नसल्याचा निर्वाळा देत ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या महापालिकेने दूर कराव्यात असं सूचित केले होते. किरीट सोमय्यांनी आधी प्रकरणाची माहिती घ्यावी.

हे सुद्धा वाचा

MLA Pratap Sarnaik | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर,कार्यालयावर ईडीचा छापा

घाबरवणे हे आमच्या रक्तात नाही आणि आम्हीसुद्धा घाबरत नाही;महापौरांचा सोमय्यांवर निशाणा

पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांच्या घोटाळ्यांवरील प्रश्नांना उत्तरे देताना सोमय्यांची चांगलीच तारांबळ उडाली

Maharashtra govt waives Rs 3.3 crore fine imposed on Sena MLA’s housing project in Thane

केवळ सूडबुद्धीने ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर ए राजीव यांनी हे सगळं घडवून आणल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला. विहंग गार्डनमध्ये 1 इंच सुद्धा अनाधिकृत बांधकाम झाले असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन असा आव्हानच सरनाईक यांनी सोमय्यांना दिले आहे.

त्यामुळे या विरोधात भाजपनेविरोध करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एकूण 21 कोटी रक्कम होत असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. किरीट सोमय्यांनी 30 दिवसांत माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात दावा दाखल करणार असल्याचा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. परंतु शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या कंपनीच्या दंड माफ प्रकरणावरुन भाजप आक्रमक झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी