26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेसोबत युती नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेसोबत युती नाही

टीम लय भारी

मुंबई : संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. राऊत यांच्यासोबत झालेली भेट राजकीय नव्हती, असे फडणवीस यांनी म्हटले आहे ( Devendra Fadnavis said, Sanjay Raut’s visit wasn’t political ).

शिवसेनेसोबत युती करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. राजकीय चर्चा सुद्धा यावेळी झाली नाही, असे फडणवीस म्हणाले ( Devendra Fadnavis said, people upset on Thackeray Government ).

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीबाबत संजय राऊत यांनी दिले स्पष्टीकरण

नरेंद्र मोदींनी डावललेले माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

बाळासाहेब थोरातांनी ठणकावले : मोदी सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस संघर्ष करणार

या सरकारबद्दल जनतेमध्ये कमालीची नाराजी आहे. हे सरकार आपोआपच पडेल. राज्यात सरकार स्थापन करण्यामध्ये आम्हाला कसलेही स्वारस्य नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे ( Devendra Fadnavis said, we aren’t interested to form government in Maharashtra ).

संजय राऊत यांचा मला फोन आला होता. त्यांना मुलाखत हवी होती. पण ही मुलाखत एडीट न करता दाखवावी. तिथे माझाही कॅमेरा असेल, अशी माझी अट होती. त्या अनुषंगाने आम्ही भेटलो होतो. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे ते म्हणाले.

लोकांमध्ये सरकारविषयी आक्रोश आहे. आम्ही सरकारला धारेवर धरत आहोत. आम्हाला सरकार स्थापन करण्याची कसलीही घाई नाही, असेही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे संजय राऊतांना सोलून काढतील : प्रवीण दरेकर

मुलाखत घेण्यासाठी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. एडीट न करता मुलाखत घ्यावी अशी फडणवीस यांची अट आहे. या अटीनुसार फडणवीस सोलून काढतील, प्रत्येक मुद्दा खोडून काढतील, फाडून टाकतील अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे.

लोकांनी उगीच वावड्या उठवू नयेत. हे निकम्मे व दळभद्री सरकार त्याच्या कर्माने पडेल, असेही दरेकर यांनी म्हटले आहे ( Pravin Darekar attacks on Mahavikas Aghadi government ).

Mahavikas Aghadi

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी