29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रहा दिवस माझ्यासाठी दसरा-दिवाळी पेक्षा मोठा ठरला  : धनंजय मुंडे

हा दिवस माझ्यासाठी दसरा-दिवाळी पेक्षा मोठा ठरला  : धनंजय मुंडे

टीम लय भारी 

मुंबई: लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य उद्घाटन सोहळ संपन्न झाला आहे. हा उद्घाटन सोहळा मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी भावनिक क्षण होता. त्यांनी म्हटलं की, हा दिवस माझ्यासाठी दसरा-दिवाळी पेक्षा मोठा ठरला आहे. Dhananjay Munde says is a big day for me

माझ्या वडिलांनी एकेकाळी ऊसतोडणी केलेली आहे, ऊसतोड कामगारांच्या व्यथा, वेदना मी जाणतो, त्यांना करावे लागणारे अपार श्रम कमी व्हावेत व त्यांच्या आयुष्यातील विविध समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी महामंडळाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकारने ज्याप्रमाणे महामंडळाला कायमस्वरूपी निधीची तरतूद केली त्याचप्रमाणे ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या मोफत शिक्षणासाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या माध्यमातून मोफत वस्तीगृहे यावर्षीपासून सुरू करत अशी घोषणा त्यांनी केली आहे. Dhananjay Munde says is a big day for me

पुण्यात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या मुला-मुलींसाठी 1000 क्षमतेचे वसतिगृह मंजूर करण्याची विनंती यावेळी  उपमुख्यमंत्री महोदयांना केली. चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्या संस्थांसोबत करार करण्याचा मानस आहे. ही मुले शिकून आपल्या पालकांचे नशीब बदलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हे सुध्दा पहा: 

चुकून झालेला विजय महागात पडणार: पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडे यांच्यावर टीका

धनंजय मुंडेंचा महत्वपूर्ण निर्णय, 1 मार्चपासून दिव्यांगांच्या विशेष शाळा/कार्यशाळा सुरू होणार

चंद्रशेखर बावनकुळे यांचे गडचिरोलत जनआक्रोश आंदोलन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी