36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeसिनेमादिघेसाहेबांच्या वेशात पाहता एकनाथ शिदेंनी अभिनेता प्रसाद ओकचे धरले पाय

दिघेसाहेबांच्या वेशात पाहता एकनाथ शिदेंनी अभिनेता प्रसाद ओकचे धरले पाय

टीम लय भारी 

मुंबईमधील वरळीतील ब्लू सीज या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये राज्याचे सर्वाजनिक बांधकाम, नगरविकासमंत्री मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी अभिनेता प्रसाद ओकला धर्मवीर आनंद दिघे यांच्या वेशात पाहता भावुक होऊन पाया पडले. ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmveer Mukkam Post Thane) या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चचं कार्यक्रमात हा प्रकार घडला. Dharmveer Mukkam Post Thane -Eknath Shide grabbed actor Prasad Oak’s legs

सध्या सर्वत्र शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावर आधारित सिनेमाची चर्चा रंगत आहे. (Dharmveer Mukkam Post Thane) सिनेमात त्यांची व्यक्तिरेखा अभिनेता प्रसाद ओक साकारत आहे. सध्या प्रसाद ओकच्या या लुकचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. एवढंच नाही, तर शिवसैनिकांना देखील आनंद दिघे यांनाच समोर पाहत आहोत, असा भास होत आहे. सोहळ्या दरम्यान प्रसाद ओकला आनंद दिघे यांच्या रुपात पाहून एकनाथ शिंदे देखील भावुक झाले.

आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या नात्यातील जिव्हाळा सांगणारा हा प्रसंग पाहून अनेकांचे  (Dharmveer Mukkam Post Thane) डोळे पाणावले. त्याच बरोबर शिवसैनिक देखील भावुक झाले तर, या क्षणाची चर्चा सिनेसृष्टीत आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ शिंदेंच्या राजकीय यशात आनंद दिघेंचं मोठं योगदान आहे, हे एकनाथ शिंदे कधीही विसरत नाहीत. कालच्या प्रसंगावरुन ते पुन्हा स्पष्ट झाले.

हे सुद्धा वाचा :- 

Eknath Shinde gets emotional at Pravin Tarde’s ‘Dharmaveer’ music launch, touches the feet of Prasad Oak

मोदी सरकार म्हणजे ‘खोटं बोल पण रेटून बोल’ : रोहित पवार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी