33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयindian currency : चलनी नोटा आणि गांधींचा फोटो याबद्दलचा इतिहास तुम्हाला माहिती...

indian currency : चलनी नोटा आणि गांधींचा फोटो याबद्दलचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

भारतात कागदी नोटांचे चलन 1770 मध्ये छापले जाऊ लागल्याचे मानले जाते, हे चलन बॅँक ऑफ हिंदूस्थान ने जारी केले होते. मात्र ब्रिटीश सत्तेच्या कालखंडाच 1917 मध्ये पहिल्यांचा भारतात कागदी नोटांचे चलन जारी करण्यात आले.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पत्रकारपरिषद घेत भारतीय चलनी नोटांवर देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाचा फोटो छापण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. त्यानंतर देशात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून केजरीवाल यांच्यावर भाजप, कॉँग्रेससह अनेक पक्षांनी टीका केली. त्यानंतर अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या महापुरूषांचे फोटो नोटांवर छापण्याची मागणी देखील केल्याचे माध्यमांमधून दिसून आले. मात्र भारतीय चलनी नोटांवरील फोटोंचा इतिहास कसा होता याबाबत आम्ही तुम्हाला या लेखाव्दारे माहिती देणार आहोत.
भारतीय चलनाला रुपया असे संबोधले जाते रुपया हे चलन शेरशहा सुरीने सुरू केले होते. ते चांदीच्या नाण्याच्या स्वरूपात होते. त्यानंतर पुढे भारतात कागदी नोटांचे चलन 1770 मध्ये छापले जाऊ लागल्याचे मानले जाते, हे चलन बॅँक ऑफ हिंदूस्थान ने जारी केले होते. मात्र ब्रिटीश सत्तेच्या कालखंडाच 1917 मध्ये पहिल्यांचा भारतात कागदी नोटांचे चलन जारी करण्यात आले. या नोटांवर तेव्हा ब्रिटनच्या राजाचे चित्र छापले जात असे. स्वातंत्र्यपूर्व काळात 1926 सालात महाराष्ट्रात नाशिक मध्ये चलनी नोटांचा छापखाना सुरू करण्यात आला. त्यानंतर पुढे भारतात एक मध्यवर्ती बॅँकेची गरज भासू लागल्याने 1935 सालात भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर भारतीय रिझर्व बॅँकेने सन 1938 साली पहिले कागदी चलन छापून जारी केले.
आणि नोटांवर गांधीजींचा फोटो आला…
सन 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वतंत्र भारताचे चलन छापण्यासाठी विचारविनिमय झाल्यानंतर ब्रिटीश राजाच्या चित्रा ऐवजी भारतीय संस्कृतीची ओळख असेलेला अशोक स्तंभ नोटांवर छापला जाऊ लागला. सन 1970 पर्यंत नोटांवर अशोक स्तंभाची प्रतिमा छापली जात होती महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारत सरकारने महात्मा गांधी यांचा फोटो सन 1969 साली पहिल्यांदा छापला. या नोटेवरील छापलेला फोटो हा गांधीजी सेवाग्राम आश्रमात बसलेले असताना काढलेला फोटो होता. त्यानंतर 18 वर्षांनी 1987 साली महात्मा गांधींचा फोटो असलेली 500 रुपयांची नोट भारतीय रिझर्व बॅँकेने जारी केली. पुढे 1916 सालापासून मात्र सर्वच कागदी चलनाच्या नोटांवर गांधीजींचा फोटो छापला जाऊ लागला. अशोक स्तंभाच्या जागी महात्मा गांधी यांचा फोटो छापला जाऊ लागला तरी नोटांवरून अशोक स्तंभाचे चित्र मात्र हटविण्यात आले नाही, तर ते नोटेच्या उजव्या बाजूला छापले जाऊ लागले. सध्याच्या भारतीय चलनी नोटांवर जो गांधीजींचा फोटो छापला जातो तो गांधीजी कलकत्ता येथे असताना काढलेला फोटो आहे. 1946 साली कॅबिनेट मिशन भारतात आले होते त्यावेळी काढला होता. तत्कालीन बर्मा (म्यानमार) आणि भारतात ब्रिटिश सेक्रेटरी फैड्रिक पॅथिक लॉरेन्स यांच्यासोबत कलकत्ता येथील व्हाईसरॉय हाऊस येथे चर्चे दरम्यान काढलेला आहे.
हे देखील वाचा :

मोदी आणि केजरीवाल कोणत्याही थराला जाऊ शकतात; नाना पटोले यांचा हल्लाबोल

Arvind Kejriwal : केजरीवाल म्हणाले नोटांवर देवी लक्ष्मी, गणपतीचे फोटो छापा; भाजप आणि काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल

नोटांवर गांधीजींचाच फोटो का?
याचे कारण म्हणजे प्रत्येक स्वातंत्र्य सैनिक कोणत्याना कोणत्या क्षेत्राशी जोडलेला होता. त्यामुळे कुणा एकाचा चेहरा निवडणे वादाचे आणि विरोधाचे कारण बनले असते. मात्र महात्मा गांधी यांना संपूर्ण देशभरात एकमान्यता होती. त्यामुळे नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो निवडण्यात आला.
नोटांवर मानवी फोटो छापण्याचे कारण काय?
कागदी चलनाची नकल करुन बनावट नोटा बाजारात आणल्या जाऊ लागल्या होत्या. कोणत्याही एखाद्या स्मारकाचे, किंवा चिन्हाची नक्कल करणे सोपे होते. त्यामुळे एखादा मानवी चेहरा निवडण्याचे ठरले. कारण चेहऱ्यावरील गुंतागुंतीची नक्कल करणे तसे अवघड असते. सध्या नोटांवर असलेला गांधीजींचा फोटो हा कंप्युटराईज्ड असून या फोटोची रचना अतिशय किचकट पध्दतीने केलेली असून त्याची नक्कल करणे अवघड आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी