28 C
Mumbai
Friday, June 14, 2024
Homeसंपादकीयमुंबईच्या तारखेतला 'हा' काळा दिवस मुंबईकर कधीच विसरणार नाही

मुंबईच्या तारखेतला ‘हा’ काळा दिवस मुंबईकर कधीच विसरणार नाही

सागर गायकवाड : टीम लय भारी

मुंबई:- मुंबई म्हणजेच स्वप्नांची नगरी असे म्हटले जाते. पण याच स्वप्नानांच्या नगरीने खुप काही सहन केले आहे. पूर दहशतवादी हल्ले, आपत्कालीन दुर्घटना, दंगली, अशा बऱ्याच घटनांतून मुंबईला सावरायला वेळ लागला आहे. अशीच एक दुर्घटना घडली, ती 26 जुलै 2005 रोजी. हा दिवस संपूर्ण मुंबई कधीच विसरू शकणार नाही. मुंबई हा काळा दिवस कधीच विसरू शकत नाही. मुंबईकरांवर काळाने घात केलेल्या या काळ्या दिवसाला आज 16 वर्ष पूर्ण झाली (Mumbaikars will never forget this ‘black day’)

26 जुलै 2005 यादिवशी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राने निसर्गाचा रौद्ररूप पाहिले होते. पावसाने असा धुमाकुळ घातला होता की 24 तासांत संपूर्ण मुंबई पाण्याखाली गेली. काही तासांत मुंबईमध्ये 994 मीमी इतका पाऊस पडला. ज्यांनी 26 जुलै नाहक त्रास पाहिला त्यांच्या आयुष्यातील हा एक भयानक काळ होता. याचे दुष्परिणाम मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आले. कित्येक जीवितहानी झाली, करोडोच्या संपत्तीचा नायनाट झाला. मुंबई महापूराचे ते तीन दिवस आणि त्याचे झालेले परिणाम कधीच विसरू शकणार नाही. हा दिवस मुंबईकरांसाठी आणि संपूर्ण मुंबईसाठी काळा दिवस ठरला.

Mumbaikars will never forget this 'black day'
26 जुलै 2005 चा मुंबई महापूर

तळीये गावातील अजूनही 32 नागरिक बेपत्ता; मृतांचा आकडा 53 वर, बचाव कार्य सुरूचं

26 जुलै कारगिल विजय दिवस फोटो

मुंबईने सर्वात मोठी जीवितहानी करणारा पाऊस 26 जुलै 2005 रोजी अनुभवला होता. यामध्ये एक हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता, तर 14 हजार घरे उद्ध्वस्त झाली होती. 24 तासात तब्बल 944 मिली पाऊस पडला होता, मुंबईमध्ये गेल्या 100 वर्षातील हा सर्वाधिक पाऊस होता. 37 हजार रिक्षा, 4000 टॅक्सी आणि 900 बेस्ट बसेसचे नुकसान झाले होते, तर हजारो मोठी वाहने पाण्यात अडकली होती. ज्यामुळे 5.5 बिलियनचे नुकसान झाले होते (The rain was the biggest loss of life in Mumbai)

Mumbaikars will never forget 'this' black day
26 जुलै 2005 चा मुंबई महापूर

कुर्ला, धारावी या परिसरात तर अक्षरशः हाहाःकार माजला होता. लोकल रेल्वे ठप्प झाली होती, तसेच अनेक ट्रेनचे नुकसान झाले होते. आज सोशल मीडिया असल्यामुळे ट्वीट केले तरीही बीएमसी आणि रेल्वेकडून मदत पाठवली जाते, पण तेव्हा फेसबुक किंवा ट्विटरचा वापर नव्हता. शेकडो लोकांचा मदतीअभावी जीव गेला होता. पाण्यात अडकलेल्या लोकांना 24 तासांपेक्षा जास्त काळ घरी जाता आले नव्हते (mumbaikar trapped in the water could not go home for more than 24 hours).

Mumbaikars will never forget 'this' black day
26 जुलै 2005 चा मुंबई महापूर

महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना महाप्रलयाचा तडका, प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचे प्रदर्शन करावे

Good news! Water level in Mumbai’s seven lakes rise to 66.63 percent on July 26

मुंबईकरांचे स्पीरिट प्रत्येक संकटाच्यावेळी नेहमीच पाहायला मिळते. त्यावेळी मुंबईकरांनी एकमेकांना मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले होते. 26 जुलै 2005 हा काळ आपण सर्व कधीच विसरू शकणार नाही. पण प्रत्येक काळ हा नेहमी आपल्याला काही तरी शिकवून जातो. या काळातही मुंबईकर काहीतरी शिकले (But every time it always teaches us something).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी