27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeसंपादकीययंदाचा स्व. संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार महेश म्हात्रे यांना...

यंदाचा स्व. संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार महेश म्हात्रे यांना जाहीर

कर्जत – माथेरान प्रेस क्लबच्या माध्यमातून दिला जाणारा स्व. संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना जाहीर झाला आहे. गुरुवार दिनांक २५ एप्रिल रोजी माथेरान येथे आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. म्हात्रे यांच्या सोबत खोपोलीचे ज्येष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ आणि दैनिक सकाळचे प्रतिनिधी अजय कदम यांना सुद्धा जिल्हा आणि तालुका स्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख असणार आहेत.गेल्या दोन दशकात मराठी पत्रकारीतेला नवीन दिशा  देणारा आणि सतत नाविन्याचा शोध घेणारा तरुण संपादक अशी महेश म्हात्रे यांची ओळख आहे.

कर्जत – माथेरान प्रेस क्लबच्या माध्यमातून दिला जाणारा स्व. संतोष पवार (Santosh Pawar Memorial State Level Journalism Award ) स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे (Mahesh Mhatre) यांना जाहीर झाला आहे. गुरुवार दिनांक २५ एप्रिल रोजी माथेरान येथे आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. म्हात्रे यांच्या सोबत खोपोलीचे ज्येष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ आणि दैनिक सकाळचे प्रतिनिधी अजय कदम यांना सुद्धा जिल्हा आणि तालुका स्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख असणार आहेत.गेल्या दोन दशकात मराठी पत्रकारीतेला नवीन दिशा  देणारा आणि सतत नाविन्याचा शोध घेणारा तरुण संपादक अशी महेश म्हात्रे यांची ओळख आहे.(This year’s self. Santosh Pawar Memorial State Level Journalism Award to Mahesh Mhatre)

महेश म्हात्रे हे एक बहुआयामी  संपादक असून ते प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व वेब मीडियामध्ये, तसेच हिंदी आणि इंग्रजी माध्यमातही सहज आणि उत्तमपणे काम करू शकतात हे नजिकच्या काळातील त्यांच्या कामगिरीतून सिद्ध झाले आहे. महेश म्हात्रे यांनी आजवर संपादक म्हणून तरुण भारत मुंबई, तरुण भारत , नागपूर, सकाळ, नागपूर, लोकमत, मुंबई, वरिष्ठ संपादक इंडियन एक्सप्रेस, प्रहार, न्यूज 18 लोकमत अशा महत्त्वाच्या वृत्त संस्था मध्ये संपादक म्हणून काम केले आहे. सध्या ते महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरांचे अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारीतेच्या क्षेत्रात महेश म्हात्रे यांनी अनेक अतिशय मानाचे पुरस्कार मिळवले आहेत. जागतिक संपादक परिषद, विश्व वृत्त संघ अशा महत्त्वाच्या  संघटनांशी ते संलग्न आहेत.  अमेरिकेन अध्यक्षपद निवडणुकीच्या प्रत्यक्ष अनुभवापासून दक्षिण कोरिया आणि  इस्रायलच्या उच्च सदस्यीय शिष्टमंडळातील समावेशासह अनेक बहुमान त्यांना लाभले आहेत. जगभर नावाजलेली ‘टेड’ (TEDx) व्याख्यानमालेत भाषण करण्याची  संधी लाभलेले ते एकमेव मराठी संपादक आहेत.  ” मनमोगरा” हा त्यांचा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला आहे. पत्रकारीतेच्या क्षेत्रात महेश म्हात्रे यांनी अनेक अतिशय मानाचे पुरस्कार मिळवले आहेत. जागतिक संपादक परिषद, विश्व वृत्त संघ अशा महत्त्वाच्या  संघटनांशी ते संलग्न आहेत.  अमेरिकेन अध्यक्षपद निवडणुकीच्या प्रत्यक्ष अनुभवापासून दक्षिण कोरिया आणि  इस्रायलच्या उच्च सदस्यीय शिष्टमंडळातील समावेशासह अनेक बहुमान त्यांना लाभले आहेत. जगभर नावाजलेली ‘टेड’ (TEDx) व्याख्यानमालेत भाषण करण्याची  संधी लाभलेले ते एकमेव मराठी संपादक आहेत.  ” मनमोगरा” हा त्यांचा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी