27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपाच्या माध्यमातून यंदा शहरात 15 हजार भरपाई झाडे लावणार

नाशिक मनपाच्या माध्यमातून यंदा शहरात 15 हजार भरपाई झाडे लावणार

नाशिक शहराचा मागील काही वर्षांमध्ये झपाट्याने विकास झाला आहे. नाशिक मधील थंड वातावरण तसेच मुंबई -पुणे या सुवर्ण क्षिकोण मध्ये नाशिकचा समावेश होत असल्यामुळे नाशिक हा राज्यातील विकसित शहरामध्ये समावेश होऊ लागला आहे, दरम्यान शहरात दिवस गणित नवनवीन इमारती उभी राहत आहे. बांधकाम करण्यासाठी काही ठिकाणी जुनी झाडे काढण्याची वेळ येत्ो त्यामुळे कायद्यानुसार विकासक भरपाई झाडे लावतात. नाशिक शहरात मागील काही काळात झालेल्या विकास कामांमुळे झाडांची झालेली कत्तलच्या भरपाई पोटी शहरात यंदा सुमारे 15000 झाडे लावण्यात येणार आहे. त्यांची जबाबदारी स्वतः विकासक किंवा काही संस्था घेत आहे.

नाशिक शहराचा मागील काही वर्षांमध्ये झपाट्याने विकास झाला आहे. नाशिक मधील थंड वातावरण तसेच मुंबई -पुणे या सुवर्ण क्षिकोण मध्ये नाशिकचा समावेश होत असल्यामुळे नाशिक हा राज्यातील विकसित शहरामध्ये समावेश होऊ लागला आहे, दरम्यान शहरात दिवस गणित नवनवीन इमारती उभी राहत आहे. बांधकाम करण्यासाठी काही ठिकाणी जुनी झाडे (Trees) काढण्याची वेळ येत्ो त्यामुळे कायद्यानुसार विकासक भरपाई झाडे लावतात. नाशिक शहरात मागील काही काळात झालेल्या विकास कामांमुळे झाडांची झालेली कत्तलच्या भरपाई पोटी शहरात यंदा सुमारे 15000 झाडे ( Trees to be planted 15,000 ) लावण्यात येणार आहे. त्यांची जबाबदारी स्वतः विकासक किंवा काही संस्था घेत आहे.(Nashik Municipal Corporation to plant 15,000 compensation trees in city this year )

आतापर्यंत शहरात सुमारे 3000 झाडे लावण्यात आली असून झाडे लावण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मागील काही वर्षांमध्ये नाशिकचा चौफेर विकास झाला आहे. बाहेरून नाशिकमध्ये येऊन वास्तव्य करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे 2011 च्या जनगणनेनुसार नाशिक शहराची लोकसंख्या सुमारे 15 लाखाच्या जवळपास होती तर आता नाशिकची लोकसंख्या साधारण 25 लाखाच्या घरात पोहोचली आहे. याकाळात शहरात टोलेजंग इमारतींपासून बंगले, फ्लॅटची बांधकामे झाली आहे. अशा प्रकारे बांधकामे करतांना काही ठिकाणी झाडांचा अडथळा निर्माण होता, मात्र विकास ही महत्वाचा आहे व पर्यावरण देखील तीतकाच महत्वाचा असल्याने विकासकाला महापालिका रितसर परवानगी घेऊन विकास करण्याची परवागदी देत्ो. अशा वेळेला ज्या ठिकाणी विकास होत आहे त्या ठिकाणी जितके वर्षाचा झाड आहे तितक्या वर्षाप्रमाणे त्याची मोजणी करून एका वर्षासाठी एक याप्रमाणे झाडे लावण्याचा कायदा असल्याने विकासकाकडून त्ोव्हढी झाले लवून घेण्यात येत्ो. एखाद्या ठिकाणी समजा वीस वर्षे वयाचा झाड बांधकामामुळे तोडावे लागले तर त्या बदल्यात 20 झाडे लावण्याचे विकासकावर बंधन राहत्ो. अशा रीतीने नाशिक शहरात सुमारे 15000 झाडे लावण्यात येणार आहे.

झाडे लावण्यास सुरु
भरपाई झाडे लावण्याची सुरूवात शहरातील गंगापूर रोड सिरीन मिंडोज परिसरात्ूान झाली असून आतापर्यंत सुमारे 3000 झाड लावण्यात आली आहे. यामध्ये काही बँकांसह एनजीओ देखील पुढाकर घेत आहे. शहरातील ओपन स्पेस, उद्याने त्याचप्रमाणे ज्या काही खाजगी जागांवर उद्यानासाठी आरक्षण आहे अशा ठिकाणी झाडे लावण्यात येत आहे.

लावणाऱ्यांची जबाबदारी
ज्या ठिकाणी जो झाडे लावत आहे त्या झाडांची देखरेख करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांचीच राहणार आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने त्यावर लक्ष राहणार आहे. झाडे जगली पाहीजे हे महत्वाचे असल्याने मनपाकडून जागा देखील देण्यात येत्ो. यंदा 15 हजार भरपाई झाडे लावली जाणार असून सध्या तीन हजार झाडे लावण्यात आली आहे.
– विवेक भदाणे, उद्यान अधिक्षक, मनपा, नाशिक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी