29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeएज्युकेशनशाळा प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांसह पालकांना 'आधार' अनिर्वाय

शाळा प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांसह पालकांना ‘आधार’ अनिर्वाय

केंद्र आणि राज्य सरकारने कोणत्याही योजनेसाठी किंवा उपक्रमासाठी न्यायालयासमोर आधार सक्ती नसल्याची भूमिका वारंवार स्पष्ट केली असली तरी शिक्षण विभागाच्या आधार सक्तीच्या आश्वासनाचा तपशील वादात सापडण्याची शक्यता आहे.

शाळेत प्रवेश घेण्यासाठी आता विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही आधार कार्ड (Aadhar card) लिंक करावे लागणार आहे. बनावट विद्यार्थ्यांची पटसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. निवृत्त न्यायमूर्ती पी.व्ही. हरदास यांच्या अध्यक्षतेखाली रिक्त समिती स्थापन करण्यात आली. या समितीचा अहवाल स्वीकारून राज्य सरकारने (State Government) विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. (Aadhaar mandatory for parents and students for school admission)

राज्यात विशेषत: मराठवाडय़ात सन २०१०च्या दरम्यान बनावट पटसंख्या दाखवून कोटय़वधी रुपयांचे अनुदान अनेक शाळांनी लाटल्याची प्रकरणे उघडकीस आली होती. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी.व्ही. हरदास यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने १ जुलै २०२२ रोजी अहवाल सादर केला. त्यातील आलेल्या शिफारसींनुसार सरकारने या मार्गदर्शक सूचना काढल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने दिली.

याच अनुषंगाने बनावट विद्यार्थी संख्या दाखवून सरकारी अनुदान घेणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यासाठी आणि शाळा प्रवेशातील कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये आता शाळा व्यवस्थापन समित्यांकडे प्रवेश देखरेख समितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच ही समिती यापुढे शाळेच्या प्रवेश प्रक्रियेवर देखरेख आणि नियंत्रण ठेवणार आहे.

बोगस पटसंख्या शोधण्यासाठी शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख यांनी वर्षातून दोन वेळा शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची पटपडताळणी करावी. या पडताळणीत काही विसंगती आढळल्यास त्यांनी एक महिन्यात सखोल चौकशी करावी आणि त्यात दोषी आढळणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा असे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी करताना सबंधित शैक्षणिक संस्थेची आवश्यक नोंदवही आणि कागदपत्रे जप्त करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा : Aadhar Card Pan Card Link : 31 मार्च पूर्वी ‘हे’ काम करून घ्या अन्यथा पॅन कार्ड उपयोगाचे राहणार नाही!

आधारकार्ड सोशल मीडियावर शेअर करु नका; गैरवापर होत असल्याचा संशय असल्यास येथे करा संपर्क

UIDAI : युआयडीएआय लवकर आधारमध्ये काही बदल करण्याची शक्यता

नव्या मार्गदर्शक सूचना….

  • विद्यार्थाच्या शाळाप्रवेशावेळी पालकांकडून दोन प्रतींमध्ये अर्ज घ्यावा. त्यावर पालक आणि पाल्याचे छायाचित्र असावे.
  • प्रवेश अर्जाबरोबर विद्यार्थी आणि पालकांचे आधार कार्ड घ्यावे आणि हा प्रवेश आधार कार्डशी जोडण्यात यावा.
  • एखाद्या पालकाने अर्जासोबत आधार कार्ड दिले नसेल तर आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून प्रवेश द्यावा.
  • एखाद्या – पालकाने आधार कार्ड दिले नाही तर मुलाचा प्रवेश रद्द करण्याचे अधिकार आपोआपच शाळांना मिळतात.

वास्तविकपणे, केंद्र आणि राज्य सरकारने कोणत्याही योजनेसाठी किंवा उपक्रमासाठी न्यायालयासमोर आधार सक्ती नसल्याची भूमिका वारंवार स्पष्ट केली असली तरी शिक्षण विभागाच्या आधार सक्तीच्या या आश्वासनाचा तपशील वादात सापडण्याची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी