27 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeराजकीयअरेरे!! रुपालीताई, राष्ट्रवादीच्या कार्यालयात चाललंय तरी काय?

अरेरे!! रुपालीताई, राष्ट्रवादीच्या कार्यालयात चाललंय तरी काय?

सण-संस्कृतीच्या नावाखाली हा उथळ तमाशा थांबविणार कोण? - सोशल मीडियातून उपस्थित केले जाताहेत प्रश्न! दरम्यान, शुभम जायभावे या युझरने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मुद्दाम डिवचले आहे. "अमृता फडणवीस राजकिय क्षेत्रात सक्रिय नसतानासुध्दा त्यांच्या रिल्सवर ट्रोल करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सतरंज्याउचल्या कार्यकर्त्यांनी याकडे जरा लक्ष द्यावे😀" असे शुभमने म्हटले आहे. मात्र, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना खिजवणे हे भाजपच्या समर्थक, कार्यकर्त्यांना चांगलेच अंगाशी येण्याची चिन्हे दिसत आहेत. आता संपूर्ण ट्विट चर्चा ही अमृता फडणवीस यांच्यावर केंद्रीत झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील नाच-गाण्यावरून सोशल मीडियात चांगलीच चर्चा झडत आहे. अरेरे!! रुपालीताई, राष्ट्रवादीच्या कार्यालयात हे चाललंय तरी काय? असा प्रश्न नेटकरी करत आहेत. (Lavni Dance in NCP Office) सण-संस्कृतीच्या नावाखाली हा उथळ तमाशा थांबविणार कोण? असे प्रश्नही सोशल मीडियातून उपस्थित केले जात आहेत.

पुणे येथील रुपाली ठोंबरे पाटील यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात  नुकताच एक महिलांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावरून व्हिडिओ शेयर करत प्रविण अलई या युझरने प्रश्न उपस्थित केला आहे. तो म्हणतो, “काय, हे पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय?” अजून पुढे त्याने लिहिले आहे, “अरेरे, काय हा डान्स, राजकीय पक्षाच्या महिला भगिनींना हे अशोभनीय म्हणावे की पक्षाचा अजेंडा?” या युझरने सोशल मीडियात सक्रीय असणारे राष्ट्रवादीचे युवा नेते, आमदार रोहित पवार यांना टॅग करून जरा याकडे बघाल, असेही म्हटले आहे. याशिवाय, पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग करत त्याने टोमणाही मारला आहे. “राष्ट्रवादीचे कार्यक्रम आणि बाकी सगळं भारी चाललंय…! आवरा …आणि पक्षाला सावरा,” असे प्रविण अलई या युझरने म्हटले आहे. त्याने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनाही टॅग करत याकडे त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

Lavni Dance in NCP Office - 1 राष्ट्रवादीच्या कार्यालयात चाललंय तरी काय?
रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयातील नाच-गाण्यावरून आता राष्ट्रवादीच्या कार्यालयात चाललंय तरी काय? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

या ट्विटनंतर समर्थक आणि विरोधक अशी चांगलीच जुंपली गेली आहे. काही युझर मीम्स ट्विट करून रिप्लाय देत आहेत. आझाद नावाचा एक युझर अनारकली मधील बादशहाचा फोटो टाकून म्हणतोय, ” यह सब क्या हो रहा है सलीम हमारी सल्तनत में 👇🤣😂🤣” संतप्त समर्थकांनी मात्र टीका करणाऱ्याला चांगलेच धारेवर धरले आहे. हा महिलांसाठी आयोजित केलेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, पारंपारिक पेहरावात आहेत त्या, यात वाईट काय आहे? असा प्रश्न विशाल वाकचौरे यांनी उपस्थित केला आहे. आयन खान हा युझर म्हणतो, “रुपाली पाटील यांचे संपर्क कार्यालय आहे. तुम्ही मनातल्या-मनातही राष्ट्रवादी काँग्रेसवर असे आरोप कधीच करू नका, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जनतेचे प्रश्न सोडवण्याचेच काम केले जाते. देशहिताचे कार्यक्रम होतात, त्याशिवाय काहीच होत नाही.”

रमाकांत पांचाळ नावाचा युझर म्हणतो, “एखाद्या कार्यक्रमात त्यांना मनसोक्त नाचण्याचा आनंद घेता आला तर त्यात काय वाईट, आपल्या संस्कृतीप्रमाणे त्या व्यवस्थित साडी वैगेरे नेसून आनंद लुटत आहेत, तुम्ही पक्षीय राजकारण सगळीकडे का घुसवता?” या महिला भगिनींनी त्यांचा घरातील व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ काढून मौज-मस्ती केली तर काय बिघडले, असा सवाल सुमीत मोरेने केला आहे. यांच्यासारखे कार्यकर्ते आहेत म्हणून सगळ्याच पक्षांची कार्यालये चालू आहेत. घेऊ द्या आनंद, त्यात आपण पण सहभागी होऊया, असे सुमीत म्हणतो. “राजकारणात काम करणाऱ्या लोकांना वैयक्तिक आयुष्य असते की नसते. की सगळी कामे त्यांनी लोकांपासून दडवून अंधारात करायची?” असा प्रश्न सतीश पाटीलने केला आहे.

तोकड्या कपड्यात अमृता फडणवीस Amruta Fadanvis in Short Mini Skirt
अमृता फडणवीस यांचे तोकड्या कपड्यातील जुने फोटो पोस्ट करून आता चर्चा भलत्याच दिशेला जात आहे.

“अरे काही पण काय? जाऊन आधी तुम्ही संविधान वाचा,” असे सोहेल याने म्हटले आहे. नारी शक्ति आहे ती. तुम्ही नाही नाचत का? असा प्राशनही त्याने केला. तर शुभम जायभावे या युझरने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मुद्दाम डिवचले आहे. “अमृता फडणवीस राजकिय क्षेत्रात सक्रिय नसतानासुध्दा त्यांच्या रिल्सवर ट्रोल करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सतरंज्याउचल्या कार्यकर्त्यांनी याकडे जरा लक्ष द्यावे😀” असे शुभमने म्हटले आहे. मात्र, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना खिजवणे हे भाजपच्या समर्थक, कार्यकर्त्यांना चांगलेच अंगाशी येण्याची चिन्हे दिसत आहेत. आता संपूर्ण ट्विट चर्चा ही अमृता फडणवीस यांच्यावर केंद्रीत झाली आहे. “राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या गृहमंत्र्यांच्या पत्नी स्वतःचे गाण्याचे अल्बम काढतात, त्यात ते नाचतात-गातात, तेव्हा तुमचे हे विचार कुठे असतात..?” असा संतप्त सवाल श्रीकांत गुलहाणे याने केला आहे. महेंद्र तोरसकर म्हणतो, “येड्या, आधी मामीला आवर. ती तर शासकीय निवासंत रील बनवते. हे तर राष्ट्रवादी पक्षाचे खाजगी कार्यालय आहे.”

हे सुद्धा वाचा : 

अमृतामामी डोक्याने थोड्या कमी आहेत का? फडणवीस साहेब, बाईंना आवरा, समज द्या!

अजून तरी माझे मानसिक संतुलन ढासळले नाही ,अमृता फडणवीस

रुपाली पाटील कडाडल्या, “भाडखाऊ भाईजान” ला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे

Lavni Dance in NCP Office, Rupali Chakankar Questioned, Sankranti Video Viral, लावणी डान्स, राष्ट्रवादीच्या कार्यालयात चाललंय तरी काय?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी