32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeएज्युकेशनग्रॅज्युएट फार्मसी अप्टिट्यूड टेस्ट (जीपॅट) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळवून देण्यासाठी केंद्र...

ग्रॅज्युएट फार्मसी अप्टिट्यूड टेस्ट (जीपॅट) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे साकडे

ग्रॅज्युएट फार्मसी अप्टिट्यूड टेस्ट (जीपॅट) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आमदार देवयानी फरांदे व आमदार राहुल ढिकले यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे साकडे. केंद्र सरकारने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (जीपॅट) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देण्यात येणारी विद्यावेतन (स्टायपेंड) अचानकपणे बंद केली आहे. त्यामुळे अनेक होतकरू व गरजु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान होत आहे. पदव्युत्तर फार्मसीचा रिसर्च प्रोजेक्ट आणि इतर शैक्षणिक खर्च मोठा असतो, तो सर्वांना पेलला जात नाही.

ग्रॅज्युएट फार्मसी अप्टिट्यूड टेस्ट (जीपॅट) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आमदार देवयानी फरांदे व आमदार राहुल ढिकले यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे साकडे. केंद्र सरकारने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (जीपॅट) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देण्यात येणारी विद्यावेतन (स्टायपेंड) अचानकपणे बंद केली आहे. त्यामुळे अनेक होतकरू व गरजु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान होत आहे. पदव्युत्तर फार्मसीचा रिसर्च प्रोजेक्ट आणि इतर शैक्षणिक खर्च मोठा असतो, तो सर्वांना पेलला जात नाही. अशातच केंद्र सरकारने हि विद्यावेतन अचानकपणे बंद केल्याने राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील फार्मसी चे विद्यार्थी अडचणीत आले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे गेल्या वर्षभरात शेकडो ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (जीपॅट) पात्र उमेदवारांना स्टायपेंडपासून वंचित ठेवण्यात आले असल्याची माहिती देत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) देशभरातील एम. फार्म. अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जीपॅट परीक्षा देशपातळीवर आयोजित करते. चाचणी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्यांना दोन वर्षांसाठी रु.१२,४००/- मासिक विद्यावेतन दिले जाते. साधारणपणे, स्टायपेंड प्रवेशानंतर तीन महिन्यांनी विद्यार्थ्यांनाना टायपिंग दिले जात होते. यामध्ये उच्च दर्जाच्या कॉलेजमध्ये एम. फार्मसी करण्याचे स्वप्न आणि जीपॅट परीक्षा पास होण्यासाठी मागील ०४ वर्ष केलेला अभ्यास आणि घेतलेले कष्ट केंद्र सरकारने विचारात घ्यावे.अशी विनंती आमदार देवयानी फरांदे यांनी केलेली आहे. कॉलेजची एवढी जास्त फी आणि शिक्षणासाठी बाहेरगावी आलेले विद्यार्थी, त्याचबरोबर राहण्याचा आणि खाण्याचा खर्च भागावा एवढी भक्कम आर्थिक परिस्थिति हजारो विद्यार्थ्यांची निश्चितच नाही. आपल्याला रु.१२४००/- प्रति महिना दोन वर्षांसाठी मिळणार याच आशा-अपेक्षांवर जवळपास ७००० विद्यार्थ्यांनी जीपॅट परीक्षा पास करून एम. फार्मसीला प्रवेश घेतलेले आहे. बी.फार्मसी च्या विद्यार्थ्यांना जीपॅट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मिळणारी विद्यावेतन (स्टायपेंड) मागील काही महिन्यांपासून मिळालेली नसल्याने विद्यार्थी हे देशभर आंदोलन करत असल्याचे दोन्ही आमदारांनी सांगितले. राज्यातील सुमारे ३००० उमेदवार दरवर्षी हि परीक्षा उत्तीर्ण होतात. मात्र गेल्या एक वर्षापासून जीपॅट पात्र उमेदवार स्टायपेंडच्या प्रतीक्षेत आहेत. स्टायपेंड ही विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात यशस्वी होण्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. मात्र केंद्र सरकार या निर्णयामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर फार्मसीच्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत असल्याची बाब मध्ये मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली.

आपण ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (जीपॅट) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेले आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी