31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमुंबईमातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे सरकारचे ध्येय:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे सरकारचे ध्येय:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा केली. मातंग समाज हा एक मेहनती, प्रामाणिक आणि शब्द पाळणारा समाज आहे. मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे सरकारचे ध्येय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.मुंबई येथे काल दि ०१ मार्च रोजी संध्याकाळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी मातंग समाजाच्या वतीने सरकारचे आभार मानण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता , त्या प्रसंगी ते बोलत होते . यावेळी राज्यभरातून आलेल्या मातंग समाज बांधवांशी त्यांनी संवाद साधला.

विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा केली. मातंग समाज हा एक मेहनती, प्रामाणिक आणि शब्द पाळणारा समाज आहे. मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे सरकारचे ध्येय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.मुंबई येथे काल दि ०१ मार्च रोजी संध्याकाळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी मातंग समाजाच्या वतीने सरकारचे आभार मानण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता , त्या प्रसंगी ते बोलत होते . यावेळी राज्यभरातून आलेल्या मातंग समाज बांधवांशी त्यांनी संवाद साधला. मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे सरकारचे ध्येय असून त्याच उद्देशाने अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून समाजातील तरुण , तरुणींना उच्च शिक्षण घेता यावे, स्पर्धा परीक्षेत सहभाग घेऊन मोठ्या पदावर रुजू होता यावे यासाठी काम केले जाईल. कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला .

आजच अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून उद्या लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यातील स्मारकाचे भूमिपूजन माझ्या हस्ते होणार आहे, हा एक योगायोग असल्याचे मत शेवटी बोलताना त्यांनी सांगितले ,
यावेळी आयोजित कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री श्री शंभूराज देसाई, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्यासह मातंग समाजाच्या विविध संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मातंग समाजाच्या विविध संघटनानी याप्रसंगी शासनाचे आभार व्यक्त केले करून या निर्णयाचे स्वागत केले आहे .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी