28 C
Mumbai
Monday, July 24, 2023
घरएज्युकेशनउत्कंठा वाढली, दहावीचा निकाल कधी लागणार ?

उत्कंठा वाढली, दहावीचा निकाल कधी लागणार ?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एसएससी 10 वी 2023 परीक्षेचा निकालाच्या प्रतिक्षेत विद्यार्थी आणि पालक आहेत. नुकताच 12 वीचा निकाल लागला असून आता 10 वीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल अशी शक्यता आहे. अनेक विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा असून दहावी नंतर कुठे प्रवेश घ्यायचा याची चाचपणी देखील विद्यार्थी, पालकवर्ग करत आहे.

2 मार्च ते 25 मार्च दरम्यान दहावीची बोर्ड परीक्षा पार पडली होती. आता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 10 वीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा 32 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल 17 जून रोजी जाहीर झाला होता. गेल्यावर्षी 96.94 टक्के विद्यार्थी दहावीची परीक्षा पास झाले होते.

गेल्यावर्षी मुलींनी दहावीच्या परीक्षेत बाजी मारली होती. 95.35 टक्के मुली दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या तर 93.29 टक्के मुले उत्तीर्ण झाली होती. गेल्यावर्षी दहावीच्या निकालात घट झाली होती. सन 2021 मध्ये 99.95 टक्के विद्यार्थी दहावीमध्ये उत्तीर्ण झाले होते. सन 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे शिक्षण मंडळाने दहावीची बोर्ड परीक्षा न घेता वैकल्पीक मुल्यांकनावर आधारीत निकाल जाहीर केला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थी दहावी पास झाले होते.

हे सुद्धा वाचा

कुत्र्याचे झाले निधन, मालकाने घातले वर्षश्राद्ध

शरद पवारांनी निवृत्त IAS अधिकाऱ्याला दिले मानाचे स्थान !

मोठी बातमी : परदेशी महिलेसोबत खोडसाळपणा करणाऱ्याला दोन वर्षाचा तुरूंगवास !

दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून mahresult.nic.in आणि mahahsscboard.in. या संकेतस्थळांवर दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. दहावीचा निकाल संकेतस्थळावर पाहण्यासाठी mahresult.nic.in साईटवर क्लिक करा. या संकेतस्थळावर SSC Examination March – 2023 Result या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा परीक्षा क्रमांक टाका, त्यानंतर आईचे नाव टाका. त्यानंतर View Result या बटनावर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी