29 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रकुत्र्याचे झाले निधन, मालकाने घातले वर्षश्राद्ध

कुत्र्याचे झाले निधन, मालकाने घातले वर्षश्राद्ध

कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. विविध प्रजातींचे कुत्रे पाळण्याची आपल्याकडे अनेकांना आवड असते, नव्हे तर ठाणे जिल्ह्यात अनेकांनी कुत्र्यांचे वाढदिवस धूमधडाक्यात साजरे केले आहेत. असाच एक पाळीव कुत्रा वर्षभरापूर्वी मरण पावला. त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी त्याच्या मालकाने चक्क रविवारी वर्षश्राद्ध घातले. हे वर्षश्राद्ध सध्या ठाण्यात चर्चेचा, कुतूहलाचा विषय झाला आहे.

ठाण्याच्या खोपट येथील दर्शन टॉवरमध्ये राहणाऱ्या किरण जयवंत जाधव यांच्या घरी असलेल्या ‘शीरो’ या पोमेलीयन प्रजातीच्या कुत्र्याचं रविवारी वर्षश्राद्ध ठाण्याच्या कोपनेश्वर मंदिरामध्ये करण्यात आले. किरण जाधव यांचा मुलगा केतन यांनी हे कार्य केले. गुरुजी सचिन कुलकर्णी यांनी विधीवत हे कार्य पार पाडले. या कुत्र्याचं निधन गेल्यावर्षी 28 मे ला झालं होतं. त्यावेळी माणसाप्रमाणे त्याचे विधी करण्यात आले होते. शीरो हा गेली पंधरा वर्षे त्यांच्या घरामध्ये घरातल्या सदस्यासारखा राहत होता. जाधव कुटुंब त्याच्यावर मुलासारखे प्रेम करत होते. २८ मे २०२२ मध्ये त्याने प्राण सोडला अन् जाधव कुटुंबाचा काळजाचा ठोका चुकला. त्याचे अंत्यसंस्कार त्यांनी माणसासारखे केले. शिवाय वर्षश्राद्धही घातले.

हे सुद्धा वाचा

गौतमी पाटीलचा नाच, अन् जळणाऱ्यांचा थयथयाट !

गौतमी पाटीलचा नाच, अन् जळणाऱ्यांचा थयथयाट !

शरद पवारांनी निवृत्त IAS अधिकाऱ्याला दिले मानाचे स्थान !

कुत्रा हा इमानी प्राणी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्याला अनेकजण घरात पाळतात. मेंढपाळ कुत्रे जवळ बाळगतात. मेंढ्यांचे तो शत्रूपासून रक्षण करतो. पूर्वी राजे मंडळी शिकार करण्यासाठी कुत्र्याला सोबत घेऊन जायचे. शहरी भागात सध्या भटकी कुत्रे चिंतेचा विषय झालेला असताना अनेक भूतदयावादी/ पर्यावरणप्रेमी कुत्र्यांना खाऊ पिऊ घालतात. निसर्गाचा एक भाग असलेले कुत्रे अनेकांना आवडतात, तर काहींना ते त्रासदायक वाटतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी