29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeएज्युकेशनराज्यात तलाठी भरती जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा

राज्यात तलाठी भरती जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा

बहुचर्चित आणि अनेक दिवसांपासून रखडलेली तलाठी भरतीची जाहिरात आता प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र महसूल आणि वन विभाग यांतर्फे तलाठी आणि लघुलेखक या पदांकरिता रिक्त जागा भरण्यात येणार आहे. एकुण 4625 इतक्या जागांसाठी रिक्त पदांची घोषणा केली आहे. यासाठी उमेदवाराने पदवीचे शिक्षण उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. अधिक माहिती लवकरच अधिकृत वेबसाईटवर प्रसिध्द केली आहे. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची असेल. या पदासाठी इच्छुक असलेले पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट mahaonline.gov.in वर जाऊन नोंदणी करू शकतात.

राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांत ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. तलाठी भरती परीक्षेत इंग्रजी, बुद्धिमत्ता, गणित, मराठी असे एकूण 4 सेक्शन असतील आणि प्रत्येक विषय 25 प्रश्नांचा असेल प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील म्हणजे संपूर्ण पेपर 100 प्रश्न आणि 200 गुणांचा आहे. ही परिक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर यादरम्यान होणार आहे.

महाराष्ट्र तलाठी भरती 2023 पात्रता निकष अर्ज तपशील

पात्रता तपशील : उमेदवाराने कोणत्याही शाखेमधून पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : इच्छुक उमेदवारांचे किमान वय 18 वर्ष ते कमाल वय 38 वर्ष अपेक्षित आहे.

निवड प्रक्रिया : ही निवडप्रक्रिया सरळसेवा पद्धतीची असुन यामध्ये फक्त लेखी परिक्षा होईल. त्यानंतर कागदपत्रं पडताळणी होतील.

विभाग आणि पदसंख्या :
नाशिक : 1035
कोकण : 731
नागपूर 580
औरंगाबाद 847
अमरावती 183
पुणे 746

हे सुद्धा वाचा

उडिसा रेल्वे अपघातानंतर रुळावर सापडली उत्कट प्रेम कवितांची वही

जबरा फॅन ! धोनीच्या चाहत्याने चक्क लग्नपत्रिकेवर छापला फोटो

सोनियासमोर नाक घासलं, आठवत नाही का ?, संजय राऊतांवर नरेश म्हस्के यांनी सोडला बाण !

महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी अर्ज कसा भरावा ?
1. mahaonline.gov.in रिक्रूटमेंटच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. वेबसाइटवरील भर्ती विभागाद्वारे तलाठी भरती जाहिरातीवर क्लिक करा आणि डाउनलोड करा.
3. त्यानंतर अर्ज ऑनलाइन लिंकवर क्लिक करा.
4. तुमची आवश्यक माहिती भरा आणि स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स अपलोड करा.
5. शेवटी, ऑनलाइन अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट घ्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी