36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeक्रिकेटजबरा फॅन ! धोनीच्या चाहत्याने चक्क लग्नपत्रिकेवर छापला फोटो

जबरा फॅन ! धोनीच्या चाहत्याने चक्क लग्नपत्रिकेवर छापला फोटो

या आयपीएल हंगामाने पुन्हा एकदा क्रिकेटर एम एस धोनीचा क्रिकेटप्रेमींवर प्रभाव वाढवला आहे. काही चाहते असे असतात की ते सर्व मर्यादा ओलांडतात. माजी भारतीय संघ कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अशाच एका चाहत्याची सध्या खूप चर्चा होत आहे. धोनीच्या या चाहत्याने स्वत:च्या लग्नपत्रिकेवर धोनीचा फोटो लावला आहे.
@itsshivvv12 या ट्विटर वापरकर्त्याने या लग्नपत्रिकेचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “CSK #yellove ताप अजून संपलेला नाही. #chhattisgarh मधील @msdhoni चा एक चाहता मुलगा धोनीचा चेहरा, #Jersey no 7 त्याच्या लग्नपत्रिकेवर छापलेला आहे आणि #ChennaiSuperKings कॅप्टन‍ #MSDhoni𓃵 #thala #Dhoni” ला आमंत्रण.
ही व्यक्ती छत्तीसगढमधील रायगड जिल्हयातील रहिवासी आहे. पत्रिकेवर त्याचे नाव दिपक लिहिले आहे. त्याच्या भावी पत्नीचे नाव गरिमा आहे. दिपकचा विवाह 7 जून रोजी आहे. ते कार्ड देऊन दिपकने महेंद्रसिंग धोनीलाही त्याच्या लग्नाचे आमंत्रण दिले आहे.

हे सुध्दा वाचा :

नोकरीची संधी !!! इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये दहावी/बारावीसाठी अप्रेंटिस भरती

अरबी समुद्रात चक्रीवादळ; मुंबई, ठाण्यात पाऊस कधी पडणार ?

World Environment Day : या साध्या सोप्या गोष्टीतून देखील तुम्ही निसर्गाची हानी टाळू शकता

धोनीवर प्रेम दाखवण्याचा हा नवीनतम मार्ग आहे. असे शिवानी नावाच्या युजरने लिहिले आहे. धोनीच्या चाहत्यांकडे उत्तर नाही, असे एका नव्या युजरने लिहिले आहे. इतके प्रेम मिळाल्यानंतर धोनीला त्याची जबाबदारी ही वाढत आहे. मात्र, चाहत्यांनी लग्नपत्रिकेवर कुणाचा फोटो छापण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि इतर नेते, अभिनेते आणि खेळांडूचे फॅन्सचे फोटो लग्नपत्रिकेवर छापण्यात आले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी