33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeएज्युकेशनमिशिगन-मार्सल फॅमिली स्कूल ऑफ एज्युकेशनच्या संयुक्त विद्यामाने भारतीय शिक्षक आणि शालेय परिषद

मिशिगन-मार्सल फॅमिली स्कूल ऑफ एज्युकेशनच्या संयुक्त विद्यामाने भारतीय शिक्षक आणि शालेय परिषद

मिशिगन-मार्सल फॅमिली स्कूल ऑफ एज्युकेशन, ग्लोबस्टार कन्सल्टिंग सर्व्हिसेसच्या संयुक्त विद्यमाने 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत मुंबई आणि दिल्ली येथे होणाऱ्या परिषदेचे नेतृत्व मिशिगन विद्यापीठातील प्रतिष्ठित मार्सल फॅमिली स्कूल ऑफ एज्युकेशन आणि टॉबमन कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तसेच अर्बन प्लॅनिंगमधील अनुभवी प्राध्यापकांकडून केले जाईल. मुंबई आणि दिल्ली येथे प्रत्येकी 3 दिवस आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत कार्यशाळा, केस स्टडी आणि पॅनेल चर्चा यांचा समावेश असेल. शैक्षणिक कार्याबाबत सन्मान करण्यासाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी एज्युकेशन डिलिजेन्स अवॉर्ड्स (EDA) सह कार्याची सांगता होईल. मिशिगन विद्यापीठातील टॉबमन स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड अर्बन प्लॅनिंगमधील कुलगुरू जोनाथन मॅसी, डीन एलिझाबेथ मोजे यांच्यासमवेत प्रत्येक ठिकाणी 3 ऱ्या दिवसाचा शैक्षणिक समारोप करतील.

भारतात सुमारे 280 दशलक्ष मुले शाळेत जातात आणि त्यांची देखभाल करण्यासाठी सुमारे 9 दशलक्ष शिक्षक आहेत. UNESCO चा “2021 स्टेट ऑफ द एज्युकेशन रिपोर्ट फॉर इंडिया”चा आहवाल पाहता, देशामध्ये 1 दशलक्ष शिक्षकांची कमतरता असल्याचं जाणवू लागते. याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर आणि गुणवत्तेवर होताना दिसतो. या शिखर परिषदेचे उद्दिष्ट देशभरातील 120 शाळांना शिक्षण प्रक्रियेत सहभागी करून घेणे आणि शाळा आणि वर्गखोल्यांवर सकारात्मक प्रभाव टाकण्यासाठी त्यांना ज्ञान आणि विचारांनी सक्षम करणे आहे.

प्रामुख्याने शाळेचे संस्थापक, संचालक, शाळांचे प्रमुख, मुख्याध्यापक आणि महत्त्वाकांक्षी शिक्षकांसाठी असलेल्या या शिखर परिषदेमध्ये अभ्यासक्रम विकास, शिस्तबद्ध साक्षरता आणि AI, नाविन्यपूर्ण शिकवण्याचा दृष्टीकोन, शाळा प्रशासनातील सर्वोत्तम पद्धती आणि तंत्रज्ञान एकत्रीकरण या विषयांचा समावेश असेल.

यावर एलिझाबेथ बिर मोजे, डीन, मार्सल फॅमिली स्कूल ऑफ एज्युकेशन, म्हणाल्या, “मार्सल फॅमिली स्कूल ऑफ एज्युकेशनमधील आमचे ध्येय म्हणजे सध्याच्या शिक्षणप्रणालीतील काही उणीव काळजीपूर्वक ओळखून आणि त्या दूर करून शिक्षणाचा दर्जा वाढवावा. धवल मेहता, सीईओ आणि संस्थापक, ग्लोबस्टार एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि टीएनआय करिअर समुपदेशन, म्हणाले, “ग्लोबस्टारची स्थापना शैक्षणिक संस्थांना, शाळा आणि विद्यापीठांना, त्यांनी देत असलेल्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि करिअरच्या शक्यता, एकूण विद्यार्थ्यांचा अनुभव सुधारण्याच्या उद्देशाने केली होती.

भारतातील अशा प्रकारच्या पहिल्या शैक्षणिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यास आम्ही उत्सुक आहोत. मी भारतातील शाळांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करू इच्छितो कारण आम्ही भारतातील शिक्षणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सर्वोत्तम पद्धती आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन शोधत आहोत. सत्रामध्ये 15 हून अधिक शाळांचा सक्रिय सहभाग होता ज्यात बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूल, डीपीएस मथुरा रोड, हेरिटेज स्कूल वसंत कुंज, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ एक्सलन्स पुणे, कॅनेडियन इंटरनॅशनल स्कूल आणि इतर अनेक नावांचा समावेश होता.

परिषदेच्या नोंदणीसाठी या लिंकवर क्लिक करा

https://globestarcs.com/um-marsal-globestar-education-summit-2024  तसेच अधिक माहितीसाठी [email protected] / +91-91678 64136/37 या मेलशी संपर्क साधा.

परिषदेमध्ये भाग घ्यायचा असल्यास पासची आवश्यकता

लवकर पास घेतल्यास 1,25,000/- +18% GST
उशीरा पास घेतल्यास 1,50,000/- +18% GST
शालेय पासचे पॅकेज – 3,25,000/- + 18% GST

लवकर पास घेतल्यास (Early pass) शेवटचा दिवस 30 डिसेंबर आहे, तर उशीरा पास घेतल्यास ( Late Pass) घेतल्यास अंतिम तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी