28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला

महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला

राज्यातील अनेक प्रकल्प आता गुजरातला घेऊन चालल्याचं पाहायला मिळत आहे. याचा मोठा फटाका मुंबईला तर पडला आहेच, मात्र आता याचा मोठा फटाका कोकणाला देखील पडला आहे. या पर्यटन क्षेत्राला पडला आहे. अशातच आता काही दिवसांआधी मुंबईचे काही प्रकल्प सरकारने गुजरातला वळवले आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील हिऱ्याचे प्रकल्प, वेदांत प्रकल्प गुजरतला चालवल्याने मुंबईतील नागरिक अस्वस्थ असून नोकऱ्यांमध्ये घट पाहायला मिळाली आहे. अशातच आता कोकणातील सिंधुदुर्ग येथील पाणबुडी गुजरातला घेऊन जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

गेल्या काही वर्षापासून सिंधुदुर्ग पर्यटनाला केवळ पर्यटनाचा विकास करण्याबाबत आश्वासनांचे गाजर दाखवयाचे काम सुरू आहे. सी वर्ल्ड, हाऊस बोट, पर्यटनासाठी विराट युद्धनौका अशा एका ना अनेक पर्यटनाचा विकास होण्याला मदत होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र यावर कोणतंही ठोस पाऊल उचललं गेलं नाही. अशातच देशातील २०१८ साली पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. निवती रॉक्स जवळील समुद्रामध्ये पाण्याखालील अंतरंग न्याहाळण्याची या प्रकल्पामध्ये योजना होती. आता हा प्रकल्प गुजरात सरकारने हातात घेतला असून महाराष्ट्रातील पानबुडी गुजरातला घेऊन जाणार असल्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचा

आयपीएल खेळणारा नेपाळचा पहिला क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात, बलात्काराचा गंभीर आरोप

ऋषभ पंतसाठी एका वर्षांआधी आजचा दिवस ठरला दैवबलवत्तर

‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटात थ्री इडियट्समधील चतुरचं पदार्पण

 

भारताच्या पर्यटन क्षेत्रामध्ये पाणबुडीची संकल्पना पहिल्यांदा मांडण्यात आली होती. या प्रकल्पासाठी ५६ कोटी निधी मंजूर झाला. मात्र अशा स्थितीमध्ये वेळोवेळी बदलणारे मंत्री, बदलते सचिव आणि वर्षाला बदलणारे पर्यटन खात्याचे व्यवस्थापकीय संचालक या गोंधळामुळे सिंधुदुर्गचा पाणबुडी प्रकल्प असूनही आता सिंधुदुर्ग आणि रज्याकरता असूनही नसल्यासारखा आहे.

सरकार बदलत असल्याने केवळ सिंधुदुर्ग नाहीतर कोकणातील इतर ठिकाणीही पर्यटनाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. मात्र बदलत्या सरकारमुळे हा प्रश्न उपस्थित होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता पाणबुडीचा प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन जात असल्यानं सिंधुदुर्ग वासियांच्या हाता तोंडाशी आलेला घास आता सरकारने अलगदरीत्या काढला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी