36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeएज्युकेशनपोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे युपीएससी परीक्षेत यश; पोलीस आयुक्तांनी केला सत्कार

पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे युपीएससी परीक्षेत यश; पोलीस आयुक्तांनी केला सत्कार

आज केंद्रीय लाकसेवा आयोगाच्या सन 2022 परीक्षेचे निकाल जाहीर झाले. देशात पहिल्या चार मुली तर राज्यात देखील पहिला क्रमांक मुलीनेच पटकावला असून यंदाच्या युपीएससी निकालात मुलींचा डंका असल्याचे दिसून आले. राज्यात जवळपास 70 विद्यार्थी युपीएससी परीक्षा पास झाले आहेत. त्यामध्ये श्रुती कोकाटे ही 608 व्या रँकने युपीएससी परिक्षेत उत्तीर्ण झाली आहे.

श्रुती कोकाटे ही नवी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांची कन्या आहे. वडील पोलीस अधिकारी असून मुलीने वडिलांप्रमाणेच नागरीसेवेतून जणसेवेचा वसा आता हाती घेतला आहे. श्रुती कोकाटे हीने युपीएससी परीक्षेत यश मिळवल्याबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारबे यांनी तिचा सत्कार केला आणि भावी वाटचालीस देखील शुभेच्छा दिल्या.

पोलीस सेवेत असताना अनेकदा रात्रंदिवस कामावर रहावे लागते, जनतेच्या सुरक्षेची काळजी घेताना जितका वेळ मिळेल तेवढा वेळ काढून पोलीस कर्मचारी मुलाबाळांना घडवत असतात. मुलांनी मोठं व्हाव अस अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वप्न असते. अशा आईवडिलांप्रमाणेच सुभाष कोकाटे यांनी देखील आपल्या मुलांवर संस्कार केले. त्याच संस्काराचे मोती घेऊन श्रुतीने आज युपीएससी सारख्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.

हे सुद्धा वाचा

वडिलांची चहाची टपरी, आई विडीकामगार पोरानं पांग फेडलं; मंगेश खिलारीचे युपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश

UPSC परीक्षेत कश्मिरा संखे महाराष्ट्रातून पहिली

UPSC परीक्षेत इशिता किशोर देशात पहिली; पहिल्या चार क्रमांकावर मुलींची बाजी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी