30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeएज्युकेशनDiploma Engineering: डिप्लोमा अभियांत्रिकीसाठी विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद!

Diploma Engineering: डिप्लोमा अभियांत्रिकीसाठी विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद!

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी ३० सप्टेंबर रोजी प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली. पदविका अभ्यासक्रमांच्या एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या २०१८-१९ मध्ये ४१ टक्के होती, ही टक्केवारी २०१९-२० मध्ये ५० टक्के, २०20-२1 मध्ये 6० टक्के व २०21-२2 मध्ये 7० टक्के होती. या वर्षी 2022-23 मध्ये विद्यार्थ्यांनी पदविका अभ्यासक्रमांना विक्रमी प्रतिसाद दिलेला आहे. राज्यात २०२2-२3 मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या 85 टक्के झालेली आहे.

राज्यातील पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मागील चार वर्षांपासून भरघोस प्रतिसाद दिलेला आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता एकुण प्रवेशक्षमता जवळपास 1,00,000 आहे. पदविका अभ्यासक्रमांना एकुण ८४,४52 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. विभागनिहाय विचार केल्यास अमरावती विभाग 91%, औरंगाबाद विभाग 86%, मुंबई विभाग 82%, नागपुर विभाग 68%, नाशिक विभाग 78% व पुणे विभाग 90% असे प्रवेश झालेले आहेत. संपुर्ण राज्यात पदविका अभ्यासक्रमांना विक्रमी प्रतिसाद मिळालेला आहे.

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी ३० सप्टेंबर रोजी प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली. पदविका अभ्यासक्रमांच्या एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या २०१८-१९ मध्ये ४१ टक्के होती, ही टक्केवारी २०१९-२० मध्ये ५० टक्के, २०20-२1 मध्ये 6० टक्के व २०21-२2 मध्ये 7० टक्के होती. या वर्षी 2022-23 मध्ये विद्यार्थ्यांनी पदविका अभ्यासक्रमांना विक्रमी प्रतिसाद दिलेला आहे. राज्यात २०२2-२3 मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या 85 टक्के झालेली आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अभिनंदन –

मागील तीन वर्षांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये सलग १० टक्के वाढ व या चौथ्या वर्षी 15 टक्के वाढ झालेली आहे. याबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व संस्थांनी व अध्यापकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे व त्यामुळे पदविका अभ्यासक्रमाचा प्रवेशाचा चढता आलेख कायम ठेवणे शक्य झाल्याचे नमुद केले. या प्रसंगी प्राप्त झालेल्या यशाबद्दल त्यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले. तसेच डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचे विशेष कौतुक केले.

मागील चार वर्षांपासून पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश वाढविण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रशिक्षण संचालनालयाच्या निर्देशानुसार, राज्यातील तंत्रनिकेतनांद्वारे “स्कूल कनेक्ट” हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. समुपदेशन सभा, जनजागृती मोहीम, जाहिराती, रेडिओ मुलाखती अशा विविध उपक्रमाद्वारे संस्थांनी आपले योगदान दिले आहे. हे सर्व उपक्रम उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्या कुशल नेतृत्वामुळे शक्य झालेले आहेत.

तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार, करिअर आणि रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षण देण्याचा तसेच तंत्र शिक्षण देणाऱ्या संस्थाना उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी यापुढेही असे दर्जेदार उपक्रम निरंतर सुरु ठेवण्यात येतील. राज्यातील तंत्रशिक्षणाशी संबंधित विद्यार्थी, पालक, संस्था, उद्योगधंदे, विद्यापीठे इत्यादी अशा सर्वच संबंधितांकडून सहकार्य, समन्वय, सहयोग यापुढेही सुरु रहावा, अशी अपेक्षा आहे; असे मत डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्रशिक्षण यांनी व्यक्त केले.

1. “स्कुल कनेक्ट” हा उपक्रम प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांतील प्रवेश वाढीसाठी राबविणे:-

• मागील चार वर्षांपासून पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश वाढविण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रशिक्षण संचालनालयच्या निर्देशानुसार, राज्यातील तंत्रनिकेतनांनी समुपदेशन सभा, जनजागृती मोहीम, जाहिराती, रेडिओ मुलाखती अशा विविध उपक्रमाद्वारे आपले योगदान दिले आहे.

• “स्कुल कनेक्ट” हा उपक्रम शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन अथवा विविध माध्यमांचा वापर करुन ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आलेला होता.

• या उपक्रमाअंतर्गत परिसरातील विविध शाळांच्या हेडमास्तर व शिक्षकांची शिक्षणाधिकारी यांचे समवेत बैठक तसेच शाळांच्या विद्यार्थ्यांकरीता विज्ञान प्रदर्शन, रोजगार मार्गदर्शन, समुपदेशन मेळावे आयोजित करण्यात येतात.

• परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांची तंत्रनिकेतनातील विविध विभागांना भेट आयोजित करण्यात येते, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात तंत्रशिक्षणाच्या विविध शाखांबाबत उत्सुकता निर्माण होते.

• शाळेतील मुलांना तंत्रनिकेतनांमधील लॅब, क्लासरूम, प्रोजेक्ट, विस्तृत परिसर, प्लेसमेंट दाखवणे, शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घडवणे, गावोगावी जाऊन करिअर फेअर आयोजन करणे, स्थानिक वर्तमानपत्र, केबल टि. व्ही. वर जाहिरात, स्थानिक FM Radio वर कार्यक्रम आयोजित करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येतात.

• दहावी (SSC) च्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांना प्रवेश प्रक्रियांची माहिती पुरवण्यात येते.

• शैक्षणिक वर्ष २०२2-२3 च्या प्रवेशवाढीसाठी तंत्रनिकेतनांनी राज्यातील 36 जिल्ह्यामधील 358 तालुकांमधील 12083 शाळांमध्ये जाऊन हा उपक्रम राबविला. सुमारे 6.5 लाख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.

• अशा सर्व प्रवेशइच्छुक विदयार्थ्यांना संचालनालयामार्फत एसएमएस द्वारे (SMS) प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकासंबंधी माहिती पाठविण्यात आलेली होती. मा. मंत्रीमहोदय यांचे संदेश विद्यार्थ्यांना पोहचविण्यात आलेले होते.

• संचालकांनी प्रवेशप्रक्रियेच्या कालवधीमध्ये सहसंचालकांकडुन प्रवेशप्रक्रियेचा आढावा घेताना 8 बैठकांचे आयोजन केले होते. तसेच प्रत्येक सहसंचालक व नोडल अधिकारी यांनी प्रवेशप्रक्रियेच्या कालावधीमध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये एक अशा जिल्ह्यातील तंत्रनिकेतनांच्या समस्या जाणुन घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी 16 बैठकांचे आयोजन केले होते.

 

2. प्रवेश प्रक्रियेमधील महत्वाच्या बाबी:-

• विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी १० वीचे व १२ वीचे निकाल घोषित होण्यापूर्वी प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. अर्ज भरण्यास 2 जुन रोजी सुरुवात करण्यात आलेली होती.

• विद्यार्थी त्यांचा केवळ दहावी/बारावीचा आसन क्रमांक नमूद करून त्यांचा अर्ज भरू शकत व निश्चित करू शकत होते. विद्यार्थ्यांचे प्राप्त गुण सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे अर्जामध्ये नमूद करण्यात येत होते.

• पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करणे या प्रक्रियेची सुरुवात जुन मध्ये सुरु झालेले होती.

• तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी प्रक्रियेव्यतिरिक्त ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात आलेली होती.

• ऑनलाईन अर्ज भरणे व निश्चित करणे याकरिता उमेदवार त्यांच्या सोयीनुसार छाननीची पद्धत निवडू शकत होते. अर्ज नोंदणी केलेल्या 1.6 लाख विद्यार्थ्यापैकी सुमारे 55 हजार विद्यार्थ्यांनी (33%) विद्यार्थ्यांनी ई-स्क्रूटनीचा पर्याय निवडला होता.

• केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आयोजित करण्यात आलेल्या होत्या.

• दहावीनंतरच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी राज्यामध्ये ३39 सुविधाकेंद्रांची घोषणा तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे करण्यात आलेली होती.

• पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने संस्थांमधील सुविधा केंद्रांतील स्क्रूटनी ऑफिसर यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आलेले होते.

• सुविधा केंद्रांना उद्भवणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नोडल अधिकारी नेमण्यात आलेले होते. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले होते.

• सुविधा केंद्रांचे मुख्य समन्वयक, स्क्रूटनी ऑफिसर व नियुक्त करण्यात आलेल्या संबंधीत नोडल अधिकारी यांचे e- Scrutiny, ई-एफसी बाबतचे तसेच विद्यार्थ्यांना मोबाईलवरुन अर्ज कसा भरता येतो याबाबतचे सविस्तर प्रशिक्षण ऑनलाईन पध्दतीने संचालनालयाद्वारे आयोजित करण्यात आलेले होते.

• विद्यार्थ्यांना माहितीसाठी प्रवेशप्रक्रियेचे टप्पे उदा. नोंदणी करणे, अर्ज निश्चित करणे, छाननीची पद्धत निवडणे, हरकती नोंदवणे, विकल्प नमुना भरणे इ. या महत्वाच्या टप्प्याचे व्हिडीओ संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले होते.

• त्याचबरोबर या संकेतस्थळावर पदविका प्रवेश प्रक्रियेची थोडक्यात माहिती देणारे सादरीकरण, विद्यार्थ्यांना पदविका तंत्रशिक्षणाबद्दल माहिती देणारे शाखानिहाय माहिती चित्रपट देखील उपलब्ध होते.

• सर्व सुविधा केंद्रांवर विद्यार्थ्यांना हरतऱ्हेने मदत केली जात होती. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून ते अगदी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर दूरध्वनी द्वारे माहिती देण्यात येत होती.

• ज्या उमेदवाराला कॅपफेरी दरम्यान जागा वाटप केली गेली होती त्यांनी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आणि जागा स्वीकृतीसाठी एआरसीकडे जाण्याची अट यावर्षी शिथिल करण्यात आलेली होती.

• जागावाटप झाल्यानंतर, उमेदवारांनी त्याला/तिला कॅपफेरीदरम्यान दिलेले जागा वाटप हे नियमांनुसार आहे किंवा नाही याची पडताळणी स्वत: लॉगिन मधून करु शकत होते व त्यानुसार उमेदवारांनी जागा स्वीकृतीची कार्यवाही पूर्ण केली आहे.
• पदविका अभ्यासक्रमांच्या नवीन शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात १2 सप्टेंबर 2022 पासून झालेली आहे.

• तंत्रशिक्षण संचालनालय, विभागीय सहसंचालक, तंत्रशिक्षण आणि पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्था या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे पदविका प्रवेश प्रक्रिया 2022-23 यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आलेली आहे. पदविका अभ्यासक्रमाचा प्रवेशाचा चढता आलेख कायम ठेवणे शक्य झालेले आहे.

3. न्यू इमर्जिंग टेक्नॉलॉजी चे पदविका अभ्यासक्रम सुरु करणे:-

• औद्योगिक क्षेत्रांमधील आवश्यक गरजा आणि भविष्यातील संधींचा वेध घेऊन 9 शासकीय व 30 विनानुदानित संस्थामध्ये 2460 प्रवेशक्षमतेचे न्यू इमर्जिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.

• त्यामध्ये Artificial Intelligence (AI) and Machine Learning; Mechatronics; Automation and Robotics; Cloud Computing and Big Data, Compputer Engineering and IoT अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

4. अध्यापन प्रक्रिया मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) भाषेमध्ये राबविणे:-

• बहुभाषिकता आणि भाषेची ताकद नवीन शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. कुठल्याही विद्यार्थ्यावर कोणतीही भाषा लादली जाऊ नये असे यात म्हटले आहे. नवीन शिक्षण धोरण 2020 हे परिवर्तनीय आणि भारतीय मूल्ये आणि नीतिशास्त्र जपणारे असून, हे मुख्यत: संशोधन, नवीनता, उद्योजकता आणि स्थानिक भाषांमध्ये शिकण्यावर लक्ष केंद्रित करणारे आहे.

• मा. लोकप्रतिनिधी, विविध विद्यार्थी संघटना, पालक यांच्याद्वारे प्राप्त निवेदनानुसार, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम मातृभाषा-मराठी मध्ये सुरु करणेबाबत विनंती करण्यात येत होती.

• अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी देखील भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण प्रदान करण्याबाबत संस्थांना कळविलेले होते.

• या सर्व बाबींचा विचार करता, मंत्री, यांच्या अध्यक्षतेखालील नियामक परिषदेने शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून व त्यापुढील दरवर्षी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता अध्यापनाच्या प्रक्रियेची अंमलबजावणी ऐच्छिक स्वरुपात “मराठी-इंग्रजी (द्विभाषिक)” माध्यमातून राबविण्यास मान्यता दिलेली आहे.

• शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये, विकल्प अर्ज भरताना उमेदवारांना “मराठी-इंग्रजी (द्विभाषिक)” अभ्यासक्रम ठळकपणे दर्शविण्यात आले.

• 365 पैकी १63 संस्थांनी (अंदाजे 45% संस्थांनी) द्विभाषिक पद्धतीने अभ्यासक्रम शिकविण्याचा पर्याय दिला.
• एकूण 84452 प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी 31163 म्हणजेच 37 % विद्यार्थी हे “मराठी-इंग्रजी (द्विभाषिक)” माध्यमामध्ये प्रवेशित आहेत.

5. तंत्रशिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी औद्यगिक क्षेत्राचे सहकार्य:-

• “Experiential Learning” या संकल्पनेचे महत्व लक्षात घेऊन राज्यात पदविका अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षापासून अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मायक्रो-प्रकल्प अनिवार्य आहे.

• अभ्यासक्रमात सुधारणा करताना १०० पेक्षा जास्त उद्योगातील प्रतीनिधीकडून अभिप्राय घेवून उद्योगांच्या आवश्यकतेनुसार मनुष्यबळ तयार करण्यासाठी I-scheme ( Industry Curriculum ) लागू केला आहे.

• पदविका अभ्यासक्रमांसाठी चौथ्या सत्रानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी 6 आठवडयांचे औद्योगिक प्रशिक्षण (Internship) अनिवार्य आहे

• शैक्षणिक वर्ष 2019-20, 2020-21 व 2021-22 मध्ये अनुक्रमे 62860, 78,832 व 69,770 विद्यार्थ्यांनी चौथ्या सत्रानंतर अनिवार्य असलेले औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण केले.

• विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप करण्यासाठी देखील प्रोत्साहित केले जाते. सन 2021-22 दरम्यान एकूण 26,654 पदवी अभियंत्यांनी आणि 5,941 पदविका अभियंत्यांनी औद्योगिक क्षेत्रात अप्रँटिसशिप पूर्ण केली आहे.

• इन्फोसिस, अदानी थर्मल पावर स्टेशन, एल अँड टी, सिमन्स इंडिया लिमिटेड, मर्सिडीज बेन्ज, यामाहा, महिंद्रा यासारख्या उद्योगांचे प्रशिक्षण कार्यक्रम प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जात आहेत. या माध्यमातून अभ्यासक्रम, अध्यापकांचे प्रशिक्षण, कौशल्य विकास / रोजगार या बाबत औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, द्वारा अध्यापनाचा दर्जावाढ करण्यास मदत होत आहे.

• इन्फोसिस या कंपनीने समाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत विविध विषयांवरील आणि विविध कालावधीचे 3900 पेक्षा जास्त ऑनलाईन कोर्सेस तयार केले असून हे सर्व कोर्सेस कंपनीच्या SpringBoard या ऑनलाईन मंचावर उपलब्ध करुन दिले आहेत. या मध्ये संगणकाच्या प्रोग्रामिंग भाषा (Programming Languages), क्लाउड तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्ध्दिमत्ता यासारख्या तांत्रिक कोर्सेस सोबतच बिझिनेस कम्युनिकेशन, बिझिनेस इंग्लिश, अर्थशास्त्र, लेखन कौशल्य, सकारात्मकता, नेतृत्व कौशल्य इत्यादी विषयांचे कोर्सेस आहेत. वरील सर्व अभ्यासक्रम राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निशुल्क आणि औपचारिक (Formal) अभ्यासक्रमासोबतच उपलब्ध व्हावे या हेतूने इन्फोसिस कंपनीसोबत परस्पर सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे.

• इन्फोसिस सोबतच्या सामंजस्य कराराचे अनुषंगाने आज रोजी १,१65 संस्थांमधील ५,92,259 विद्यार्थ्यांनी व ३६,607 शिक्षकांनी कोर्सेससाठी नोंदणी केली आहे. यापैकी 23,068 वापरकर्ते सक्रीय आहेत तर 5,616 वापरकर्त्यांनी संबंधित विषयांची ऑनलाईन चाचणी देखील दिली आहे.

• संगणक विषयक कौशल्य विकासाचे विविध ऑनलाईन अभ्यासक्रम महाराष्ट्रातील तांत्रिक संस्थांच्या विद्यार्थ्यांना फ्युचरस्किल्स प्राइम प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर आणि सर्व्हिस कंपनी (NASSCOM) सोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. फ्युचर स्किल्स प्राईम (FutureSkills Prime) या ऑनलाईन व्यासपीठावर काही सशुल्क व काही निशुल्क असे ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

• FutureSkills Prime या ऑनलाईन व्यासपीठावर मूलतः Big Data Analytics, Cyber Security, Internet of Things ( IoT), Augmented Reality/ Virtual Reality, Artificial Intelligence and Cloud Technologies या उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित प्रमाणित अभ्यासक्रम आहेत.

• यशदा आणि आयआयटी सारख्या नामवंत शिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यासोबतच राज्यातील शिक्षकवर्गासाठी पुणे येथे स्वतंत्र प्रशिक्षण अकॅडमीची “महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA)” इमारत व स्टूडीयो उभारणीबाबत कार्यवाही पूर्ण झाली आहे. 25 डिसेंबर 2021 रोजी अकॅडमीचे औपचारीक उद्घाटन होऊन प्रशिक्षण वर्ग सुरु झाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी