30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रIAS Officer News: सनदी अधिकाऱ्याचा मनाचा मोठेपणा, परदेशात खेळायला जाणाऱ्या तरूणीला एका...

IAS Officer News: सनदी अधिकाऱ्याचा मनाचा मोठेपणा, परदेशात खेळायला जाणाऱ्या तरूणीला एका दिवसात दिला पासपोर्ट!

परदेशात खेळायला जाण्यासाठी तरुणीला पासपोर्टची आवश्यकता होती. अशावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पासपोर्ट अधिकारी अर्जुन देवरे यांच्याकडे खेळाडू राधिका दराडे हिला तातडीने पासपोर्ट उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. त्यामुळे राधिकाला एका दिवसात पासपोर्ट मिळाला.

‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ असा अनुभव अनेकदा लोकांना येत असतो. अगदी एखाद्या कागदपत्रासाठी काम खोळंबून पडते. कार्यालयात वारंवार हेलपाटे मारुन देखील वेळेत काम होत नाही असा अनुभव लोकांना येत असतो. विद्यार्थी, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक यांचे देखील अनेकदा कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने नुकसान होते. मात्र पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कामाचा एका महिला खेळाडूला आलेला अनुभव मात्र अतिशय सुखद होता.परदेशात खेळायला जाण्यासाठी या तरुणीला पासपोर्टची आवश्यकता होती. अशावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पासपोर्ट अधिकारी अर्जुन देवरे यांच्याकडे खेळाडू राधिका दराडे हिला तातडीने पासपोर्ट उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. त्यामुळे राधिकाला एका दिवसात पासपोर्ट मिळाला.

फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या सायकल स्पर्धेसाठी राधिका दराडे आणि संस्कृती खेसे या दोघींची निवड झाली आहे. मात्र बाहेर देशात जाण्यासाठी त्या दोघींकडे देखील पासपोर्ट नव्हता. अशावेळी या दोघींना ही तातडीने स्पर्धेसाठी दक्षिण कोरियामध्ये जायचे असल्याने दोघी मैत्रिणी चिंतेत होत्या. पासपोर्ट असल्याशिवाय परदेशात जाता येणे शक्य नव्हते, त्यामुळे स्पर्धेत सहभागी कसे व्हायचे याची चिंता त्यांना सतावत होती. अशावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी मनाचा मोठेपणा दाखवत पासपोर्ट अधिकारी अर्जुन देवरे यांना दोघींना तातडीने पासपोर्ट देण्याबाबत विनंती केली.

पासपोर्ट अधिकारी अर्जुन देवरे यांनी दोघींच्या कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच त्यांची कागदपत्रे योग्य असल्याचे पाहून स्वत: पासपोर्ट त्यांच्या हातात सुपुर्द केला. पासपोर्ट हातात पडल्यामुळे दोघी मैत्रिणींना आता स्पर्धेसाठी दक्षिण कोरियाला रवाना होता येणार आहे. त्यामुळे दोघींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. इतकेच काय त्या दोघींच्या कुटुंबियांना देखील मुलींचे स्वप्न पुर्ण होत असल्याचे पाहून समाधान वाटले.

राधिका दराडे ही बारामती येथील रहिवासी असून अत्यंत सामान्य कुटुंबातील आहे. ती आपले धेय्य गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा करत असते. राधिकाच्या वडिलांचा संजय दराडे यांचा सायकल पंचर काढण्याचा व्यवसाय आहे. ते आपल्या मुलीच्या करिअरसाठी तिला नेहमी प्रोत्साहन देत असतात. तिची दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील तिला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी