28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeएज्युकेशनUddhav Thackeray’s announcement :  मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर मंत्र्यांनी टाकला सुटकेचा निश्वास

Uddhav Thackeray’s announcement :  मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर मंत्र्यांनी टाकला सुटकेचा निश्वास

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्याची ( CM Uddhav Thackeray’s announcement on last year exams )  घोषणा केल्यानंतर प्रकरणावर एकदाचा पडदा पडला आहे. या घोषणेमुळे मोठे दडपण दूर झाल्याची भावना उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली आहे.

शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याबाबत राज्य सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहिले होते. त्यावर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी आक्षेप घेतला होता ( Governor Bhagat Sing Koshyri was challenged to government’s decision ) . राज्यपालांच्या या उठाठेवीमुळे विद्यार्थी व पालक हवालदील झाले होते.

विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मंत्री तनपुरे हे पालक – विद्यार्थी – शिक्षक या सर्वच घटकाच्या संपर्कात होते. हे प्रकरण हाताळताना त्यांच्यावर मोठे दडपण होते. स्वतः तनपुरे यांनी तशी माहिती दिली.

या निर्णयानंतर तनपुरे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या फेसबुक पेजवर एक खुलं पत्र लिहिलं आहे ( Prajakta Tanpure written an open letter after Uddhav Thackeray’s announcement ). या पत्रात ते म्हणतात,

मुलांनो,

काल मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अंतिम परीक्षांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आणि मीच परीक्षा पास झालो की काय अशी feeling मला आली. खरंच लॉकडाऊन सुरू झाल्यापासूनचा काळ मला माझ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसारखा वाटला. तेच tension, तीच गडबड, तेच pressure मला जाणवलं.

सतत विविध माध्यमातून मी तुमच्याशी बोलत राहिलो. कोणी शहरात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी गावी गेले होते, कोणी कोरोनाच्या भीतीने परीक्षा केंद्रात जायला घाबरत होते, अभ्यासू विद्यार्थी परीक्षेसाठी तयार होते, कोणी परीक्षेबाबत पसरलेल्या अफवांना बळी पडत होते… भीती सारखी असली तरी प्रत्येकाच्या मनातील संभ्रम वेगळा होता.

सुवर्णमध्य गाठणं दिवसेंदिवस कठीण होत होतं. मानसिकरित्या, आरोग्याच्यादृष्टीने तुम्हाला कसलीच अडचण येऊ नये ही हुरहूर कायम मनात होती. त्यात तुमच्या भविष्याची चिंता अधिक तीव्रतेने जाणवत होती. त्या सर्व गोष्टींचा सारासार विचार करत आम्ही निर्णय घेतला.

आता तुम्हाला सरासरी मार्क्स मिळतील. मान्य आहे की याने माझे काही मित्र दुखावलेही जातील. मात्र आपण त्यावरही मार्ग काढू. पण खरं सांगू का मित्रांनो, या कागदावरच्या परीक्षा होत राहतील, मात्र खरी परीक्षा काय असते ते आपल्याला जीवनात येणारे चढउतार शिकवत असतात. आता त्याच एका नैसर्गिक आपत्तीच्या परीक्षेतून आपण जात आहोत. ही परीक्षा खूप अवघड आहे पण कठीण नाही. पुढे येणाऱ्या सर्व संकटांना खंबीरपणे सामोरे जाण्याचा धडा आपल्याला यातून मिळणार आहे. चला तर मग धैर्याने, एकीने आणि सकारात्मकतेने आपण पुढे जाऊयात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी