35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनबिग बींचा लेक लवकरच करणार राजकारणात एन्ट्री; चर्चेला उधाण

बिग बींचा लेक लवकरच करणार राजकारणात एन्ट्री; चर्चेला उधाण

देशाभरात लोकसभा निवडणूकीचे ( Lok Sabha elections) वारे जोरात वाहत आहेत. अशातच, बिग बींचा लेक अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan ) राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा रंगली आहे. यंदाच्या लोकसभेच्या रिंगणार अनेक कलाकारांनी उडी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकारणात एन्ट्रीसाठी रणदीप हूडा, उर्वशी रौतेला, कंगना रणौत या कलाकारांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, आता अभिषेक बच्चन सुद्धा निवडणुक लढवणार असल्याचे समजते. (Abhishek Bachchan to join Politics Lok Sabha elections 2024)

अभिनयात हात अजमावल्यानंतर अभिषेक (Abhishek Bachchan ) देखील आपल्या आई जया बच्चनप्रमाणे(Jaya Bachchan) राजकारणात एंट्री घेणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) या देखील राज्यसभेवर खासदार आहेत. त्यांना समाजवादी पक्षाकडूनच खासदारकी देण्यात आलीये.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेकला समाजवादी पार्टीकडून तिकीट मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आहे. मध्य प्रदेश खजुराहो मतदार संघातून अभिषेकला निवडणुकीचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप अभिषेक बच्चनकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

उर्वशी रौतेला करणार राजकारणात एन्ट्री? लोकसभेचं मिळालं तिकीट

अभिषेक बच्चनने 2013 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत राजकारणात प्रवेश करण्याबद्दल भाष्य केलं होतं. त्याला वडिलांप्रमाणे निवडणूक लढवता येईल का, असं विचारले होतं. तेव्हा अभिषेकने, ‘पडद्यावर राजकारण्याची भूमिका नक्कीच साकारू शकतो पण राजकारणात कधीच प्रवेश करणार नाही.’ असं थेट उत्तर दिलं होतं.

अभिषेक बच्चन यांचे वडील अमिताभ बच्चन यांनी अभिनयातून ब्रेक घेत 1984 मध्ये राजकारणात नशीब आजमावले. त्यानंतर राजीव गांधींच्या सांगण्यावरून त्यांनी अलाहाबादमधून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बिग बींनी राजीनामा दिला होता.

एल्विश यादवला कोर्टाने दिला दिलासा, पण तुरुंगातून नाही होणार सुटका, जाणून घ्या नेमकं काय आहे कारण?

त्याचबरोबर अभिषेक बच्चनची आई आणि अभिनेत्री जया बच्चन या समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार आहेत. पण आता अभिषेकच्या राजकीय एन्ट्रीची जोरदार चर्चा रंगली आहे.

अभिषेकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, काही महिन्यांपुर्वी रिलीज झालेल्या ‘घूमर’ चित्रपटात दिसला होता. याशिवाय लवकरच अभिषेक शुजित सरकारच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी