महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत ज्यादा जागा मिळायच्या असतील तर आणखीन कोणता प्रयोग करता येईल याची चाचपणी भाजप सातत्याने करत आहे.आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सोबत येऊन सुद्धा आपण कुठेतरी कमी पडतोय असं भाजपला वाटत आहे.म्हणूनच आता मोर्चा त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे वळविला आहे. महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह इतरांना विरोध करायचा असेल तर आपली अजूनही ताकद कमी पडते राज ठाकरे आले तर ही उणीव भरून निघेल असा विश्वास भाजपला वाटत आहे का ते आपण पाहू.
केजरीवाल यांच्या अटकेनंतर पत्नी सुनीता यांचे ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाल्या….
उमेदवार बदलून हवा : खासदार डॉ. सुभाष भामरेंविरोधात मालेगावमध्ये फलकबाजी
एल्विश यादवला कोर्टाने दिला दिलासा, पण तुरुंगातून नाही होणार सुटका, जाणून घ्या नेमकं काय आहे कारण?
तीन पर्याय
भाजपने महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना तीन पर्याय दिलेत पहिला पर्याय शिवसेनेसोबत मनसेचे विलीनीकरण करणे.दुसरा पर्याय लोकसभेला पाठिंबा देऊन विधानसभेला अधिक जागा घेणे.तिसरा पर्याय लोकसभेला जागा हव्या असतील तर विधानसभेत त्यामानाने कमी मिळतील असे प्रस्ताव देण्यात आले.अशी चर्चा भाजपच्या निकटवर्तीय यांच्याकडून केली जात आहे.
राज ठाकरेंना सोबत घेतल्याचा फायदा
उद्धव ठाकरे यांच्या बद्दल वाढत असलेली सहानुभूती लक्षात घेता त्यांच्याविरोधात राज ठाकरे अधिक प्रमाणात भूमिका मांडू शकतो. बाळासाहेब ठाकरे यांची स्टाईल राज ठाकरे यांच्यामध्ये असल्याकारणाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा उभारी येईल. असा विश्वास भाजपला वाटत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने 2009 च्या निवडणुकीत 13 आमदार निवडून आले होते.तर उत्तर भारतीयांच्या विरोधात आंदोलन करून तमराठी मते ,मिळवण्यात त्यांना यश मिळाले होते.
उत्तर भारतीयांची मते मिळणार का
एकीकडे राज ठाकरे यांना सोबत घेऊन ताकद वाढवावी असा विचार करत असताना दुसरीकडे , राज ठाकरे यांना सोबत घेतल्यास उत्तर भारतीयांची मते मिळणार का असा प्रश्नही भाजपला पडत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना चांगला चोप दिला होता. 2008 साली झालेली मारहाण अजून सुद्धा उत्तर भारतीय विसरलेले नाहीत. अयोध्येला जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले त्यावेळी तेथील , भाजपचे खासदार ब्रिज भूषण सिंह यांनी माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेश मध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही असा इशारा दिला होता.अर्थात त्यावेळी राज ठाकरे यांनी आयोजित दौरा रद्द ही केला होता. तर बीजभूषण सिंह यांना सुद्धा मुंबईत पाय ठेवू देणार नाही , असा इशाराही मनसेने दिला होता.
असे असताना राज ठाकरे यांचा नेमका फायदा कसा होणार याबाबत महायुती विचार करत आहे.शिवसेनेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विलीनीकरण करून आहे ती ताकद जिवंत ठेवावी व महायूतीला फायदाा करून द्यावा या विचारात आता भाजप पडला आहे. अबकी बार 400 पार म्हणणाऱ्या महायुतीला अबकी बार 400 पार म्हणणाऱ्या महायुतीला किसका लग रहा है डर , असं म्हणण्याची वेळ आता येऊ लागले आहे. असाच व्हिडिओ पाहण्यासाठी लय भारी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद.