31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजनअभिनेता किरण मानेंची पोस्ट, तुम्हालाही अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही

अभिनेता किरण मानेंची पोस्ट, तुम्हालाही अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही

अभिनेते किरण माने सोशल मीडियावर सक्रीय असतात. आपल्या सडेतोड आणि निर्भीड मतांमधून त्यांचा चाहता वर्गदेखील आहे. सोशल मीडियावर ते त्यांचे अनुभव, राजकीय मते आणि विरोधकांचा चांगलाच समाचार घेतात, त्यामुळे ते चर्चेतही राहत असतात. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील व्याख्यानासंबंधीचा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला, तो भाग तुम्ही नक्की जाणून घ्या…

किरण माने लिहितात…

“…अरे याची लायकी आहे का व्याख्यानाला बोलवायची?” असं त्यावेळी भक्ताड ट्रोल्सनी आणि ‘तथाकथित अभ्यासू’, पुरोगामी चिंतातूर जंतूंनी फेसबुकवर लै ट्रोल केलंवतं मला ! दोन वर्षांपूर्वीचा मार्च महिना. मी बी जरा साशंकच होतो. आजपर्यंत आपल्या महामानवांवर फेसबुकवर लिहीत होतो. त्याला भरभरुन रिस्पाॅन्स मिळत होता. यावर जाहीर व्याख्यानं द्यावं लागतील असं स्वप्नातही आलं नव्हतं. 

दोन वर्षांपूर्वी याच दिवशी मला एक फोन आला. कोल्हापूरजवळच्या कामेरी गांवातल्या ‘सावित्री महिला मंडळा’नं मला व्याख्यानासाठी आमंत्रित केलं. ‘विद्रोही तुकाराम’ या विषयावर बोलायला. बरं ती साधीसुधी संस्था नव्हती. त्यापुर्वी सलग सतरा वर्ष महिलांसाठी व्याख्यानं आयोजित होत होती. ते गांव इतकं भारी की जवळजवळ घरटी एक महिला किंवा पुरूष ‘पीएचडी’ ! त्यात तुकाराम महाराजांवर पीएचडी केलेले दोनतीन लोक. मी यापूर्वी कधीच व्याख्यानं दिली नव्हती. टाळाटाळ करायला लागलो. पण महिला भगिनी ठाम होत्या. “तुम्हीच यायचं व्याख्यानाला”. शेवटी गेलो धाडस करून.

जवळजवळ दोन हजार महिला उपस्थित होत्या. लै रंगलं व्याख्यान. तुकारामांच्या एकेका अभंगाच्या गाठी, तिढे सोडवता-सोडवता उलगडत जानारा समाजसुधारक, विषमतेविरूद्ध झुंजणारा डॅशिंग लढवय्या, उत्तम शेतकरी, प्रतिभावंत कवी ऐकताना भान हरपून गेलेल्या, टाळ्यांचा कडकडाट करनाऱ्या माझ्या अनेक रखुमाई…

“तुका म्हणे आता । आनंदी आनंदु विस्तारला ।।”

भाषण संपल्यावर भगिनींनी मला भेटायला जी गर्दी केली ती पाहून मन भरुन आलं. शंभर वर्ष वयाचे एक असे किर्तनकार उपस्थित होते, ज्यांनी आयुष्यभर फक्त संत तुकाराम महाराजांवर किर्तन केलं… त्यांनी थेट स्टेजवर येऊन माझी गळाभेट घेतली. मला आवंढा आला होता.

मी एक अभिनेता आहे. मी साकारत असलेल्या भुमिकेचे कंगोरे समजून घेऊन, त्या स्क्रिप्टमधला आशय प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं कौशल्य मी आत्मसात केलंय… पण स्वत: एक ठाम ‘भुमिका’ घेऊन महामानवांचे विचार अभ्यासून बोलणं हे जास्त जबाबदारीचं असतं. आता हल्ली अशा व्याख्यानांनिमित्त महाराष्ट्रभर फिरतो. विशेष म्हणजे यात मला अभिनयाइतकाच अफाट आनंद मिळतो. लाखो चाहत्यांशी थेट संवाद होतो हे महत्त्वाचं.

…तर सुरूवात अशी झाली भावाबहिणींनो !😊❤️
– किरण माने.

हेही वाचा : Maratha Reservation : माझा एन्काऊंटर करण्याचा डाव फडणवीसांचा होता, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी