33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
HomeराजकीयMaratha Reservation : माझा एन्काऊंटर करण्याचा डाव फडणवीसांचा होता, मनोज जरांगेंचा गंभीर...

Maratha Reservation : माझा एन्काऊंटर करण्याचा डाव फडणवीसांचा होता, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

मराठा समाजाला संपविण्याचं काम सुरू आहे. मला बदनाम करण्याचं कारस्थान सुरू आहे. अजय बारसकर माझ्या विरोधात उभं केलं. माझा एन्काऊंटर करण्याचाही डाव होता. सलाईनमधून विष देण्याचा डाव होता, हे सगळं षडयंत्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) रचत आहे, असे गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री यांच्यावर केले आहे. (Maratha Reservation)

“फडणवीसांनी आम्हाला घाबरविण्याचं काम करू नये. तुम्हाला माझा बळी पाहिजे आहे, तर मी तुमच्या सागर बंगल्यावर येतो, घ्या माझा बळी. माझी माझ्या समाजावरील निष्ठा कमी होणार नाही. माझ्याविरोधात राज्यात एका जरी महिलेने तक्रार असेल तर मी तुम्ही म्हणाल ते ऐकेन. माझ्यावर घाणेरडे आरोप सिद्ध केल्यास सांगेन ते करेन. तुम्ही माझ्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करू शकत नाही”, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“फडणवीस तुम्हाला आयुष्यातून उठवेन. तुम्ही शेतकऱ्यांचे मुडदे पाडायला उठलात. मराठ्यांसारख्या क्षत्रिय जाती संपविण्याचा विडा तुम्ही उचचला आहे. मोठ्या जाती संपवून टाकत आहेत. मराठा समाजानंतर आता धनगर समाजालाही संपविण्याचा डाव सुरू आहे. फडणवीस यावेळी तुमचा सुफडासाफ होणार, षडयंत्र करून मला बदनाम करायला लागलात तुम्ही. मराठा-मराठ्यांत फूट पाडायला लागले आहेत”, असेही गंभीर आरोप जरांगेंनी केले आहेत.

मराठा समाजाचा दरारा संपविण्याचं काम सुरू

“मराठ्यांचा राज्यावर पुन्हा एकदा दरारा निर्माण झाला आहे. हा दरारा संपवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. विशेष म्हणजे हा दरारा मराठ्यांच्याच हाताने संपवण्याचे काम चालू आहे. यात एकनाथ शिंदे यांचे दोन-चार लोक आहेत. अजित पवार यांचेही दोन आमदार आहेत. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जात नाहीये. 10 टक्के आरक्षण मराठ्यांवर लादले जात आहे. मनोज जरांगे ऐकत नाही म्हणून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. मला सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जातोय. त्यामुळेच मी परवा रात्रीपासून सलाईन बंद केले आहे”, असा खळबळजनक आरोप जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.

मी सागर बंगल्यावर येतो, घ्या माझा बळी

“मी आज तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना एवढीच खुमखुमी आहे ना तर ही बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो. मला त्यांनी मारून दाखवावं. तुम्हाला माझा बळी घ्यायचा आहे का? मी सागर बंगल्यावर येतो. माझा त्यांनी बळी घेऊन दाखवावा. मी समाजाशी असलेली इमानदारी सोडू शकणार नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. आम्ही घेणारच. मी 10 टक्के आरक्षणाला हात लावणार नाही,” असेदेखील जरांगे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी