31 C
Mumbai
Friday, September 15, 2023
घरमनोरंजनवेलकम 3 मधून बाहेर काढल्यानं नाना पाटेकर वैतागले! काय म्हणाले वाचा..

वेलकम 3 मधून बाहेर काढल्यानं नाना पाटेकर वैतागले! काय म्हणाले वाचा..

अभिनेता अक्षय कुमारनं वेलकम चित्रपटाचा तिसरा भाग ‘वेलकम इन द जंगल’ एका खास शैलीत जाहीर केला. ७ सप्टेंबरला आपल्या वाढदिवसानिमित्तानं अक्षयनं ‘वेलकम इन द जंगल’ चित्रपटाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला. पूर्वीच्या दोन्ही भागात काम केलेल्या कलाकारांपैकी केवळ परेश रावल तिसऱ्या भागात आहे. त्यामुळे नाराज झालेल्या नाना पाटेकर यांनी आपला संताप प्रसारमाध्यमांसमोर जाहीररित्या व्यक्त केला. निर्मात्यांना मी कदाचित जुना झालो आहे असं वाटल्यानं त्यांनी मला सिनेमात काम दिलं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

कश्मीर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी ‘द व्हेक्सीन वोर’ चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर महत्वाची भूमिका साकारत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. ट्रेलर लाँच कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी पत्रकाराशी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी नाना ‘वेलकम इन द जंगल’ चित्रपटातून गायब असल्याचं कारण विचारलं. याबाबत नाना पाटेकरांनी मी जुना झाला असल्याने निर्मात्यांनी चित्रपटातून मला काढून टाकलं अशी सणसणीत प्रतिक्रिया दिली. ‘द व्हेक्सीन वोर’ चित्रपटा’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना मी अजूनही चांगलं काम करू शकतो असा विश्वास असल्यानंच त्यांनी मला चित्रपटात काम करण्याची संधी दिली असं नाना पाटेकर म्हणाले. नाना पाटेकर यांची खरमरीत प्रतिक्रिया ऐकून हातातून चित्रपट निसटल्याननं नाना चांगलेच वैतागले असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

‘वेलकम इन द जंगल’ चित्रपटात अक्षय सोबत परेश रावल तर आहेच पण सुनील शेट्टी, संजय दत्त, हर्षद वारसी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, कृष्णा अभिषेक,शरीब हाश्मी, जॉनी लिव्हर, मिका सिंग, दलर मेहंदी अशी तगडी स्टारकास्ट आहे.

हे ही वाचा 

परिणीती सोबत लग्नाबाबत राघव चड्ढाने सोडलं मौन!

विकी आणि मानूशीच्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

साडी असो की वेस्टर्न आऊटफिट; माधवी निमकरचे सौंदर्य पाहून व्हाल थक्क !

या मल्टीस्टारर सिनेमात हीरोइनचापण मोठा फौज फाटा आहे. ९० चे एक्स प्रेमी युगुल अक्षय कुमार आणि रविना टंडन बऱ्याच वर्षानंतर स्क्रीन शेअर करत आहेत. साखरपुडा मोडल्यानंतर रवीनानं चित्रपट वितरक अनिल थडानीसोबत लग्न केलं तर अक्षयनं ट्विंकल खन्ना सोबत संसार थाटला. रवीना लग्नानंतर घर संसारात रमली. वर्षभरापूर्वी रवीनानं नेटफ्लिक्सवर वेबसिरीज करत चित्रपटसृष्टीत कमबॅक केलं. मध्यंतरीच्या काळात तिचा ‘मात्र’ हा चित्रपट कधी येऊन गेला हे समजलंच नाही. रवीनासोबत ‘वेलकम३’ चित्रपटात लारा दत्ता, जॅकलीन फर्नांडिस आणि दिशा पटानीदेखील आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी