38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रRavindra Chavan : रवींद्र चव्हाण पीडब्ल्यूडीच्या अध‍िकाऱ्यांची घेणार शाळा !

Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण पीडब्ल्यूडीच्या अध‍िकाऱ्यांची घेणार शाळा !

सर्वाजनिक बांधकाम विभागातील कामकाज गतीमान करण्यासाठी 15 सप्टेंबरला राज्यव्यापी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्धाटन मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या हस्ते होणार आहे. ‍

राज्यातील राज्यकारभाराला एक प्रकारे मरगळ आली आहे. त्याला कारण आहे, गेल्या काही महिन्यांपासून घडणाऱ्या राजकीय घडामोडी. परंतु आता अजून किती दिवस असे सुस्त बसून राहणार हा देखील एक प्रश्नच आहे. राज्याला मुख्यमंत्री आाणि कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. तरी देखील अजून मंत्री मंडळ विस्तार झाला नसल्याने कारभार संथ गतीने सुरू आहे, असे असतांना एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. लवकरच सर्वाजनिक बांधकाम विभागातील कामकाज गतीमान करण्यासाठी 15 सप्टेंबरला राज्यव्यापी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्धाटन मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या हस्ते होणार आहे. ‍ या कार्यक्रमांचे आयोजन 15 सप्टेंबरला 10 वाजता षण्मुखानंद हॉल, सायन येथे होणार आहे.

त्यामुळे सार्वजन‍िक बांधकाम विभागाचे काम गतिमान होणार आहे. अत्यंत दर्जेदार काम करण्यासाठी अभ‍ियंता द‍िनाचे औचित्य साधून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये अभ‍ियंत्यांच्या नव्या संकल्पनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये राज्यातील सर्व विभागीय मुख्य अभ‍ियंता, उप-अभ‍ियंता, कार्यकारी अभ‍ियंता, शाख अभ‍ियंता हजेरी लावणार आहेत. सार्वजन‍िक बांधकाम विभाग हे राज्यमार्ग आणि जिल्हा मार्गांची नवीन कामे तसेच देखभालीचे काम करत असते. राज्यात अनेक रस्त्यांची कामे रखली आहे. अनेक रस्त्यांची कामे नव्याने सुरू करायची आहेत. अनेक रस्त्यांची दुरुस्ती करायची आहे.

हे सुद्धा वाचा

RTO forms special teams : छोटया अतंराचे भाडे नाकारण्याऱ्या टॅक्सी चालकांची आता खैर नाही !

BJP : राष्ट्रवादीचे भाजपला 30 सवाल

Maharashtra Politics : महाराष्ट्रात येऊ घातलेल्या 1.54 कोटीचा प्रोजेक्ट गुजरातने पळवला!

त्यासाठी या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. राज्यातील ब्रिटीशकालिन पूल व इमारती सुधारण्याचे आव्हान या विभागाकडे आहे. या कार्यशाळेमध्ये अपघात प्रवणक्षेत्रात दुरुस्तीचे काम करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. न‍ियोजन बध्द पद्धीतीने रस्त्यांचा आराखडा तयार करणे तसेच पूल बांधणी करणे, त्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे नियोजन करणे, तसेच अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, शासकीय जमीनींवर नवे प्रकल्प तयार करणे, अनेक विभागांचे संगणकीकरण करणे, अद्यायावत करणे, रस्ते व इमारतींची देखभाल करणे, आराखडा करणे या संदर्भात या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेमुळे राज्याच्या बांधकाम विभागाचा कारभार हा अधिक गतीमान तसेच दर्जेदार होण्यास मदत होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी