30 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
Homeमनोरंजनफिटनेस फ्रिक बिपाशासोबत मुलगी देवीही करते योगा

फिटनेस फ्रिक बिपाशासोबत मुलगी देवीही करते योगा

अभिनेत्री बिपाशा बासू प्रसूतीनंतर पुन्हा व्यायामाकडे वळली आहे. बिपाशा बसूने घरी योगा करतानासोबत मुलगी देवीही बालपणापासून योगा करू लागल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या गोंडस फोटोने नेटीझन्सची मने जिंकली. योग सत्रादरम्यान मुलगी देवीही सोबत असल्याचा फोटो बिपाशाने इंस्टाग्रामवर पोस्ट केला. बिपाशा योगासन करत असताना अकरा महिन्यांची देवी तिच्याजवळ फिरू लागली. लेकीला आजूबाजूला फिरताना पाहून आता स्वतःसाठीचा वेळ विसरायला हवा अशी टिप्पणी बिपाशाने दिली. घरी बाल्कनीच्या जागेत योगासने करताना बिपाशाला देवीने कोणतेही काम करू दिले नाही. रविवारी, बिपाशाने आपल्या आसनाचे देवी अनुकरण करत असल्याचा फोटो शेअर केला. ‘कोणीतरी माझ्या मी टाईममध्ये आलेय’ अशी गोंडस कॅप्शनही तिने लिहिली. बिपाशाने इंस्टाग्रामवर पोस्ट करताच सोशल मीडियावापरकर्त्यांनी इवलुश्या देवीवर प्रेमाचा वर्षाव केला.

बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले “म्हणून कोणीतरी नेहमी माझ्या …मी टाईममध्ये येतेय !!!
तिने कॅप्शनसह #mamatryingtogetfit आणि #loveyourself हे हॅशटॅग देखील जोडले. तिने पोस्टवर पती करण सिंग ग्रोव्हरला टॅग केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)


एका चाहत्याने पोस्टवर लिहिले की, “देवी खूप भाग्यवान आहे की इतके अद्भुत पालक मिळाले!” दुसरा म्हणाला, “मला खात्री आहे की देवी तिच्या आईसारखी सुंदर असेल.”

एकाने “तिला तिच्या आईसारखे मजबूत व्हायचे आहे!” अशी पोस्ट लिहिली. “व्यायाम करताना इतका गोंडस त्रास” असेही सोशल मीडिया वापरकर्ता म्हणाला.

हे ही वाचा 

तेजस्विनी पंडित यांचा कुणावर रोष? ट्विटर व्हेरिफिकेशन काढण्यासाठी राजकीय दबाव?

शाहरुखच्या अभिनेत्रीचा जीवघेणा अपघात, जीव वाचला पण…

शिल्पाच्या नवऱ्याचा अजून एक कारनामा… राज कुंद्राने पॉर्नफिल्मबाबत केले वक्तव्य

बिपाशा आणि करण सिंग ग्रोवरला गेल्या वर्षी १२ नोव्हेंबरला कन्या रत्न झाले. दोघांनी काही महिन्यांपूर्वी नेहा धुपियासह इंस्टाग्राम लाइव्हवर मुलगी देवींची सर्वांसमोर ओळख करून दिली. या मुलाखतीत देवीला व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट आजाराचे निदान झाल्याची माहिती बिपाशाने दिली. लहान वयातच देवीवर व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट या आजारावरील उपचारासाठी सहा तास ऑपरेशन करावे लागले होते. बिपाशा म्हणाली की तिला आयव्हीएफद्वारे गर्भधारणा झाली, परंतु तिच्या जन्मानंतर तीन दिवसांनी कळले की तिच्या हृदयात दोन छिद्र आहेत.

बिपाशाने तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्याबद्दल सांगितले होते, जेव्हा देवीला व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट (VSD) साठी सहा तास ऑपरेशन करावे लागले होते. आता देवी सुखरूप आहे. परंतु देवीच्या जन्माच्या पहिल्या ४० दिवस आम्ही दोघांनीही कोणाही नातेवाईकाला तिला भेटू दिले नाही. कुटुंबातील बऱ्याचजणांना आम्हां दोघांचेही वागणे खटकले पण आम्हाला त्यावाचून पर्याय नव्हता. आता देवी सुखरूप आहे असे सांगत बिपाशाने सुटकेचा निःश्वास सोडला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी