32 C
Mumbai
Thursday, December 8, 2022
घरमनोरंजनBigg Boss Hindi : काँग्रेस नेत्याने उचलला मराठमोळ्या शिव ठाकरेवर हात !

Bigg Boss Hindi : काँग्रेस नेत्याने उचलला मराठमोळ्या शिव ठाकरेवर हात !

बिग बॉसच्या घरातील स्पर्धक अर्चना गौतम हिने मराठी 'बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वातील विजेता शिव ठाकरे याच्यावर हात उचलला. अर्चनाने रागाच्या भरात शिवचा गळा पकडला.

कलर्सच्या हिंदी वाहिनीवर ‘बिग बॉस’ प्रसारित करण्यात येत आहे. बिग बॉस हिंदीचे हे 16 वे पर्व आहे. या पर्वामध्ये 16 स्पर्धक पाच आठवड्यापूर्वी बिग बॉस च्या घरात दाखल झाले होते. दररोज हा रिऍलिटी शो आणखी रंगतदार बनत चालला आहे. ज्यामुळे प्रेक्षक देखील या शो ला चांगली पसंत देऊ लागले आहेत. पण हल्लीच या घरात दोन स्पर्धकांमध्ये मोठा राडा झालेला पाहायला मिळाला. या घरातील स्पर्धक अर्चना गौतम हिने मराठी ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वातील विजेता शिव ठाकरे याच्यावर हात उचलला. अर्चनाने रागाच्या भरात शिवचा गळा पकडला. त्यानंतर घरातील सर्व स्पर्धकांनी अर्चनाच्या विरोधात एकच हल्लाबोल केला. या घटनेनंतर बिग बॉसकडून अर्चनाची घरातून हकालपट्टी करण्यात आली.

तर झाले असे की, टीनाने बाथरूमची जागा स्वच्छ ठेवण्यासाठी टिश्यू पेपर ठेवला होता. त्यानंतर घरात गोंधळ सुरू झाला. दरम्यान, शिव ठाकरे अर्चना यांच्या पक्ष आणि दीदींबद्दल भाष्य करू लागले. अर्चना काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत आणि प्रियंका गांधी यांना दीदी म्हणतात. शिव त्यांना वारंवार त्यांच्या दीदींना बोलवायला सांगत होता. अर्चना प्रत्येक वेळी हेच म्हणत होती की, प्लीज माझ्या दीदीला काही बोलू नकोस पण शिवने तिचे काहीच ऐकले नाही आणि या मुद्द्यावरून तिला डिवचू लागला.

हे सुद्धा वाचा

PHOTO : सिनेमांपेक्षा इंस्टाग्रामवरून जास्त पैसे कमावते जान्हवी कपूर, वाचा गणित

Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्रीचा आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’ 15 ऑगस्ट रोजी होणार प्रदर्शित

Rocking Star Yash : ‘बिग बी अन् रजनीकांत’ यांसारख्या दिग्गजांच्या लीगमध्ये रॉकिंग स्टार यश

दरम्यान, याचवेळी शिव काहीच ऐकायला तयार नव्हता आणि यामुळे दोघांमधील भांडण आणखीनच वाढत गेले. या वादामध्ये अर्चनाला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तिने थेट शिवचा गळा पकडला. या भांडणामध्ये शिवच्या मानेवर ओरखडे पडले. ज्यामुळे घरातील सर्वच सदस्य भडकले. काही तर तिच्या अंगावर धावून सुद्धा गेले. तर तिला थेट घरातून बाहेर काढा अन्यथा आम्ही बाहेर जातो, असेही सांगण्यात आले.

या सर्व गदारोळानंतर अर्चनाला घराबाहेर काढायचे की आणखी एक संधी द्यायची हे बिग बॉसने शिव ठाकरेवर सोडले. अर्चनाने अनेकदा हात जोडून शिवची माफी मागितली. तसेच पुन्हा एकदा संधी देण्याची विनंती शिवकडे केली. पण यावर शिवने अर्चनाला स्वतःवर झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. याआधी देखील बिग बॉसच्या घरात हिंसेच्या अनेक घटना घडल्या आहेत. बिग बॉसमधील अनेक स्पर्धक हे वादाचा विषय देखील ठरले आहेत. पण हा शो तितकाच प्रसिद्ध देखील ठरला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!