25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराष्ट्रीयमोफत रेशन योजनेचा कालावधी आणखी सहा महिने वाढणार ?

मोफत रेशन योजनेचा कालावधी आणखी सहा महिने वाढणार ?

मार्च 2020 मध्ये देशात कोरोनाने हाहाकार माजवला होता. देशातील उद्योग-धंदे बंद पडले होते. श्रमिक, कष्टकरी मंडळींच्या हाताला काम नव्हते. शहरी भागात कामानिमित्त आलेल्यांचे या काळात चांगलेच हाल झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत गरिबांना रेषांवर मोफत अन्नधान्य वाटायला सुरुवात केली होती.  ही  रेशन योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत सुरु राहणार असल्याचे आधीच सांगण्यात आले आहे. नोव्हेंबरचा पहिला आठवडा आता संपत आला आहे. असे असताना ही योजना पुढे नेली जाणार की नाही? याबाबत सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.पण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना पुढे नेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोना काळात सुरू झालेल्या या योजनेचा  लाभ देशभरातील 81 कोटी 35 लाख गरिबांना मिळत आहे. सरकारकडून ही मुदत सहा महिन्यांनी म्हणजे 30 जूनपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे. असे असताना केंद्र सरकार गव्हाचे पीठ 10 किलो आणि 30 किलोच्या पॅकमध्ये बाजारात उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे. सरकार भारत ब्रँड अंतर्गत 27.5 रुपये प्रति किलो दराने पीठ विकणार असल्याचे एका अहवालानुसार समोर आले आहे.

यंदाचे वर्ष हे जगभरात भरड कडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यानुसार केंद्र सरकारने या कडधान्याला ‘श्री अन्न’ असे नाव दिले आहे. भारतात एकेकाळी भरड कडधान्याला अन्नात प्राधान्य दिले जायचे. पण वाढत्या जागतिकीकरणाने भरड कस धान्य मागे पडू लागले आहे. त्याचा प्रसार व्हावा यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार सरकार नवे धोरण आखत आहे. केंद्र सरकारकडून स्वस्तात हरभरा डाळही भारत ब्रँड नावाने विकली जात आहे.

7 नोव्हेंबरपासून पिठाची विक्री
7 नोव्हेंबरपासून पिठाची विक्री सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात मिळणारे ब्रँडेड पीठ 35 ते 40 रुपये किलोने मिळत आहे. मध्य प्रदेशात गव्हाच्या पिठाचा दर सुमारे 45 रुपये प्रति किलो आहे. साधारण ब्रँडेड पिठाचे 10 किलोचे पॅकेट सुमारे 370 रुपयांना मिळते. असे असताना भारत ब्रँडचे पीठ 275 रुपयांना मिळणार आहे. यासाठी राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघाला नोडल एजन्सी बनवण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. FCI केंद्रीय पूलमधून भारत ब्रँडच्या पिठासाठी सुमारे 2.5 लाख टन गव्हाचे वाटप करत आहे.

हे सुद्धा वाचा 

दुष्काळावरून राजकीय कुरघोडीचा पाऊस

शिवराय, आंबेडकरांबद्दल नागराज मंजुळेंचं मोठं वक्तव्य

भूकंपाच्या धक्क्यांनी नेपाळ हादरले… भारतातही जाणवले हादरे!

गव्हाचे पीठ 10 किलो आणि 30 किलोच्या पॅकमध्ये बाजारात उपलब्ध केले जाणार आहे. या पिठाचे 10 किलोचे पॅकेट सुमारे 275 रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय शासनाच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून डाळींच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारकडून स्वस्तात हरभरा डाळही भारत ब्रँड नावाने विकली जात आहे. त्याचा दर 60 रुपये किलो आहे. 30 किलोच्या मोठ्या पॅकेटची किंमत 55 रुपये किलो आहे. देशातील गरीब, सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. असे सरकारला वाटत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी