30 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
Homeमनोरंजनआमिरच्या नव्या चित्रपटाची घोषणा, महाराष्ट्राची सून साकारणार मुख्य भूमिका

आमिरच्या नव्या चित्रपटाची घोषणा, महाराष्ट्राची सून साकारणार मुख्य भूमिका

गेल्या काही दिवसांपासून आमीर खान त्याच्या नव्या चित्रपटाच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा होती. अखेरीस आमीर खानने ‘सितारे जमीन पर’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली. आमीर खानचे पहिले दिग्दर्शन असलेल्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राची लाडकी सून जिनिलिया देशमुख ‘सितारे जमीन पर’ आमीरसह मुख्य भूमिका साकारणार आहे. जिनिलीयानेही चित्रपटासाठी होकार दिल्याचे समजते. पुढील वर्षी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली जाईल.

आमीर गेल्या दीड वर्षांपासून ब्रेकवर आहे. आमीरचा लाल सिंग चड्ढा सुपरफ्लॉप ठरला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाल सिंग चड्ढा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता आमिर खानने आपल्या कुटुंबासोबत काही वेळ घालवण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेतला. आता आमिर खान नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात करेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, आमिर खान प्रॉडक्शनने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील लॉक केली आहे. सध्या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन चालू आहे. चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत असेल. चित्रपटाची निर्मितीही आमीरकडून केली जाईल. आमीर खान शेवटचा ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात करीना कपूर खान सोबत दिसला होता. अद्वैत चंदनने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९९४ च्या हॉलिवूड क्लासिक फॉरेस्ट गंपचा अधिकृत हिंदी रिमेक होता . मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.

हे ही वाचा 

कोणी दिली प्रेमाची कबुली? अखेर परिणीती आणि राघवनं मौन सोडलं

फिटनेस फ्रिक बिपाशासोबत मुलगी देवीही करते योगा

तेजस्विनी पंडित यांचा कुणावर रोष? ट्विटर व्हेरिफिकेशन काढण्यासाठी राजकीय दबाव?

चित्रपट फ्लॉप ठरल्याने नैराश्यतेत अडकलेल्या आमीरने मोठा काळ ब्रेक घेत कौटुंबिक आघाडीवर लक्ष केंद्रित केले. अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान आपल्या खाजगी आयुष्याबद्दल जास्त चर्चेत असते. इरा आपल्या प्रियकर नुपूर शिखरे सोबत पुढील वर्षात जानेवारीत विवाहबद्ध होणार आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात इरा आणि नुपूर यांचा साखरपुडा झाला होता. यावेळी ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या घोषणेसह आमीरनेच इराच्या लग्नाची तारीख प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केली. पुढील वर्षाच्या सुरुवातीला इरा ३ जानेवारी रोजी विवाहबद्ध होईल. त्या क्षणी मला स्वतःला सावरणे कठीण होईल. मी खूप रडून घेईन, अशी भावनिक कबुली आमीरने दिली.

व्यावसायिक पातळीवर ‘सितारे जमीन पर’ सिनेमाच्या घोषणेवेळी आमीरने अभिनेत्रीचे नाव गुपित ठेवले. मात्र दहा वर्षाच्या ब्रेकनंतर सिनेमासृष्टीत परतलेल्या जिनिलीयाने आता सिनेमांचा धडाका लावला आहे. गेल्या वर्षी जिनिलियाने मराठी सिनेमांत पदार्पण केले. जिनिलिया आणि रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने ७५ कोटींची कमाई केली. दुसरीकडे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत जिओ सिनेमावरील ‘ट्रायल’ सिनेमाही तिने यशस्वी करून दाखवला. आता जिनिलिया :सितारे जमीन पर’ चित्रपटात स्वावलंबी स्त्रिची भूमिका साकारणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी