30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeआरोग्यबाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण अडचणीत वाढ; सुप्रीम कोर्टाने बजावली अवमानाची नोटीस

बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण अडचणीत वाढ; सुप्रीम कोर्टाने बजावली अवमानाची नोटीस

पतंजली आयुर्वेद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव(Yoga Guru Ramdev ) यांच्यासह एमडी आचार्य बाळकृष्ण यांनाही समन्स बजावले आहे. मंगळवारी (19 मार्च 2024) सर्वोच्च न्यायालयाने रोगांच्या उपचारांसाठी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचे प्रकरणावर सुनावणी करताना बाबा रामदेव यांना अवमान नोटीस जारी केली आहे. न्यायालयाने बाबा रामदेव यांना दोन आठवड्यांनी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयात हजर न राहिल्याने संतप्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल, असे म्हटले आहे.(Yoga Guru Ramdev Summoned By Supreme Court Over Patanjali Misleading Ads)

पतंजली आयुर्वेदाच्या कथित खोट्या दाव्यांसह जाहिरातीबाबत न्यायालयाने हा आदेश दिला आहे. याआधीही सुप्रीम कोर्टाने योगगुरू रामदेव बाबा यांना नोटीस बजावून कोर्टात बोलावले होते. 27 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण आणि रामदेव यांच्याकडून तीन आठवड्यांत उत्तर मागितले होते. यासोबतच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरही बंदी घालण्यात आली आहे. मात्र रामदेव आणि बाळकृष्ण यांच्याकडून न्यायालयाला कोणतेही उत्तर मिळाले नाही.

‘नॅशनल क्रश’ Smriti Mandhana चा फिटनेस फंडा घ्या जाणून

आज झालेल्या सुनावणीदरम्यान, पतंजली आयुर्वेदची बाजू मांडणारे वकील मुकुल यांना न्यायमूर्तींनी विचारलं की, तुमच्याकडून अद्याप याप्रकरणी कोणत्याही प्रकारचं उत्तर का नाही आलं? तुमच्या आशिलांना न्यायालयात हजर राहण्यास सांगा. आम्ही रामदेव आणि बाळकृष्ण यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देत आहोत.

यासह न्यायालयाने आयुष मंत्रालयालाही फटकारलं. तुम्हीदेखील याप्रकरणी तुमचं उत्तर एक दिवस आधी का पाठवलं नाही? आयुष मंत्रालयाने न्यायालयाला सांगितलं की, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आणखी थोडा वेळ हवा आहे. दरम्यान, न्यायालयाने रामदेव यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे की, तुम्ही न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी तुमच्याविरोधात आम्ही खटला का चालवू नये?

नेमकं प्रकरण काय?

पतंजली आयुर्वेदने १० जुलै २०२२ रोजी ‘द हिंदू’ या वृत्तपत्रात अर्ध्या पानावर औषधांबाबत जाहिरात दिली होती. “अ‍ॅलोपॅथीकडून होणारा अपप्रचार : स्वत:ला व देशाला फार्मा आणि वैद्यक क्षेत्रातून होणाऱ्या अपप्रचारापासून वाचवा”, अशा मथळ्याखाली ती जाहिरात प्रकाशित झाली होती.

शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे ‘ही’ फळे, जाणून घ्या

त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजली आयुर्वेद विरोधात एक रिट याचिका दाखल केली होती. त्यात पतंजली आयुर्वेदकडून अ‍ॅलोपॅथी आणि आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतींबाबत अपप्रचार केला जात असल्याचं म्हटलं होतं.

पतंजली आयुर्वेदकडून ड्रग्ज अँण्ड अदर मॅजिक रेमेडिज अ‍ॅक्ट, १९५४ आणि ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे थेट उल्लंघन केले जात असल्याचा दावा देखील इंडियन मेडिकल असोसिएशनने केला होता. तसेच करोना साथीच्या वेळी रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा उल्लेख त्यांच्या रिट याचिकेत केला होता. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी