32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजनराज्यभरातून महेश मांजरेकरांच्या 'नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा' या चित्रपटाच्या...

राज्यभरातून महेश मांजरेकरांच्या ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाच्या वादग्रस्त प्रोमोमुळे संताप व्यक्त

टीम लय भारी
मुंबई:मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या नव्या चित्रपटावरून मुंबईसह राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. तर पुन्हा एकदा महेश मांजरेकर अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.  लालबाग -परळमधील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारीत ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाचा प्रोमो सोमवारी रिलीज झाला असून चित्रपट 14 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. परंतु प्रोमोवरूनच जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे.( Mahesh Manjrekar’s controversial promo VBLKNK”)

महेश मांजरेकर यांनी या चित्रपटात स्वत:च्या फायद्यासाठी, कलेच्या नावाखाली गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांचे विकृत चित्रीकरण केले असल्याचे या प्रोमोमधून दिसत आहे. त्यामुळे मुंबईत सर्व स्तरातून या चित्रपटाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे.

हे सुद्धा वाचा

अभिनेते हेमंत बिरजेंचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात, पत्नीही जखमी

अक्षय कुमार शूट करणार Ram Setu चा अंडरवॉटर सीक्वेन्स, बोलावली इंटरनॅशनल टीम

Bigg Boss 15 l तेजस्वीला बोलताना करण कुंद्राची जीभ पुन्हा घसरली

“Govinda Should’ve Hang Up His Cape After Partner,” Fans Brutally Troll His Latest Music Video & Say “Aapka Daur Jaa Chuka Hai…”

चित्रपटातील संंबंधित दृश्य काढून टाकण्याची मागणी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाकडे करत त्यांना नोटीस बजावली आहे. परंतु एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, नेहमीच गिरणी कामगार आणि मराठीच्या मुद्यावर कायम आक्रमक असणारी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याबाबतीत मूग गिळून गप्प आहेत.

या आधी देखील असाच एक जयंत पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकावरून ‘लालबाग परळ’ हा चित्रपट काढला होता. त्यातही गिरणी कामगारांच्या अवस्थेचे अक्षरशः विकृत चित्रण केले होते. देशोधडीला लागलेल्या सर्वच गिरणी कामगारांच्या बायका-मुली जणू शरीरविक्री करत होत्या, त्यांची मुले फक्त अंडरवर्ल्डमध्ये होती अशा पद्धतीने दाखवले. चाळ संस्कृतीबाबत ‘प्राण जाये पर शान न जाये’ नावाचा आणखी एक तद्दन फालतू चित्रपट यांनी केला. संजय पवार या उत्तम लेखकाच्या ‘सती’ या एकांकिकेवर आधारित महेश मांजरेकर यांनी पुन्हा एकदा मराठी माणूस आणि गिरणी कामगारांच्या पिढीला बदनाम करण्याचे उद्योग सुरू केले आहेत. महेश मांजरेकर पैसा, प्रसिद्धीसाठी मराठी माणसांची, गिरणी कामगारांची अब्रू वेशीवर टांगत आहेत. अनेक प्रकारे महेश मांजरेकरान विरोधात चर्चा सुरू आहे.

ती परिस्थिती तर गिरणी कामगार संपामुळे जरी थोडा खचला तरी त्याने हार मानली नाही. घरातल्या घरधन्यासोबत त्याची पत्नी कामासाठी बाहेर पडली. मुलांनी नाईट कॉलेज करून शिक्षण पूर्ण केले आहे. अनेक गिरणी कामगारांची मुले आज मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठमोठ्या हुद्यावर काम करत आहेत. मी जयंत पवार यांची ‘वरडभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ कथा दोनदा वाचली आहे. कथा वाचताना अंगावर शहारे येतात. त्यात गिरणी कामगार आणि त्यांच्या मुलांची परिस्थितीनुसार झालेली वाताहत आहे. ती तशीच आली असती तर मूळ अधांतर नाटकासारखी दाहकता अंगावर आली असती. मुळात नावात सुद्धा गडबड केली आहे. वरणभात लोन्चा…असे असताना ‘नाय वरणभात लोन्च’  असं धेडगुजरी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी