33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमंत्रालयPFI : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्या 'पीएफआय' संघटनेवर गृह मंत्रालयाने...

PFI : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्या ‘पीएफआय’ संघटनेवर गृह मंत्रालयाने घातली बंदी

केंद्र सरकारने आज 'पीएफआय' (PFI) म्हणजेच 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' या संघटनेवर 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे आणखी 8 संघटनांवर देखील बंदी घातली आहे. गृह मंत्रालयाने या संघटनांवर बंदी घालण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत.

केंद्र सरकारने आज ‘पीएफआय’ (PFI) म्हणजेच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे आणखी 8 संघटनांवर देखील बंदी घातली आहे. गृह मंत्रालयाने या संघटनांवर बंदी घालण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. या सर्व संघटनांची चौकशी केली असता त्या दहशवाद्यांना पैसा पुरवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पीएफआय आणि त्यांच्याशी संबंधी संघटनांकडून देशाच्या सुरक्षेला मोठा धोका आहे. त्यामुळेच त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

एनआयए, ईडी आणि राज्य पोलिसांनी 22 आणि 27 सप्टेंबरला ‘पीएफआय’ संघटनांच्या कार्यालयांवर छापेमारी सुरू केली. या कारवाईमध्ये सुमारे 356 जणांना अटक करण्यात आली आहे. 12 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाटणा येथे झालेल्या रॅलीमध्ये त्यांच्यावर हल्ला करण्याचा कट या संघटनेकडून रचण्यात आला होता, असे तपास यंत्रणांच्या चौकशीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ‘पीएफआय’कडून गोपनिय कागदपत्रं हस्तगत करण्यात आली आहेत. त्यामध्ये 2047 पर्यंत भारताला इस्लाम‍िक राष्ट्र बनवण्याचा इरादा असल्याचे उघड झाले आहे.

यामध्ये रिहैब इंडिया फाउंडेशन, कँप्स फ्रंड ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम काउंसिल, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ हयुमन राईटस, नॅशनल विमेन्स फ्रंट, ज्यूनिअर फ्रंट, इम्पावर इंडिया फाउंडेशन, रिहैब फाउंडेशन इत्यादी संघटनांचा यामध्ये समावेश आहे. पीएफआय आणि त्यांच्याशी संबंधी संघटना गैरव्यवहार करत होते. त्यांच्याकडून देशाच्या एकता, अखंडता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला होता.

या संघटना शांती आणि धार्मिक अशांततेला खत पाणी घालत होत्या. या सगळया कारवाया लपून सुरू होत्या. ‘पीएफआय’ आणि त्यांच्याशी संबंधी संघटना आर्थिक, शैक्षण‍िक, राजकीय संस्थांशी संबंधीत काम करत होत्या. अत‍िषय गोपनिय पद्धतीने त्या लोकशाहीला धक्का पोहोचवण्याचे काम करत होत्या.

हे सुद्धा वाचा

Memes : जाणून घ्या ! ‘मीम्स’चा इतिहास

Flowers : महिलांसाठी खास : तुमच्या केसात माळलेली फुलं, तुमचं आयुष्य वाढवतील

Nashik News : काय सांगता! वकील विकतोय बिबट्याची कातडी

या संघटना युवक, विद्यार्थी, महिला, वकील यांच्याशी जवळीक वाढून आपले प्रस्त वाढवण्याचे प्रयत्न करत होत्या. बॅंकेची साखळी, हवाला आणि डोनेशनच्या मार्फत पीएफआय आणि त्यांच्याशी संबंधी संघटना भारत आणि परदेशातून फंड जमा करत होत्या. हा फंड छोटया प्रमाणात अनेक  खात्यांमध्ये ट्रान्सफर केला जायचा. त्याचा वापर गैरव्यवहारासाठी तसेच दशहतवादी कारवायांसाठी केला जात होता. त्यांच्या आर्थिक व्यवहारांची इन्कम टॅक्स विभागाला सांगड बसत नव्हती. त्यामुळे संशय वाढत गेला. उत्तरप्रदेश, कर्नाटक, गुजरात सरकारने या संघटेवर बंदी घातली आहे.

‘पीएफआय’ आणि त्यांच्याशी संबंधी संघटनांचा इराक, सीरिया आणि अफगाणिस्तानमधील आयएसआयएसशी संबंध असल्याचा संशय आहे. काही द‍िवसांपूर्वी घडलेल्या घटनांमध्ये पीएफआयाचा संबंध असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये एका प्रोफेसरचा हात कापला होता. तसेच धर्मांतरावरुन हत्या करण्यात आल्या होत्या. या घटनांचा समावेश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी