31 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनप्राजक्ता गायकवाडचा 'साजनी' अंदाज, नवे गाणे प्रदर्शित

प्राजक्ता गायकवाडचा ‘साजनी’ अंदाज, नवे गाणे प्रदर्शित

टीम लय भारी

मुंबई : झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ऐतिहासिक मालिकेत काम करणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या मालिकेतील तिच्या येसूबाई राणीसाहेबांची भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मात्र प्राजक्ता एका नव्या भूमिकेत तिच्या चाहत्यांना दिसणार आहे (Prajakta Gaikwad’s new song screened).

प्राजक्ता तिच्या चाहत्यांसाठी ‘साजनी’ या गाण्यातून भेटीस येणार आहे. आपल्या नव्या गाण्यावर प्रतिक्रिया देताना प्राजक्ता म्हणाली, ‘साजनी’ हे गाणं अतिशय सुंदर आहे. त्याचे म्युझिक बिट्स गाणे ऐकणाऱ्याला गुणगुणायला लावतात. तसेच हे गाणे सकाळी ऐकल्यावर खूप फ्रेश वाटेल कारण गाण्याचे म्युझिक खूप आनंद देणारे आहे.

Happy birthday Shah Rukh : शारुखने माझ्या आयुष्याला आकार दिला, करण जोहरची खास पोस्ट

Gaddar 2 : सनी देओलने शेअर केली नव्या सेटवरची झलक

Prajakta Gaikwad's new song screened on Youtube
प्राजक्ता सोबत या गाण्यात सिद्धांत तुपे दिसणार आहे

मुख्य म्हणजे प्राजक्ताच्या वाढदिवसाच्या निमित्तावर या गाण्याचे टिझर लॉन्च करण्यात आले होते. ६ ऑक्टोबरला टिझर लॉन्च झाला असून प्रेक्षकांना हे गाणे युट्युब आणि मायबोली चॅनलवर पाहायला मिळणार आहे. तसेच या गाण्याची निर्मिती शिवाजी जावळे, संदीप कुंजीर, गजानन सानप, संदेश भोंडवे यांनी केली आहे.

Kill Chori | श्रद्धा कपूर आणि भुवन बामच्या जोडीची कमाल, ‘किल छोरी’ गाण्याची युट्युबवर धमाल

Shah Rukh Khan’s son Aryan changes Instagram DP, Sushmita Sen becomes ‘bua’

Prajakta Gaikwad's new song screened on Youtube
‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’ मालिकेत येसूबाई राणीसाहेबांची साकारली होती भूमिका

प्राजक्ता सोबत या गाण्यात सिद्धांत तुपे दिसणार आहे. सिद्धांतचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. हे गाणे धैर्य आणि तेजस या दोघांनी स्वरबद्ध केले असून संकल्पना निर्माते शिवाजी काळे यांची आहे. तर हे गाणे बाळा कांबळे यांनी शब्दबद्ध केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी