29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनअरेच्च्या : २४ तासांसाठी भिकारी बनला 'हा' प्रसिद्ध युट्यूबर

अरेच्च्या : २४ तासांसाठी भिकारी बनला ‘हा’ प्रसिद्ध युट्यूबर

आजकाल सोशल मीडियाच्या मायावी जगात प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. सोशल मीडियाच्या गर्दीत उठून दिसण्यासाठी तसेच युट्युब चॅनेलचे ह्यूज वाढविण्यासाठी आजवर अनेक तरुणांनी सर्वस्व बाजूला ठेवत धाडसाचे तर काही गंमतीशीर निर्णय घेतले आहेत. ज्याने वेळोवेळी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळी काहींच्या प्रयत्नांना यश आले तर काहीजणांनी रयते शेवटी कपाळाला हात लावला. असंच आणखी एक गमतीशीर उदाहरण आपल्यासमोर एका युट्युबरने ठेवले आहे, तो प्रसिद्ध युट्यूबर चक्क २४ तासांसाठी भिकारी बनला. या वृत्तामुळे सुरुवातीला त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता.

सार्वजनिक ठिकाणी जाऊन आपल्या व्याधींचे जखंमाचे, अपंगत्वाचे किंवा असहायतेचे प्रदर्शन करून पैसे किंवा अन्नवस्त्रादी अन्य वस्तूंची याचना करणे म्हणजे भीक मागणे आणि या मार्गाने उपजीविका करणारा भिकारी. त्यांचे जीवन कसे असते? त्यांना दिसभरात कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, हे जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध यूट्यूब क्रिएटर रोहित साधवानी याने २४ तासांसाठी भिकारी बनण्याचे आव्हान स्वीकारले. दोन आठवड्यांपूर्वी टाकलेल्या त्याच्या या व्हिडिओला १ मिलियनपेक्षा अधिक जणांनी पाहिले आहे आणि १ लाखांपेक्षा अधिक लाईकस मिळाले आहेत.

रोहित साधवानी (Rohit Sadhwani) याने भीक मागण्यासाठी सुरुवातीला मंदिराची निवड केली. यावेळी त्याने फक्त पाण्याची बाटली सोबत ठेवली. तो भिकाऱ्यांसारखी वेशभूषा धारण करून तो मंदिराबाहेर जाऊन बसला. तेव्हा भीक मागून फक्त पाच रुपये मिळत होते. मग त्याने काही लोकांकडे अन्न मागितले आणि अनेकांनी ते देण्यास नकार दिला. एका भाजी विक्रेत्याकडून गाजर आणि फळ विक्रेत्याकडून केळी मिळाली. असेच बरेच तास निघून गेले.

रोहितने याच दरम्यान अनेक गोष्टी अनुभवल्या. त्याला समजले की काही लोक खरोखर भिकारी आहेत आणि काही खरच गरजू आहेत म्हणून भीक मागतात. तर काही भिकाऱ्यांना पाहून वाटलं की ते कोणत्या ना कोणत्या टोळीचा भाग असावेत. यासोबतच भिकारी होणे किती कठीण आहे, याचीही जाणीव झाली. त्याला मानसिक आजारी असलेले लोक सापडले. त्याचप्रमाणे, एक माणूस एकांतात बडबडत होता. याच दरम्यान रोहितला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. तो म्हणाला की, या कामात अनेक तास निष्क्रिय बसल्याने माणूस विचारात बुडून जातो, असे मत त्याने व्यक्त केले.

विशेषतः प्राचीन काळापासून दानाला सर्वच धर्मांत महत्त्वपूर्ण स्थान असल्याचे दिसते. गरजूंना मदत करणे म्हणजे दान करणे हे धर्मकृत्यच होय. आधुनिक काळातील भिकांऱ्याचा प्रश्न हा वेगळा असला, तरी परंपरेने चालत आलेल्या दानधर्मविषयक कल्पनांमुळे तो अनेकदा अधिकच गुंतागुंतीचा बनतो. रोहितला आलेल्या या आव्हाना दरम्यान खूप गोष्टींबाबतचे ज्ञान मिळते. माणूस आणि माणुसकी याचे दर्शन घडते त्यानी केलेल्या या धाडसाचे करावे तितके कौतुक कमी आहे.

रोहित साधवानीचे ‘२४ तासांसाठी भिकारी’ या विषयावरील हे प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पाहा: स्रोत रोहित साधवानी युट्यूब चॅनेल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी