29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रनवाब मलिक आजारीच, मुंबई उच्च न्यायालयाने केले मान्य

नवाब मलिक आजारीच, मुंबई उच्च न्यायालयाने केले मान्य

राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सध्या न्यायालयीन कोठडीत असून ते आजारी आहेत. मगच्या सुनावणी दरम्यान मलिक खरेच आजारी आहेत का, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) विचारला होता. त्यावर शुक्रवारी (दि.24) रोजी मलिक यांच्या वकिलांनी कागदपत्रांच्या आधारे ते आजारी असल्याच कोर्टाला पटवून दिले. कोर्टाने ही नवाब मलिक हे आजारी असल्याचे मान्य केले.(Nawab Malik is sick, Bombay High Court accepted)

नवाब मलिक हे ‘ईडी’ (ED) आणि ‘एनआयए’ (NIA) या दोन तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात असून ते गेल्या वर्षभरा पासून तुरुंगामध्ये आहेत. दाऊद गँग ला दहशतवादासाठी फंडिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर त्यासाठी मनी लॉड्रींग केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे. तुरुंगात असताना ते आजारी पडले असून त्यांना किडनीचा आजार आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. ते आजारी असल्याने त्यांना जामीन द्यावा अशी त्याचे वकील अमित देसाई यांची मागणी होती.

हे सुद्धा वाचा
नवाब मलिक खरच आजारी आहेत का; मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

नवाब मलिकांच्या तात्काळ जामीन सुनावणीला न्यायालयाचा नकार, जाणून घ्या कारण

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या !, कोर्टाने दिला मोठा निर्णय

तर नवाब मलिक यांना कोणताही आजार नाही ते बनाव करत असल्याचे, ईडीचे वकील अनिल सिंग यांचे म्हणणं होते. मात्र, कोर्टानेच प्रश्न उपस्थित केल्याने अखेर ऍड. अमित देसाई यांनी कोर्टाचे समाधान केले . मला जामिन मागण्याचा अधिकार, PMLA कायद्याच्या कलम 45 नुसार मी जामीनासाठी अर्ज करू शकतो, मला चांगले उपचार घेण्याचा अधिकार आहे, असे अनेक मुद्दे ऍड. देसाई यांनी मांडले आणि कोर्टाने हे ते मान्य केले. यानंतर आता कोर्टाने त्याच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास तयारी दाखवाली आहे. येत्या सोमवारी 28 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर प्राधान्याने सुनावणी होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी