33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeराजकीयसंजय राऊत-आगलावे ; काय डोंगूरफेम शहाजी बापू पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल

संजय राऊत-आगलावे ; काय डोंगूरफेम शहाजी बापू पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर याला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला. यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. याबाबत ‘काय डोंगूर’ फेम शहाजीबापू पाटील यांनीदेखील संजय राऊतांवर तोंडसुख घेतले आहे. ते म्हणाले, “संजय राऊत महाराष्ट्रभर आग लावत फिरत आहेत. त्यांचे नाव संजय राऊत नव्हे, तर संजय आंगलावे असे ठेवायला पाहिजे. श्रीकांत शिंदे यांच्यासारख्या निष्पाप नेत्यावर राऊत घाणेरडे आरोप करत आहेत. संजय राऊत सध्या कोणाबद्दल काय बोलतील याचा नेम नाही.” (Shahajibapu Patil criticize Sanjay Raut said he should change his name)

शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. ते म्हणाले, खरे तर संजय राऊत यांचे नामकरण करून त्यांचे नाव संजय आगलावे ठेवायला पाहिजे. श्रीकांत शिंदे प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांच्यासारख्या तरुण, निष्पाप नेतृत्वावर संजय राऊत घाणेरडे आरोप करत आहेत. राऊतांना असले आरोप करणे शोभत नाही. पण बेभान झालेले संजय राऊत सध्या कोणावर काय आरोप करतील याचा नेम नाही. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीत शहाजीबापू पाटलांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, हा कोण शहाजी? हा खरा शहाजी आहे का? याने शहाजी नाव बदललं पाहिजे. यामुळे भोसले घराण्याचा अपमान होतोय.

रश्मी ठाकरेंना अश्लील भाषेत शिवीगाळ
संजय राऊत यांनी माझ्यासमोर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. याबाबत शहाजीबापू पाटलांना विचारले असता त्यांनी संजय राऊत यांच्या निष्ठेवर शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले, संजय राऊत मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत, असे मला कधीच वाटले नाही. त्यांनी मातोश्रीचं राजकारण उद्ध्वस्त करण्याचीच सुपारी उचलली आहे. रामदास कदम यांनी केलेले आरोप जबाबदारीने केले असतील असे पाटील म्हणाले. रामदास कदम हे एक जबाबदार नेते आहेत. त्यांच्याकडे याप्रकरणी नक्कीच पपुरावे असतील, त्याशिवाय ते असले आरोप करणार नाहीत, असे पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा 

VEDIO : कोर्लईतील १९ बंगल्याचा घोटाळा ; ग्रामसेवक, सरपंचावर गुन्हा दाखल

विषारी हवेने घेतला १३,४४४ मुंबईकरांचा बळी

खलिस्तानवाद्यांना अर्थपुरवठा केल्याप्रकरणी मुंबईतील व्यापारी एनआयएच्या जाळ्यात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी