31 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeमनोरंजनशाहरुख खानच्या 'जवान'ने दुपारपर्यंत कमावले २० कोटी; पण....

शाहरुख खानच्या ‘जवान’ने दुपारपर्यंत कमावले २० कोटी; पण….

गुरुवारी दहिहंडीच्यादिवशी शाहरुख खानचा ‘जवान’ प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सहा तासांतच ऑनलाइन माध्यमावर लीक झाला. त्यामुळे चित्रपटाच्या बिझनेस वर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
‘जवान’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी तसेच मार्केटिंग साठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवण्यात आलाय. ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ या शाहरुखच्या कंपनीनंच ‘जवान’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. अटली यांनी ‘जवान’ चित्रपटाचे दिग्दर्शन केलंय. दक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारांनानं ‘जवान’ चित्रपटातून हिंदी सिनेमासृष्टीत पदार्पण केलं.

चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. संजय दत्तदेखील चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारतोय असं सूत्रांनी सांगितलं. प्रदर्शनाअगोदरच ॲडव्हान्स बुकिंगमधून साडेसात लाख तिकिटे विकली गेली होती. ‘जवान’ चित्रपटात दोन-तीन दिवसातच १०० कोटी पार करेल, असा अंदाज चित्रपट व्यापार तज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र हा चित्रपट पायरसीला बळी पडला. ‘जवान’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच ऑनलाइन लीक झाला.

हे सुद्धा वाचा 
दहिहंडीचा उत्साह सोशल मीडियावर; बाळगोपाळांची रिल्स व्हायरल 
दहीहंडीसोबत मुंबई, ठाण्यात पावसाचे आगमन!
जीआर घेऊन अर्जुन खोतकर यांनी घेतली जरांगेंची भेट, मात्र आंदोलन कायम

तमिळरॉकर्स, टेलिग्राम आणि मूव्हीरूल्झ सारख्या पायरसी वेबसाइट्सवर सिनेमाचीएचडी आवृत्ती लीक झाली. गुरुवारी पहिल्या शोच्यावेळी चित्रपटाची पायरसी विकली गेल्याचं समजतं. दुपारी बारापर्यंत ‘जवान’ चित्रपटानं १९.३५ कोटी रुपयांची कमाई केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी