29 C
Mumbai
Friday, July 5, 2024
Homeमनोरंजनकुत्र्यांसोबतच्या ‘त्या’ फोटोमुळे शिल्पा शेट्टी ट्रोल; नेटकरी म्हणाले…

कुत्र्यांसोबतच्या ‘त्या’ फोटोमुळे शिल्पा शेट्टी ट्रोल; नेटकरी म्हणाले…

टीम लय भारी

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच शिल्पाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे शिल्पाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे (Shilpa Shetty has been trolled by netizens for her photo with dogs).

शिल्पाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पाने पांढऱ्या रंगाच डेनिम जॅकेट परिधान केलं आहे. शिल्पाच्या आजुबाजूला रस्त्यावरील भटके कुत्रे दिसत आहेत. मात्र, सगळ्यांचं लक्ष हे शिल्पाने दिलेल्या पोजने वेधले आहे. शिल्पाने फिल्म सिटीमध्ये असलेल्या या कुत्र्यांसोबत फोटो काढले आहेत. यावेळी काही नेटकऱ्यांनी तिला पशु प्रेमी म्हटलं तर काहींनी तिला राज कुंद्राच्या नावावरून ट्रोल केलं आहे.

राज कुंद्रा, शिल्पा शेट्टींना इन्सायडर ट्रेडिंगच्या आरोपावर SEBI कडून 3 लाखांचा दंड

‘माझ्या मुलीने दोन वर्षात खूप काही कमावलं…, आलियाच्या यशाने आनंदी झालेयत महेश भट्ट!

शिल्पाचा हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “कुंद्राला ट्रेनिंग दे त्याला गरज आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “तिचा नवरा कुठे आहे.” तिसरा नेटकरी म्हणाला, “रेड कार्पेट ठीक आहे, पण तिच्या पतीच्या पॉर्न फिल्म्सचं काय.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “यापैकी कुंद्रा कोणता आहे?” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

Tadap: फिल्म ‘तडप’चा टीझर प्रदर्शित

Shilpa Shetty has Bollywood hair crush and it’s none other than evergreen Dimple Kapadia

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी