25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
Homeमनोरंजनविशाल भारव्दाजचा वारसा चालवणार मुलगा आसमान; बड्या कलाकारांना घेऊन दिग्दर्शनात पदार्पण

विशाल भारव्दाजचा वारसा चालवणार मुलगा आसमान; बड्या कलाकारांना घेऊन दिग्दर्शनात पदार्पण

बॉलीवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारव्दाज (Vishal Bharwadaj) यांची आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळख आहे, त्यांनी मेहमीच वेगळे विषय हाताळून अतिशय भव्यदिव्य असे चित्रपट दिले आहेत. त्यांचा मुलगा आसमान भारव्दाज (Asmaan Bharwadaj) देखील आता दिग्दर्शनात पाऊल ठेवत असून तो वडिलांचा वारसा पुढे चालवत आहे. नसीरुद्दीन शाह, तब्बू, अर्जुन कपूर यांचा अभिनय असलेला ‘कुत्ते’ ( Kutte film) हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या वाटेवर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. कोंकणा सेनशर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाज यांच्यासह अनेक कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)


या चित्रपटाची सिनेरसिकांमध्ये जोरदार चर्चा होती. पोस्टर रिलीझ झाल्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांना, दिग्दर्शक आणि कलाकारांना देखील प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. आज ‘कुत्ते’या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे, या पोस्टरमध्ये कलाकारांचा लूक आणि पात्रांची झलक दिसत आहे. अतिशय हटके असे या चित्रपटाचे पोस्टर असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
हे सुद्धा वाचा

आपण भारत-पाकिस्तान सीमेवर राहतो का? कर्नाटकमुद्यावरून अंबादास दानवे यांचा सवाल

देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करुनही कर्नाटकच्या कुरापती सुरूच; अजित पवार विधानसभेत गरजले

१७ वर्षांच्या क्रिशा चंदाने पटकावला मिस इको टीन सौंदर्य स्पर्धेचा मुकुट

‘कुत्ते’या चित्रपटाच्या कथेतील ताजेपणामुळे चित्रपट प्रेक्षकांवर नक्कीच आपली छाप सोडेल. आसमान भारद्वाज आणि विशाल भारद्वाज यांनी हा चित्रपट लिहिलेला आहे. लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज निर्मित, ‘कुत्ते’हा चित्रपट गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरीजद्वारा प्रस्तुत आहे. तसेच, या चित्रपटाला संगीत विशाल भारद्वाज देणार असून गुलजार यांनी गीते लिहिली आहेत. ‘कुत्ते’हा चित्रपट 13 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी