27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
HomeमुंबईFightToCorona : सचिन तेंडूलकरने ठाकरे पिता - पुत्रांचे केले कौतुक

FightToCorona : सचिन तेंडूलकरने ठाकरे पिता – पुत्रांचे केले कौतुक

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ आपत्ती ( FightToCorona ) निवारण्याच्या अनुषंगाने ‘नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया’च्या ( NSCI ) घुमटवजा सभागृहात विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. आदित्य ठाकरेंच्या पुढाकारातून ( FightToCorona ) हा कक्ष स्थापन झाला आहे. या कामाचे कौतुक करणारे ट्विट क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने केले आहे.

एनएससीआय सभागृहाचे विलगीकरण कक्षात रूपांतर ( FightToCorona ) केल्याचे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले होते. त्यावर सचिन तेंडूलकरने आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरेंना टॅग करीत ‘याची नक्कीच गरज होती. या कसोटीच्या काळात मुख्यमंत्री आणि महापालिकेने कार्यतत्परता दाखवून चांगले काम केले आहे’ अशा भावना सचिन यांनी व्यक्त केल्या आहेत.

सचिन यांच्या या ट्विटवर आदित्य ठाकरेंनीही आभार व्यक्त केले आहेत. ‘सचिनजी धन्यवाद. ही आजाराची साखळी तोडण्यासाठी तुम्ही शाब्दिक आवाहन करीत आहात. तुमचे हे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. विलगीकरण कक्ष हा संभाव्य आपत्ती ( FightToCorona ) टाळण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

‘कोरोना’च्या आपत्तीकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्कृष्ट काम ( FightToCorona ) करीत आहेत. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनीही उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. ‘तू एवढ्या खंबीरपणे काम करशील असे वाटले नव्हते’ अशा शब्दांत सिंधुताईंनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले.

हृतिक रोशन, शाहरूख खान, सोनम कपूर, परिणीती चोप्रा या चित्रपट कलावंतांनीही उद्धव ठाकरेंच्या कामावर समाधान व्यक्त केले आहे. आता दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यानेही उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुक केले आहे.

अक्षय कुमारकडून मुंबई महापालिकेसाठी ३ कोटींची मदत

अभिनेता अक्षयकुमार याने यापूर्वी केंद्र सरकारच्या पीएम केअर फंडासाठी २५ कोटी रुपयांची मदत केली होती. आता मुंबई महापालिकेसाठी सुद्धा त्याने ३ कोटी रुपयांची मदत केली आहे. ‘कोरोना’ रूग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट विकत घेण्यासाठी त्याने ही मदत केली आहे.

आणखी बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

कोरोना : जामखेड शहर हॉटस्पॉट केंद्र जाहीर

Lockdown21 : उद्धव ठाकरे – अनिल देशमुखांची धडक कारवाई, बेजबाबदार IPS गुप्तांना पाठविले सक्तीच्या रजेवर

Wadhawan : गृह सचिव अमिताभ गुप्तांचा बेफिकीरपणा, बिल्डरला 23 जणांसह महाबळेश्वरला जाण्यासाठी दिली परवानगी

‘कोरोना जिहाद’चा खोटा व्हिडीओ

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी