32 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeक्रिकेटनिर्माते-दिग्दर्शक प्रस्तुती केवळ मंडळाची-नाटक “ करतंय क्रिकेटचा भला “

निर्माते-दिग्दर्शक प्रस्तुती केवळ मंडळाची-नाटक “ करतंय क्रिकेटचा भला “

अभय गोवेकर, भारत न्युझीलंड कानपूर कसोटी क्रिकेट अध्याय

सौजन्य – आवाजकरी मंडळी

संचालक – समस्त वेंगुर्लेकर

सौराष्ट्राचा चेतेश्वर पुजारा याने आजपर्यंत ९१ कसोटी खेळून ६५४२ धावा स्वत:च्या खात्यात जमा केलेल्या आहेत. तर केवळ कानपूर कसोटीसाठी नियुक्त केलेल्या अजिंक्य राहाणेच्या नावावर ७९ कसोटी जमा आहेत. त्यात त्याने ४७९५ धावा केलेल्या आहेत. आज दोघांच्याही बॅटींना ओहोटी लागलेली आहे. त्यांच्याकडून संघाच्या मधल्या फळीतील महत्वाचे, भरवशाचे फलंदाज म्हणून असमाधानकारक कामगिरी प्रकर्षाने जाणवत आहे. दोघेही आपापल्या फॉर्ममध्ये नाहीत. तरीही द्रविड रहाणेचे समर्थन करणारच(Abhay Govekar : Promising batsman performance feels unsatisfactory).

कानपूर कसोटीपूर्वी मंडळाने काही खेळाडूंच्या सरावाची खास मुंबईच्या बी.के.सी. मैदानावर व्यवस्था केलेली होती. या सरावातून या दोघांनाही काही विशेष फायदा झालेला नाही. कानपूर कसोटीत आपण सर्व पाहिले तसेच अनुभवले. दोघांचीही सरासरी लज्जास्पद आहे. संघ बदलाची आवश्यकता आहेच.

“पावसकर विरुध्द मुंबई कसोटी सामना”

“भारत न्युझीलंड कानपूर कसोटी क्रिकेट अध्याय”

कोहली, राहूल, रोहित शर्मा हे नसताना मिळालेल्या संधीचा फायदा करुन घ्यावयास हवा होता. ते शक्य झाले नाही. मुंबई कसोटीत कोहली हा रहाणे कडून आपली जागा हक्काने घेईल. कानपूर कसोटी निर्णयाचा परिणाम निवड करताना फारसा होणार नाही. रहाणे केवळ खेळाडूच राहिल त्यानुसारच त्याच्या जागेचा विचार होईल. श्रेयस अय्यरला हात लावला जाणार नाही. पुढे तर हनुमान विहारी – वॉशिंग्टन सुंदर सुध्दा संघ निवडीसाठी उपलब्ध होतील. निवड समितीच्या चर्चेत भारतीय फलंदाजीचा खास विक्रम राठोडने आपल्या दिड कसोटीचे ज्ञान तसेच अनुभवाने फोडणी देऊन पुजारा, रहाणेने भुतकाळातील केलेल्या कामगिरीचाही विचार करावा, असा विचार प्रकट केल्यास करमणुकीसाठीच्या चर्चेला एक मुद्दा मिळू शकेल. वर्तमानकाळातील परिस्थितीत तोडगा उपलब्ध होणार नाही.

करूण नायरच्या त्रिशतकाचा विषय किंवा कुलदीप यादव या नावांचीही त्याने चर्चा घडवून आणली. परंतु मूळ विषयाकडे त्याचा थेट संबंधच येत नाही. संघातील निवड झालेले खेळाडू सातत्याने अपयशी ठरत आहेत. हे मान्य केल्यावर त्यांची जागा कुणी घ्यावी यावर मात्र भाष्य करीत नाही. ३ डिसेंबरला मुंबईत दुसरा कसोटी सामना सुरु होईल. भारताच्या आघाडीच्या जोडीचा योग्य शोध अद्यापही लागलेला नाही. निवड समिती सध्या सापशिडी लुडो खेळण्यात दंग आहे. १९-५६ ही रहाणेची सरासरी तर पुजाराची ३०-४२. विराट हा अफाट आहे. तो कोणालाही सपाट करण्याची क्षमता राखतो. त्याचे महत्वाचे मतही विचारात घेतले जाणार आहे. तोपर्यंत हा फलंदाजाचा प्रशिक्षक राठोड भारतीय फलंदाजांनी केलेल्या विक्रमांची इतिहासातील पाने चाळताना आढळेल. त्याने खेळलेले सामने व ज्याला तो फलंदाजाचे धडे देणार त्याने केलेल्या धावा यातील तफावत पाहता तो स्वत:लाच उघडा पाडेल. स्वत:ची किंमतच कमी करुन घेतल्याने-झाल्याने मानपानही हरवून बसेल. परंतु मंडळाची निवड पसंती दीड-दोन कसोटी खेळणाऱ्यांसाठीची असते.

“भारत न्युझीलंड कानपूर कसोटी क्रिकेट अध्याय” (भाग २)

India vs New Zealand, 2nd Test: Cricket fraternity hails Ajaz Patel’s 10-wicket-an-innings feat

सुनिल गावस्कर, विश्वनाथ, चंदू बोर्डे, दिलीप सरदेसाई, विजय मांजरेकर, हेमंत कानिटकर, रमेश सक्सेना, पार्थसारथी शर्मा, विजय भोसले ते अगदी शिशीर हट्टंगडी पर्यंत. ज्यांना क्रिकेट तंत्र-मंत्रावर बोलण्याचा अधिकार आहे, ज्यांनी त्यांना मैदानावर उघड्या डोळ्यांनी पाहिलेले आहे तेच माझ्या विचारांशी सहमत होतील. यांच्या बचाव तंत्रास तोड नाही. यांचे कर्तृत्व पाहा.

सलामीवीर आघाडीच्या फलंदाजांच्या निवडीसाठी व्ही.एस.पाटील, हेमू दळवी, अरुण अजित पै बंधू, गोपाळ कोळी, सदानंद मोहळ जुन्या चेंडूने कट करणारे वसंत रांजणे, कैलाश गट्टाणी या गोलंदाजांचे केवळ एकच षटक व्यवस्थितरित्या होते. ज्या फलंदाजास खेळून काढता येते त्याची प्राथमिक निवड करण्यास काहीच हरकत नाही, असे हे नामवंत गोलंदाज होते. कोणत्या असोसिएशनने किंबहुना मंडळाने क्रिकेटच्या कल्याणार्थ अशांचा कधी विचार केला होता का ? कांदे-बटाटे पोत्यात भरण्याएवढे आघाडीचे फलंदाज आजवर झाले असते. यष्टीरक्षणाचा विषय आल्यास व अनुकरण करावयाचे झाल्यास नाना जोशी, नरेंद्र ताम्हाणे व त्यानंतर केवळ शरद हजारे ही तीनच नावे योग्य आहेत. हजारे भारतीय संघात आला, परंतु प्रतिनिधीत्व करण्याची संधी मात्र मिळाली नाही. यापूर्वीचे निवड समिती सदस्य मानसिकरित्या आजारी अवस्थेत वावरत होते. १२ ते १६ नावांची एलर्जी असल्याने त्यांना पुढील संधी न देताच त्यांना बाहेरच्या बाहेरच बाहेरचा रस्ता दाखविण्यात येई. त्यांचा क्रिकेटचा आजवर केलेल्या कामगिरीवर वरवंटा वाटला जातो. कारकिर्दीचा अंत केला जातो. फार थोडे पुन्हा क्रिकेट पटलावर दिसतात, परंतु त्यांचे सुवेर-सुतक कोणालाही नसते. असाही भारतीय क्रिकेटमध्ये अध्याय आहे. कुणाकुणाची नावे घ्यावी ?

प्रशिक्षण कार्याचा आढावा घेतल्यास कै. श्री. वसंतराव अमलाडींचे नाव घेतल्याशिवाय हे कार्यच पूर्णत्वास जाणार नाही. ज्यांनी विक्रमादित्य सुनील गावस्कर यांना घडविले, माजी कर्णधार अझरुद्दीनला मोलाचे मार्गदर्शन केले, राजू कुलकर्णीस तेज गोलंदाज बनविला, अनेक रणजी – दुलीप करंडकाचे मानकरी घडविले यांची आठवण शेवटपर्यंत मंडळास झाली नाही. त्यांच्या ज्ञानाचा कधीही वापर करुन घेतला नाही. हे देशाचे, महाराष्ट्राचे, मुंबईचे, खेळाचे तसेच खेळाडूंचे दुर्दैवच. त्या काळात ते एकमेव प्रशिक्षीत एन आय एस प्रशिक्षक होते. या संस्थेच्या प्रशिक्षण कार्यास तोड नाही किंवा कुणाशीही तुलनाही होऊ शकत नाही.

आज आय सी सी ने लेव्हल नावाची लेकरे जन्मास घातली आहेत, त्यांचीच नेमणूक सर्वत्र केली जाते. लेव्हल नसलेले परंतु बहाल केलेले, स्वत:चा वैयक्तिक स्वार्थ, वशिलेबाजीत तरबेज, मालीशवाले यांची संख्या जास्त असल्याने आपली नेमणूक ते स्वत:च यशस्वीरित्या करुन घेतात. मक्तेदारी मिळवून दुसरा कोणीही शिरकाव करणार नाही याची दक्षता घेतात.

लेव्हलला जर लेव्हल नसेल तर विद्वांनानी याचा कोणता अर्थ काढावा ? मंडळास यांचेही प्रेम व अभिमान आहे. असेच जर यापुढे चालणार असेल तर केंद्र सरकारने त्यांनी सुरु केलेली १९६२ पासूनची पटियाला येथील संस्था बंद करावी, इतरत्रही पुर्णविराम द्यावा.

एन आय एस चा एक प्रशिक्षक सर्वांचे काम एकत्रित एकटाच करु शकतो. निवड समितीचा सल्लागार म्हणून भारताचा माजी तेज गोलंदाज टी ए शेखरची सर्वच स्तरावर नेमणूक व्हावी. आमच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या निवड समिती सदस्यांना त्यांच्याच विभागातील खेळाडूंची नावे विचारल्यास देता येणार नाही, जे काम हे व्यक्तिमत्व करेल.  राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू, त्यांची कामगिरी याचा तोंडपाठ आलेख अगदी १९, १७, १५ वर्षांखालील उदयोन्मुख गुणी, होतकरु खेळाडूंची नावे, त्यांची कामगिरी शेखरच्या तोंडी अगदी मुखोदगत आहेत.

टी ए शेखर स्वत: एम आर एफ फाऊंडेशनतर्फे तेज गोलंदाज देशात तयार करण्याचे केंद्र चालवतो, खेळाडूस त्याला आवश्यक असलेल्या सर्व सुखसोयी, सुविधा दिल्या जातात. श्रीनाथ, झहीर खान, व्यंकटेश प्रसाद असे अनेक तेज गोलंदाज मद्रासमधील याच केंद्रातून तयार झाले. श्रीलंकेचा चामिंडा वास, ऑस्ट्रेलियाचे मॅग्राथ सरखे याच केंद्राचे अनुयायी होते. याचीही अहंकारापुढे आठवण झाली नसेल. क्रिकेट खेळणारे अनेक देश जर शेखरचे मार्गदर्शन घेतात तर मग क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रतिनिधींना कोणाची लाज वाटते ?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा आजचा अध्यक्ष सौरव गांगुली आहे. आय सी सी क्रिकेट कौन्सिल समितीच्या अध्यक्षपदीही त्याचीच निवड झालेली आहे. आता तो त्याचा जुना सहकारी अनिल कुंबळे कडून सुत्रे स्वीकारेल. गांगुलीचा खेळाडू म्हणून अनुभव सोबत आता प्रशासकाची जबाबदारी असा शर्करायुक्त योग क्रिकेट हितासाठी महत्वाचा ठरणार आहे.

देशातील अनेक राज्यातील संस्था असोसिएशन तसेच सर्व स्तरावरील खेळाडूंना गांगुलीकडून अनेक आशा, आकांक्षा, अपेक्षा आहेत. गांगुलीस योग्य तो कालावधीही उपलब्ध होणार आहे. पुढील येणारा काळ देशाच्या क्रिकेटची दशा, दिशा ठरविणारा असेल. मंडळाचा अध्यक्ष आय सी सी चा प्रतिनिधी त्याचे देशासाठीचे योगदान, कर्तृत्व पाहता सर्वांचाच पाठींबा असेल. ते आसन त्याच्या सारख्यासच शोभते, राजकारणी नेत्यास नाही. त्यांच्यापेक्षा खेळाडू श्रेष्ठ हे त्याला सिध्द करावे लागेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी