30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeआरोग्यकिडनीच्या आरोग्यावर भर देत अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये जागतिक किडनी दिन साजरा

किडनीच्या आरोग्यावर भर देत अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये जागतिक किडनी दिन साजरा

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने “जागतिक किडनी दिन” फॅमिली फिजिशियन असोसिएशन आणि न्यू निमा नाशिक यांच्या सोबत अभिमानाने साजरा केला, किडनीच्या आरोग्याविषयी जागरुकता वाढविण्यावर या चर्चासत्रात भर देण्यात आली. या कार्यक्रमात फॅमिली फिजिशियन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विनय मोगल, सचिव डॉ. शीतल सुरजुसे, कोषाध्यक्ष डॉ. विजय मुंदडा, (आयपीपी) डॉ. पंकज देवरे, व न्यू निमा नाशिक अध्यक्ष डॉ. दीपक चौधरी, सचिव डॉ. प्रशांत वाणी, आणि खजिनदार डॉ. परीक्षित खाचणे, डॉ अविनाश बाविस्कर , डॉ अजय पाटील आणि पदाधिकाऱ्यांच्या सन्माननीय उपस्थितीने हा कार्यक्रम संपन्न झाला, जो किडनीच्या आरोग्याला चालना देण्यासाठी आणि जनजागृतीसाठी सहयोगी प्रयत्नांना प्रतिबिंबित करतो.

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने “जागतिक किडनी दिन” फॅमिली फिजिशियन असोसिएशन आणि न्यू निमा नाशिक यांच्या सोबत अभिमानाने साजरा केला, किडनीच्या आरोग्याविषयी जागरुकता वाढविण्यावर या चर्चासत्रात भर देण्यात आली. या कार्यक्रमात फॅमिली फिजिशियन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विनय मोगल, सचिव डॉ. शीतल सुरजुसे, कोषाध्यक्ष डॉ. विजय मुंदडा, (आयपीपी) डॉ. पंकज देवरे, व न्यू निमा नाशिक अध्यक्ष डॉ. दीपक चौधरी, सचिव डॉ. प्रशांत वाणी, आणि खजिनदार डॉ. परीक्षित खाचणे, डॉ अविनाश बाविस्कर , डॉ अजय पाटील आणि पदाधिकाऱ्यांच्या सन्माननीय उपस्थितीने हा कार्यक्रम संपन्न झाला, जो किडनीच्या आरोग्याला चालना देण्यासाठी आणि जनजागृतीसाठी सहयोगी प्रयत्नांना प्रतिबिंबित करतो.

डॉ. विपुल गट्टानी, किडनी विकार तज्ञ आणि डॉ. श्याम तलरेजा, मूत्र विकार तज्ञ यांच्या नेतृत्वाखाली, या कार्यक्रमात किडनीचे आजार रोखण्यासाठी सक्रिय उपाययोजनांच्या महत्त्वावर भर देण्यात आली. या माहितीपूर्ण सत्रांद्वारे, उपस्थितांनी मूत्रपिंडाच्या आरोग्याच्या विविध पैलूंबद्दल मौल्यवान माहितीची देवाणघेवाण केली , ज्यात प्रतिबंधात्मक धोरणे, किडनी आजारांची लक्षण शोधण्याची नाविन्यपूर्ण पद्धती आणि त्यावरील उपचार पर्यायांचा समावेश होता.

नेफ्रोलॉजिस्ट डॉ. विपुल गट्टानी यांनी यावेळी सांगितलं, जागतिक किडनी दिन किडनीच्या आरोग्याचे महत्त्व आणि किडनीच्या आजारांचा सामना करण्यासाठी सामूहिक जनजागृती करण्याची गरज आहे. जनजागृती उपक्रम आणि शिक्षणाद्वारे आपण व्यक्तींना सक्षम बनवू शकतो. आरोग्य सेवा प्रदाते म्हणून, व्यक्तींना त्यांच्या मूत्रपिंडाच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी शिक्षित आणि सक्षम करणे ही आमची जबाबदारी आहे.

यूरोलॉजिस्ट डॉ. श्याम तलरेजा पुढे म्हणाले, किडनी विकारांचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळेवर हस्तक्षेप आणि प्रगत उपचार पर्यायांचे महत्त्व सांगितले, “वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, आमच्याकडे आता मूत्रपिंडाच्या आजारांवर उपचार पद्धती उपलब्ध आहेत. वेळेवर निदान आणि योग्य उपचार पद्धतीमुळे रुग्णांच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते. ”

या चर्चासत्रात मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख यांनी हॉस्पिटलच्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती देत सुरवातीला डायलेसिस विभागातील डॉक्टर , परिचारिका व कर्मचारी यांचे अभिनंदन केले, या वर्षी 51,000 डायलिसिस रुग्णांवर उपचार करण्यात आले, या व्यतिरिक्त, 63 यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले, जे रुग्णांचे जीवन सुधारण्यासाठी अवयव दान आणि प्रत्यारोपणाचे महत्त्व अधोरेखित करतात.किडनीच्या सर्वांगीण आरोग्यासाठी किडनी रोगांचे लवकर निदान, वेळेवर हस्तक्षेप आणि इष्टतम व्यवस्थापनास प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविण्याच्या वचनबद्धतेसह कार्यक्रमाचा समारोप झाला. या प्रसंगी सेंटर हेड अनुप त्रिपाठीं , मार्केटिंग हेड पियुष नांदेडकर, ऑपरेशन हेड आशिष सिंग मेडिकल ऍडमिन डॉ किशोर टिळे यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग विभागने परिश्रम घेतले.

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल बद्दल:
अशोका मेडिकोव्हर हॉस्पिटल ही एक अग्रगण्य आरोग्य सेवा संस्था आहे जी व्यक्ती आणि समुदायांना सर्वसमावेशक आणि वैद्यकीय आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी कायम तत्पर आहे. अत्याधुनिक सुविधा आणि अनुभवी डॉक्टरच्या टीमसह अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल विविध विषयांमध्ये रुग्ण-केंद्रित आरोग्यसेवा प्रदान करण्याचा काटेकोर प्रयत्न करत.

जागतिक किडनी दिनाविषयी:
जागतिक किडनी दिन ही एक जागतिक जागरुकता मोहीम आहे ज्याचा उद्देश किडनीच्या आरोग्याच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि जगभरातील किडनी रोगांचे प्रमाण कमी करणे आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो, जागतिक किडनी दिन किडनीच्या आरोग्याला चालना देण्यासाठी आणि मूत्रपिंडाच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती, शिक्षण आणि सहयोगी कृतीसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी