28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक बिल्डरच्या सीएसआर फंडातून जॉगिंग ट्रॅकचे काम करण्यास रहिवाशांचा विरोध

नाशिक बिल्डरच्या सीएसआर फंडातून जॉगिंग ट्रॅकचे काम करण्यास रहिवाशांचा विरोध

महापालिकेच्या ताब्यातील पाटबंधारे खात्याच्या जागेत अतिक्रमण करण्याचा बिल्डरचा डाव शनिवारी उघड झाल्याने सीएसआर फंडातून इंडिगो पार्क जॉगिंग ट्रॅक विकसित करण्यास रहिवाशांनी तीव्र विरोध केला. प्रेझेंटेशन दाखविणारे बिल्डरचे आर्किटेक्ट व इंजिनिअर यांना परत पाठविण्यात आले. गोविंदनगरच्या जॉगिंग ट्रॅकची जागा ही कराराने महापालिकेच्या ताब्यात आहे. इंडिगो पार्क येथील ट्रॅक श्रीजी ग्रुप या बिल्डरच्या सीएआर फंडातून विकसित करण्याचा घाट घालण्यात आला आहे. या कामाच्या नावाखाली अतिक्रमण होवू नये, यासाठी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने रहिवाशांनी बुधवारी, १३ मार्च रोजी महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांची भेट घेतली, निवेदन दिले.

याला न जुमानता दुसर्‍याच दिवशी गुरुवारी बिल्डरने या ठिकाणी पांढरे पट्टे मारून काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. गायकवाड (देशमुख) यांनी महापालिकेला हे कळविले. आज शनिवारी सकाळी आठ वाजता बिल्डरमार्फत आर्किटेक्ट विशाल कोटेकर व इंजिनिअर सुनील सोनटक्के हे प्लॅन घेवून ट्रॅकवर आले. शेकडो रहिवाशांना त्यांनी प्लॅन समजावून सांगत प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाहन पार्किंगची जागा, बसण्याची व्यवस्था करणे, तसेच सुशोभिकरणाच्या नावाखाली ट्रॅकची लांबी कमी करून अतिक्रमण होणार असल्याचे उघड झाले. स्वत:च्या बांधकाम साईटसाठी बिल्डरचा हा खटाटोप सुरू असल्याने रहिवाशी संतापले. सीएसआर फंडातून हे काम करण्यास त्यांनी तीव्र विरोध दर्शविला, आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला. संबंधित आर्किटेक्ट व इंजिनिअर यांना परत पाठविले. सीएसआर फंडातून काम न करण्याचा, तसेच ट्रॅकलगत वृक्षारोपण करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. यावेळी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख),रमेश गावीत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, जगन्नाथ पवार, नाना जगताप, राजेंद्र वडनेरे, संजय बावीस्कर, प्रभाकर खैरनार, कैलास चुंबळे, सागर मोटकरी, सुभाष बडगुजर, घनश्याम सोनवणे, बापूसाहेब पानपाटील, सुनील देशमुख, गोपीचंद बाविस्कर, रवींद्र पाटील, प्रकाश पाटील, रुपसिंग महाले, विलास थोरात, चंद्रशेखर पाटील, सुनील पाटील, भगवान पाटील, महेश वीर, हर्षद पगार, कृष्णा पाटील, मकरंद सरोदे, हिरामण धांडे, संजय पाटील, प्रशांत पाटील, माधव रवारकर, रवी गायकवाड, व्ही. के. सोनवणे, मंदाकिनी कौलगीकर, छाया नवले, स्मिता जोशी, निता दुसाने, पुष्पा पाटील, माधुरी यावलकर, शशिकला चौधरी, कामिनी मुर्तडक, संगीता कोठावदे, मंगेश राजहंस, अमित पवार, गणेश शिंदे, संजय जाधव, राहुल जैन, दत्रात्रय दळवी, सुशीला फड, प्रमिला पाटील, लता पवार, लता राऊत, करुणा शेलार, सुनीता सोनवणे, मनीषा ह्याळीज, एस. जे. गुजराथी आदींसह शेकडो पुरुष, महिला रहिवाशी हजर होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी