28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररणधुमाळीला सुरुवात…महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान; जाणून घ्या संपूर्ण माहिती

रणधुमाळीला सुरुवात…महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान; जाणून घ्या संपूर्ण माहिती

देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election 2024 ) निवडणूक आयोगाकडून आज घोषणा करण्यात आली. आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून देशात सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. तर महाराष्ट्रात (Maharashtra lok sabha)पाच टप्यात मतदान होणार आहे. राज्यात गेल्या अडीच वर्षात राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. आधी महाविकास आघाडी सत्तेतं आलं आणि त्यानंतर शिवसेना (ShivSena) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP)उभी फूट पडली. त्यानंतर आता महायुती सरकार स्थापन झालं आहे. आता राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

देशाच्या 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election 2024 ) निवडणूक आयोगाकडून आज घोषणा करण्यात आली. आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून देशात सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. तर महाराष्ट्रात (Maharashtra lok sabha) पाच टप्यात मतदान होणार आहे. राज्यात गेल्या अडीच वर्षात राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. आधी महाविकास आघाडी सत्तेतं आलं आणि त्यानंतर शिवसेना (ShivSena) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP)उभी फूट पडली. त्यानंतर आता महायुती सरकार स्थापन झालं आहे. आता राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra loksabha) यंदा पाच टप्प्यात मतदान होणार आहे. मागच्या वेळी लोकसभेला चार टप्प्यांमध्ये निवडणूक झाली होती.

लोकसभेचे बिगुल वाजलं; जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल

महाराष्ट्रात (Maharashtra loksabha) मतदान कधी आणि कुठे ?

  1. पहिला टप्पा – 19 एप्रिल:  रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
  2. दुसरा टप्पा 26 एप्रिल : बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
  3. तिसरा टप्पा 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
  4. चौथा टप्पा 13 मे : नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
  5. पाचवा टप्पा 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारने घेतले मोठे निर्णय; घ्या जाणून

२०१९ मध्ये भाजपने ३०३ जागा जिंकून इतिहास रचला होता. ‘अब की बार, ३७० पार’चा नारा भाजपने दिला आहे. तर, एनडीएसह ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विरोधकांनीही भाजपाचा विजयी रथ रोखण्यासाठी इंडिया आघाडीची वज्रमूठ बांधली आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळणार आहे.

देशात सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणूक 19 एप्रिलपासून 7 टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे आणि सातवा टप्पा 1 जून अशा सात टप्प्यात लोकसभा निवडणुक होणार आहे. त्यानंतर निवडणूकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे.

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश; लढवू शकतात लोकसभा निवडणूक

देशात 97 कोटी मतदार आहेत. 49.7 कोटी पुरूष तर 47.1 कोटी महिला मतदार आहेत. यंदा 1.82 कोटी नवीन मतदार मतदान करणार आहेत. महिला मतदारांच प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असून 85 लाख महिला मतदारांचा समावेश आहे. अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली. देशात साडे दहा लाखांहून अधिक मतदान केंद्र आहेत.

ही निवडणूक (Lok Sabha Election 2024 ) म्हणजे आमच्यासाठी ऐतिहासिक संधी. देशातील निवडणूक म्हणजे एक सण असतो, जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. 16 जूनला 17 व्या लोकसभेची मुदत संपत आहे. दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरु आहे. प्रत्येक मतदान म्हणजे आमची चाचणी असते. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होतील, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी