35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यआपण जे भोगलं, ती वेळ इतरांवर येवू नये म्हणून दिव्यांगांसाठी झटणाऱ्या बसवराज...

आपण जे भोगलं, ती वेळ इतरांवर येवू नये म्हणून दिव्यांगांसाठी झटणाऱ्या बसवराज पै यांच्याबद्दल…

मायक्रोसॉफ्टच्या सत्या नाडेलेंच्या मुलाचे झैन नडेला याचे दोन वर्षापूर्वी सेरेब्रल पाल्सीमुळे निधन झाले होते. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी झालेल्या त्याच्या मृत्यूमुळे सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) या दिव्यांगत्वाची (Health) चर्चा सुरू झाली. या दिव्यांगत्वाने देशासह राज्यभरत लाखो रुग्ण ग्रासलेले आहेत परंतु असे काहीजण आहेत ज्यांनी या दिव्यांगत्वावर मात करत आयुष्याच्या यशस्वी पायरीवर उभे आहेत. यातील एक जण म्हणजे बसवराज पैके. (cerebral palsy Basavaraj Paike will be felicitated by dr anil kakodkar) सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) हे दिव्यांगत्व आलेले अमोल बसवराज पैके याचा गौरव करण्याचा निर्णय ‘सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेने घेतला आहे. त्यानुसार यंदाचा हा पहिलाच पुरस्कार सोहळा येत्या गुरुवारी, २८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील पदवीदान सभागृहात होणार आहे.

मायक्रोसॉफ्टच्या सत्या नाडेलेंच्या मुलाचे झैन नडेला याचे दोन वर्षापूर्वी सेरेब्रल पाल्सीमुळे निधन झाले होते. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी झालेल्या त्याच्या मृत्यूमुळे सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) या दिव्यांगत्वाची (Health) चर्चा सुरू झाली. या दिव्यांगत्वाने देशासह राज्यभरत लाखो रुग्ण ग्रासलेले आहेत परंतु असे काहीजण आहेत ज्यांनी या दिव्यांगत्वावर मात करत आयुष्याच्या यशस्वी पायरीवर उभे आहेत. यातील एक जण म्हणजे बसवराज पैके. (cerebral palsy Basavaraj Paike will be felicitated by dr anil kakodkar)

सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) हे दिव्यांगत्व आलेले  बसवराज पैके याचा गौरव करण्याचा निर्णय ‘सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेने घेतला आहे. त्यानुसार यंदाचा हा पहिलाच पुरस्कार सोहळा येत्या गुरुवारी, २८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील पदवीदान सभागृहात होणार आहे.

1972 हे साल समस्त भारतीयांना दुष्काळाच्या झळा देणारं साल म्हणून ओळखलं जातं. याच वर्षात बसवराज पैके यांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर चिमुरड्या बसवराज यांना रडायला आलं नाही. बसवराज यांच्या आई वडीलांनी त्यांना विविध डॉक्टरकडं नेवून दाखवलं. पण त्यावेळी उपचार पद्धत फार विकसित झाली नव्हती. त्यामुळं बसवराज यांना नक्की कोणता आजार आहे हे समजायला बराच काळ गेला.

जाणून घ्या, सेरेब्रल पाल्सी या दिव्यांगत्वाशी दोन हात करणाऱ्या अमोल वडगावकरबद्दल…

सेरेब्रल पाल्सी या विचित्र दिव्यांगत्वामुळं बसवराज यांना व्यवस्थित चालता येत नसायचं. बसवराज यांच्या जडणघडणीत त्यांच्या आई वडिलांबरोबरच आजोबा आणि पत्नीचाही मोठा वाटा आहे. आजोबांच्या दूरदृष्टीमुळे बसवराज यांनी औषध निर्माण शास्त्रातील पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर त्यांनी राज्यशास्त्रातील पदवीचंही शिक्षण पूर्ण केलं.

औषधनिर्माण शास्त्रामुळे ‘सेरेब्रल पाल्सी’साठी आवश्यक असलेल्या उपचार पद्धती, त्यावरील औषधं यांची माहिती मिळवणं त्यांना शक्य झालं. शिक्षण घेत असताना बसवराज यांना कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेता आला नव्हता. कारण ग्रामीण भागात या दिव्यांगत्वाविषयी अधिक माहिती नव्हती.

चरितार्थ चालविण्यासाठी त्यांनी लातूर येथे मेडीकलचं दुकान सुरू केलं. पण समाजसेवेमुळं आपलं पोट भरणार नाही याची कल्पना आल्याने त्यांनी औषधाच्या दुकानाचं रुपांतर जनरल स्टोअर्समध्ये केलं.

बसवराज यांच्या या प्रवासात त्यांच्या पत्नी श्रीशैल्या यांचाही मोठा वाटा आहे. दिव्यांग आहे हे माहित असुनदेखील श्रीशैल्या यांनी बसवराज यांच्याशी विवाह केला. त्यांच्या लग्नाला 28 वर्ष पूर्ण झालीयंत. मात्र, दोघांमध्ये बसवराज यांच्या दिव्यांगत्वामुळं कधीही वाद झाले नाहीत.

महाराष्ट्रातील दुर्लक्षित घटकांचे अचंबित करणारे कर्तृत्व, डॉ. अनिल काकोडकरांच्या हस्ते होणार गौरव

डॉ. सुकुमार आणि सुरेश पाटील या दोन मार्गदर्शकांमुळे बसवराज हे सामाजिक कार्याकडे वळले. बसवराज आता ग्रामीण भागातील सेरेब्रल पाल्सी मुलांना आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करतात. विविध उपचार पद्धतीची शिबिरे आयोजित करतात. कोविडच्या काळामध्ये सेरेब्रल पाल्सी दिव्यांग मुलांची थेरपी सतत चालू ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.

दिव्यांगासाठीचे वैश्विक कार्ड काढण्यासाठी मदत करणे, लातूर जिल्ह्यातील व परिसरातील १२०० बौद्धिक दिव्यांगजनांचा आरोग्य विमा काढण्यासाठी मदत करणे, अगदी अशा लोकांच्या घरी रेशनिंगचे धान्य नेवून पोचविणे अशा कामांमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं आहे.

आपण जे भोगलं, ती वेळ इतरांवर येवू नये म्हणून अथक परिश्रम करणाऱ्या बसवराज यांना ‘रत्न श्री’ पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अभिमान वाटतो !

थेट मेंदूचीच ‘सत्व परीक्षा’ घेणाऱ्या गुंतागुंतीच्या ‘सेरेब्रल पाल्सी’ या दिव्यांगत्वाला आयुष्यभर सोबत घेवून उल्लेखणीय कार्य करणारे बुद्धीवंत समाजात आहेत. अशा बुद्धिवंतांचा गौरव करण्याचा निर्णय ‘सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेने घेतला आहे. त्यानुसार यंदाचा हा पहिलाच पुरस्कार सोहळा येत्या गुरुवारी, २८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील पदवीदान सभागृहात होणार आहे.

प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या इस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
यावेळी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक श्री समीर कर्वे, एक्सिस फायनान्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बिपीन सराफ व इतर मान्यवर उपस्थित असतील.

‘लय भारी’ सोहळ्याचा डिजिटल मीडिया प्रायोजक आहे. ‘लय भारी’चा यु ट्यूब चॅनेल व फेसबूक पेजवर हा सोहळा लाईव्ह पाहता येईल (लिंक बातमीच्या शेवटी देण्यात आली आहे).

यंदाच्या पहिल्याच वर्षी ‘सेरेब्रल पाल्सी’ या दिव्यांगत्वाने ग्रस्त असलेल्या पाच बुद्धिवंतांचा ‘रत्न श्री’ या पुरस्काराने ( ₹ 21 हजार रोख व सन्मानचिन्ह देवून ) गौरव करण्यात येणार आहे, तर अशा प्रकारचे ‘बुद्धवंत’ घडविण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या ४ संस्थांनाही ‘उत्थान रत्न’ पुरस्कार ( ₹ 25 हजार रोख व सन्मानचिन्ह ) देवून गौरविण्यात येणार आहे.

जाणून घेऊयात सेरेब्रल पाल्सी आजारासंदर्भात…

‘रत्नश्री’ पुरस्काराचे मानकरी : बसवराज पैके (लातूर), अमोल अरविंद वडगावकर (पुणे), डॉ. आदित्य लोहिया (नागपूर), अमित ओमप्रकाश बाहेती (नाशिक), रिद्धी चंपक गाडा (मुंबई)

‘उत्थान रत्न’ पुरस्काराचे मानकरी : स्वयंम रेहाबिलेशन सेंटर (ठाणे), रा. स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत संचालित संवेदना प्रकल्प (लातूर), फेरो इक्वीप (मुंबई), फिनिस स्पोर्टस (मुंबई).

‘सेलेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’च्या वतीने या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. आलेल्या प्रस्तावांतून चांगले प्रस्ताव निवडण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमध्ये डॉ रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ,   डॉ सुनील भागवत, संचालक, Indian Institute of Science Education and Research, Pune,  डो नंदिनी गोकुलचंद्रन, Dy Dir, Medical Services and Consultant of Regenerative Medicine.यांचा समावेश होता.

या समितीने निश्चित केलेल्या 5 व्यक्ती व 4 संस्था यांना प्रस्तूत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे विश्वस्त श्री. यशवंत मोरे (निवृत्त राजपत्रीत अधिकारी) व श्री संदीप अग्रवाल यांनी कळविले आहे.

हा सोहळा यूट्यूबच्या https://youtube.com/@LayBhariNewsLive या लिंकवरून, तर फेसबूकच्या https://www.facebook.com/LayBhari16News या या लिंकवरूनही लाईव्ह पाहता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क : यशवंतराव मोरे, विश्वस्त, सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया (व निवृत्त राजपत्रित अधिकारी) ९४२२८०८५०५

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी