36 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यदैवाने दिव्यांगत्व दिले, पण कर्माने यश कमविले; 'या' तरूणाची कहाणी तुम्हाला प्रेरणा...

दैवाने दिव्यांगत्व दिले, पण कर्माने यश कमविले; ‘या’ तरूणाची कहाणी तुम्हाला प्रेरणा देईल

सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) हे दिव्यांगत्व आलेले अमोल अरविंद वडगावकर याचा गौरव करण्याचा निर्णय ‘सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेने घेतला आहे. त्यानुसार यंदाचा हा पहिलाच पुरस्कार सोहळा येत्या गुरुवारी, २८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील पदवीदान सभागृहात होणार आहे. जन्माला येणारं प्रत्येक मुलं सुदृढच असतं असं नाही. पण सुदृढ नसतानाही स्वत:च जग निर्माण करतात अशी काही मोजकीच उदाहरणे मिळतात. तुम्ही आजवर अनेक आजारांशी झुंज देणाऱ्या व्यक्तींबद्दल ऐकले असेल. पण आज आम्ही तुम्हाला सेरेब्रल पाल्सी या आजाराशी दोन हात करत यशस्वी झालेल्या २२ वर्षीय अमोल अमोल अरविंद वडगावकर (Amol Vadgaonkar) याची कथा सांगणार आहोत.

तुम्ही म्हणाल सेरेब्रल पाल्सी हा नेमका कसला आजार आहे. हा एक दिव्यांगाचा प्रकार आहे. दोन वर्षापूर्वी म्हणजेच १ मार्च २०२२ मध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांचा (Satya Nadella) 26 वर्षांचा मुलगा झेन नाडेला याचं निधन या आजारात झालं होतं. जन्माआधी, जन्माच्या वेळी किंवा जन्मानंतर लगेचच नाजूक, अपरिपक्व, विकसनशील मेंदूला इजा वा नुकसान पोहोचल्याने सेरेब्रल पाल्सी हे दिव्यांगत्व येते.

महाराष्ट्रातील दुर्लक्षित घटकांचे अचंबित करणारे कर्तृत्व, डॉ. अनिल काकोडकरांच्या हस्ते होणार गौरव

अशा या गंभीर आजारावर मात करून सध्या पुण्यात आयटी विभागात काम करणारा २२ वर्षीय अमोल याच्या संघर्षाबद्दल जाणून घेऊयात.

अमोल अरविंद वडगावकर असं या तरुणाच नाव आहे. हा मुळचा सोलापूरचा आहे. अमोल हा सध्या सॉफ्टवेअर चाचणी अभियंता म्हणून आयटी कंपनीत कार्यरत आहे. लहान वयातच बापाचं छत्र हरवलेल्या अमोलला सेरेब्रल पाल्सी हे दिव्यांगत्व जन्मताच आले.

स्वतः विषयी अमोल म्हणाला…

मी दोन वर्षाचा असताना माझ्या वडिलांच निधन झालं. माझे वडील पोस्ट ऑफीसमध्ये काम करत होते. त्यांच्या निधनानंतर आईला त्यांच्या जागी बोलवण्यात आलं. पण माझ्या आईला माझी काळजी होती. मला नीट चालतादेखील येत नव्हतं. त्यावेळी आम्हाला माझ्या मावशीने मदत केली. अर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने आईला काम करण गरजेचं होतं. अर्थिक परिस्थितीमुळं मला शाळेतदेखील जाता येत नव्हंत. त्यामुळे आम्ही मावशीच्या घरी राहिलो.

पण माझी शिकण्याची जिद्द पाहून जय‌श्री जोगळेकर ज्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक कार्य केले त्यांनी माझा शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला. बालवाडीपासून ते पदवीपर्यंत त्यांनी माझ्या शिक्षणाचा खर्च केला. त्यांनी माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आणि ऋणी आहे.

जाणून घेऊयात सेरेब्रल पाल्सी आजारासंदर्भात…

त्यानंतर त्यांनी माझ्या दिव्यांगत्वावर उपचार करण्यासाठी मला वैद्यकीय व अर्थिक मदत केली. मला चांगले चालता यावे यासाठी त्यांनी फिजिओथेरपीचेदेखील उपचार दिले. त्यांच्या या मदतीमुळं माझ्या चालण्यात थोडीफार सुधारणा झाली. जोगळेकर यांच्यासह माझ्या शाळेच्या मुख्याधिपिका नलिनी सेनगुप्ता यांनीदेखील मला शिक्षणात मदत केली.
शालेय शिक्षणानंतर पदवीचे शिक्षण घेताना माझा किरण भागवत यांच्याशी सर्पक आला.

त्यांच्याकडे “सिंपली असिस्ट” नावाचे एक फाउंडे फाउंडेशन आहे जे विविध दिव्यांग लोकांना शिक्षणासह मदत करते. त्यांनी मला Afour Technologies त्यामध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग कोर्स उपलब्ध करून दिला. त्यामुळे मला चांगली नोकरी लागण्यास मदत झाली.

मला जेव्हा नोकरी लागली तेव्हा माझ्या आईनं पोस्टाची नोकरी सोडली. मला तिचा खुप अभिमान आहे. शालेय शिक्षण घेत असताना माझी आई काळजी घेण्यासाठी शाळेतील देखील काम करत होती. आता माझ्या आईसाठी मी काम करत आहे. मला तिंच घराचं स्वप्न पुर्ण करायचं आहे. त्यासाठी मी अजूनही अभ्यास करत आहे. असं अमोलनं यावेळी सांगितलं.

थेट मेंदूचीच ‘सत्व परीक्षा’ घेणाऱ्या गुंतागुंतीच्या ‘सेरेब्रल पाल्सी’ या दिव्यांगत्वाला आयुष्यभर सोबत घेवून उल्लेखणीय कार्य करणारे बुद्धीवंत समाजात आहेत. अशा बुद्धिवंतांचा गौरव करण्याचा निर्णय ‘सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेने घेतला आहे. त्यानुसार यंदाचा हा पहिलाच पुरस्कार सोहळा येत्या गुरुवारी, २८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील पदवीदान सभागृहात होणार आहे.

प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या इस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
यावेळी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक श्री समीर कर्वे, एक्सिस फायनान्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बिपीन सराफ व इतर मान्यवर उपस्थित असतील.

‘लय भारी’ सोहळ्याचा डिजिटल मीडिया प्रायोजक आहे. ‘लय भारी’चा यु ट्यूब चॅनेल व फेसबूक पेजवर हा सोहळा लाईव्ह पाहता येईल (लिंक बातमीच्या शेवटी देण्यात आली आहे).

यंदाच्या पहिल्याच वर्षी ‘सेरेब्रल पाल्सी’ या दिव्यांगत्वाने ग्रस्त असलेल्या पाच बुद्धिवंतांचा ‘रत्न श्री’ या पुरस्काराने ( ₹ 21 हजार रोख व सन्मानचिन्ह देवून ) गौरव करण्यात येणार आहे, तर अशा प्रकारचे ‘बुद्धवंत’ घडविण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या ४ संस्थांनाही ‘उत्थान रत्न’ पुरस्कार ( ₹ 25 हजार रोख व सन्मानचिन्ह ) देवून गौरविण्यात येणार आहे.

‘रत्नश्री’ पुरस्काराचे मानकरी : बसवराज पैके (लातूर), अमोल अरविंद वडगावकर (पुणे), डॉ. आदित्य लोहिया (नागपूर), अमित ओमप्रकाश बाहेती (नाशिक), रिद्धी चंपक गाडा (मुंबई)

‘उत्थान रत्न’ पुरस्काराचे मानकरी : स्वयंम रेहाबिलेशन सेंटर (ठाणे), रा. स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत संचालित संवेदना प्रकल्प (लातूर), फेरो इक्वीप (मुंबई), फिनिस स्पोर्टस (मुंबई).

‘सेलेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया’च्या वतीने या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. आलेल्या प्रस्तावांतून चांगले प्रस्ताव निवडण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमध्ये डॉ रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ,   डॉ सुनील भागवत, संचालक, Indian Institute of Science Education and Research, Pune,  डो नंदिनी गोकुलचंद्रन, Dy Dir, Medical Services and Consultant of Regenerative Medicine.यांचा समावेश होता.

या समितीने निश्चित केलेल्या 5 व्यक्ती व 4 संस्था यांना प्रस्तूत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे विश्वस्त श्री. यशवंत मोरे (निवृत्त राजपत्रीत अधिकारी) व श्री संदीप अग्रवाल यांनी कळविले आहे.

हा सोहळा यूट्यूबच्या https://youtube.com/@LayBhariNewsLive या लिंकवरून, तर फेसबूकच्या https://www.facebook.com/LayBhari16News या या लिंकवरूनही लाईव्ह पाहता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क : यशवंतराव मोरे, विश्वस्त, सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडिया (व निवृत्त राजपत्रित अधिकारी) ९४२२८०८५०५

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी